तुझी आसवे

Submitted by nikhilmkhaire on 28 February, 2008 - 05:07

तुझी आसवे वंद्य थोर पावसाला
ना कुठला रुतूही कसा वर्ज्य त्यांना,
बरसायला?
ना वीजेची आरास ना करडे आभाळ
कंठी हलकी एकच कळ
मुक्त मोकळे व्हावे जळ
नजर जराशी वळती खाली
मुक तुझे अन् जलबिंदू
मेघांहूनही अलगद होत
वदले अधर तव नयनांना
'उष्ण जराशी खारट तरीही,
चवही असते अश्रूंना!

(व. पु. काळे यांच्या पार्टनर या पुस्तकातील एका वाक्यावर आधारीत)
निखिल

गुलमोहर: 

!!!