उर्दाळलेली मराठी कवीता

Submitted by पल्ली on 27 February, 2008 - 05:09

ह्या इथे मी बेसलो
तनहा असा दीवाना
चहु दिशास पहातो आहे
माणुस गर्दीचा नजारा...
होता ज्यास गंध
सुगंधी अत्तराचा
तो दिल आताशा
झालाय फत्तराचा.....
काय मी केली होती
निर्णयाची घाई
कि मजला गाठते
गर्दीतही तनहाई....
तुम्ही तरी जाउ नका
सोडुन मजला आज
सोबत उरले केवळ माझ्या
हे माझे अल्फाझ...........

गुलमोहर: 

बोलकी व्यथा. विचारमंथन येता जाता. शब्दांचा आकार हृदयाचा आधार.

आईशप्पथ मस्तय ही. मी बघितलीच नव्हती की.
आत्ता स्वच्च परकाश पल्डा.. उर्दाळलेली काय म्हून त्ये Happy

व्वा!! आवडली Happy

पल्ले.... तु उद्या कन्नडा किंवा तेलगूमध्ये लिहीलस ना तरीही ती सहज उमजेल कुणालाही..... Happy

पल्ली,

कविता छान आहे.

उर्दाळलेले शब्द आले - कुणी वापरले; तरी माझ्यामते त्यामुळे भाषा समृद्धच होते.

शरद