अबला नव्हे सबला !

Submitted by प्रभा on 8 March, 2011 - 04:46

सगळ्या रसिक वाचकान्ना महिला दिनाच्या शुभेछा !!

मायबोलीच्या माध्यमातुन
बोलते व्यथित माय !
मराठी मायबोलीवर जमली
ईन्ग्लिशची साय !
साय शब्द समजेल का?
समजेल का मलई ?
कारण मराठीला पितळ समजुन
इन्ग्लिश ने केली कल्हई!
मराठी नाही पितळ
ते आहे असली सोन
डोलर , पोउन्ड च्या गदारोळात
हरवल मराठी नाण!
विसरु नका त्याला
घेतला जरी इन्ग्लिश चा आधार
सु-सन्स्क्रुत करा मुल
हेच सान्गणे त्रिवार!
महिला नाही अबला
त्या तर सबला,
ह्याच साठी दिला तुम्हाला इन्ग्लिशचा दाखला!
पुरुष प्रधान सन्स्क्रुतित ,
पुरुष राहिले प्रधानच
स्त्रीया ठरल्या राणी
हेच सान्गतो ईतिहास
आपल्या माय बहीणी
त्यान्चा ठेवा आदर्श
नका करु गर्व
एकमेका साह्यकरु
सुपन्थ धरु सर्व !

गुलमोहर: 

प्रभाजी,

खूपच सुंदर लिहिले आहे. माझे तुम्हास अभिनंदन आणिक तुम्हासही महिला दिना च्या शुभेछा.

ह्या कवितेला नुसती लयच नाही तर खूपच सुंदर शब्दांनीही सजवले आहे तुम्ही.

<<<
मराठी मायबोलीवर जमली
ईन्ग्लिशची साय !
साय शब्द समजेल का?
समजेल का मलई ?
कारण मराठीला पितळ समजुन
इन्ग्लिश ने केली कल्हई!
मराठी नाही पितळ
ते आहे असली सोन
>>>> हे खूपच मस्त लिहिले आहे.

पुलेशु.

- निनाव.