ते मात्र तुलाच माहित!

Submitted by बागेश्री on 6 June, 2011 - 02:21

तुझं दिलखुलास हसणं,
अन् फुलांच प्रसन्न उमलणं,
ह्यातलं साम्य मलाच माहित.....

तुझ्या भावनांची नजाकत अन्
'पारिजातक'.....

गंधभारला 'चाफा' अन्
तुझ्या शब्दांची टप-टप....

तुझं बहरलेलं व्यक्तिमत्त्व अन्
उमलून असलेला 'जास्वंद'....

तुझं अवती-भोवती असणं अन्
'सदाफूलीनं' फुलणं....

'निल-कमळांच' अवचित एकदा उमलणं, अन्
तुझ्या-माझ्या भेटीच निमित्त....

ह्या सगळ्यातलं साम्य, फक्त 'मलाच' माहित....!!

भरगच्च नि दणकट वड; त्याच्या बुंध्याशी
वाढणारी, बेफिकीर कोवळी पालवी,
अन् तुझी 'मऊ-साउली',
ह्यांच्यातलं नातं रे सख्या,
केवळ मलाच माहित.....!!

पण;
हे शब्द मांडतांना होणारी
ओठांची थरथर,
काळजाचे वाढलेले ठोके,
बुजलेलं मन...
ह्या सार्‍यांचा अर्थ काय?

ते मात्र तुलाच माहित.........

गुलमोहर: 

खास!! Happy

<<हे शब्द मांडतांना होणारी
ओठांची थरथर,
काळजाचे वाढलेले ठोके,
बुजलेलं मन...
ह्या सार्‍यांचा अर्थ काय?

ते मात्र तुलाच माहित.........<<

वाहवा!! सही! Happy

छान!

वा मस्त

>>हे शब्द मांडतांना होणारी
ओठांची थरथर,
काळजाचे वाढलेले ठोके,
बुजलेलं मन...
ह्या सार्‍यांचा अर्थ काय?
ते मात्र तुलाच माहित.........

अप्रतीम, सुंदरच..... Happy

(का.का.क. मधे न टाकल्या बद्दल अभिनंदन)

तु खुप छान लिहितेस आणि मी तुझ्या नविन कवितांची किती वाट बघते, हे मलाच माहित.
इतकं छान, जबरी, सही, हळुवार, विनोदी, रोमँटिक, फॅंटॅस्टिक तु कसं लिहितेस, ते मात्र तुलाच माहित.

हा हा हा Lol

माऊ, भारीच!
अगं आत्ता विचारच करत होते, तुला लिंक द्यावी म्हणून and here you are...

Thanks a lot Dear!! Happy

ओये.. मला पण एक्दा बागेश्रीच्या बागेचे खोदकाम करायला हवेच.. खुप कवितासुमने मिसली दिसतायेत मी Uhoh

ही पण मस्त ग Happy

बागेश्रीच्या बागेचे खोदकाम>> Lol वर्षे हो जा शुरू Wink

धन्यवाद शिबा, अनेक दिवसानंतर मलाच ही कविता वाचायला मजा आली Happy