एक सलाम .. सक्तीचा..

Submitted by अनुराधा म्हापणकर on 8 March, 2011 - 00:39

हा महिलादिन भक्तीचा
एक सलाम .. सक्तीचा..
उदो उदो ... स्त्रीमुक्तीचा
अवघ्या नारी शक्तीचा

आज तूच ग गौरी
शब्दांनी सजवलेली
आजपुरतीच तुला,
मखरात बसवलेली

तुझी ममता तुझी माया
तुझे वात्सल्य तुझी छाया
आजपुरतेच सा-यांना कळले
रोज जाते जे व्यर्थ-वाया

तुझी कर्तव्य, तुझे त्याग
आज काय हवे ते माग
आजपुरतेच चंदन लेप
रोज मात्र पलित्याचे डाग

हे सारे शब्दांचेच खेळ
गोड गोड बोलणारे ओठ
उद्या प्यायचेत ग पुन्हा
मुकाट ते विषारी घोट

'महिलादिन' आज होऊदे साजरा
उद्यापासून आहे रोजचेच रडे..
पाठव पाठव, तुही ते एसेमेस...
आणि म्हण.. "हैप्पी हैप्पी विमेन्स डे.. "

अनुराधा म्हापणकर
८ मार्च, २०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छानच, कटू वास्तव सांगणारी.........
काही वर्षांपूर्वी तुमची महिला दिनानिमित्त "लोकसत्तात" प्रकाशित झालेली कविताही फार छान होती.

एका महिलेने महिलादिनानिमित्य लेहिलेली वास्तववादी कविता !! Happy
हे ही दिवस बदलतील
शुभेच्छा !!

अमोल केळकर
---------------------------------------------------------------
मला इथे भेटा

अनुराधा, मस्त कविता.
आज तूच ग गौरी
शब्दांनी सजवलेली
आजपुरतीच तुला,
मखरात बसवलेली>>>> आज सुद्धा यातल काहीच नाही आहे.
आज बसमधून लोंबकळत आणि धक्के खात येताना हेच जाणवल.

"हे सारे शब्दांचेच खेळ
गोड गोड बोलणारे ओठ
उद्या प्यायचेत ग पुन्हा
मुकाट ते विषारी घोट"

...... कटू सत्य .... वर्मावर बोट ठेवणारं