य़ा जगण्याचे आता मजला कौतुक वाटत नाही
चंद्रही तसा पूर्वीइतका सुंदर भासत नाही
कसली किंमत करता तुम्ही माझ्या त्या नात्याची?
ऐपत नाही घेण्याची, देण्याची दानत नाही!
छोट्यामोठ्या दु:खांचे संचार भोगतो आहे
एकहि आदिम तेजस्वी पण दु:ख झपाटत नाही
रोज विचारु नका तुम्ही मज तिच्या उत्तराबद्दल
इच्छा मजला उरली नाही, तुमची संपत नाही!
बोलत असतो केवळ आम्ही, नाते अबोल अमुचे
(कारण आम्हा त्याची भाषा बहुधा समजत नाही)
जे सुचते ते लिहून जातो, उलटत जातो पाने
जगल्याचे कुठलेच पुरावे मनात ठेवत नाही
गमावण्याचे भय सरता माणूस बेफ़िकिर होतो
जे आहे त्याचीही किंमत बहुधा राहत नाही
अजूनही त्या पत्रांमधली थरथर तशीच आहे
(कविता सुचण्यासाठी बाकी काही लागत नाही)
- नचिकेत जोशी
(शेवटचा शेर आधी असा चुकवला होता - याचाही उल्लेख प्रतिसादांमध्ये आहे, म्हणून इथे देतोय
अजूनही त्या पत्रांमध्ये अबोल थरथर तशीच आहे
कविता सुचण्यासाठी मजला बाकी काही लागत नाही )
सुंदर गझल! जियो!!
सुंदर गझल! जियो!!
>> छोट्यामोठ्या दु:खांचा
>> छोट्यामोठ्या दु:खांचा संचार भोगतो आहे
>> एकहि आदिम तेजस्वी पण दु:ख झपाटत नाही
ये बात!
(दु:खांचे संचार नको का?)
शेवटच्या द्विपदीत काय मात्रांचा गोंधळ घातला आहे तो?
काय झालंय नचिकेता? कुठल्या
काय झालंय नचिकेता? कुठल्या 'ट्रान्स' मधे होतास लिहितांना?
सटल आहेत बरेच शेर. चांगले वाटले.
दुसर्या शेरात 'तुम्म्ही' म्हणावं लागतंय. आणि शेवटच्या शेरात 'यू टू?' म्हणावं लागतंय..
गमावण्याचे भय सरता माणूस
गमावण्याचे भय सरता माणूस बेफ़िकिर होतो
जे आहे त्याचीही किंमत बहुधा राहत नाही
अजूनही त्या पत्रांमध्ये अबोल थरथर तशीच आहे
(कविता सुचण्यासाठी मजला बाकी काही लागत नाही)
क्या बात है!
मात्रा तपासणे आले!
मात्रा तपासणे आले!
गझल आवडली.
गझल आवडली.
हे मात्र खरे आहे श्री नंदन,
हे मात्र खरे आहे श्री नंदन,
आनंदयात्रींचे या गझलेतील बहुतेक शेर मस्त आहेत!
-'बेफिकीर'!
जे सुचते ते लिहून जातो, उलटत
जे सुचते ते लिहून जातो, उलटत जातो पाने
जगल्याचे कुठलेच पुरावे मनात ठेवत नाही
हा शेर खूप आवडला!!
आत्ता परत वाचली. य़ा
आत्ता परत वाचली.
य़ा जगण्याचे आता मजला कौतुक वाटत नाही
चंद्रही तसा पूर्वीइतका सुंदर भासत नाही - छान!
कसली किंमत करता तुम्ही माझ्या त्या नात्याची?
ऐपत नाही घेण्याची, देण्याची दानत नाही! - व्वा!
छोट्यामोठ्या दु:खांचा संचार भोगतो आहे - सुंदरच ओळ!
एकहि आदिम तेजस्वी पण दु:ख झपाटत नाही - उत्तमच!
रोज विचारु नका तुम्ही मज तिच्या उत्तराबद्दल - हं!
इच्छा मजला उरली नाही, तुमची संपत नाही! - वा वा वा!
बोलत असतो केवळ आम्ही, नाते अबोल अमुचे
(कारण आम्हा त्याची भाषा बहुधा समजत नाही) - मस्त!
जे सुचते ते लिहून जातो, उलटत जातो पाने
जगल्याचे कुठलेच पुरावे मनात ठेवत नाही - अप्रतिम शेर!
अजूनही त्या पत्रांमध्ये अबोल थरथर तशीच आहे - उत्तम मिसराच!
(कविता सुचण्यासाठी मजला बाकी काही लागत नाही) - उत्तम शेरच!
(अवांतर - या शेवटच्या शेरावरून मला माझी http://www.maayboli.com/node/16434 ही गझल, त्याच जमीनीत असल्याने आठवली. )
आपल्या अजून गझलांच्या प्रतीक्षेत! जवळपास सर्वच शेर उत्तम असण्याचे उत्तम उदाहरण आनंदयात्री!
धन्यवाद!
आपली आजवरची मला सर्वाधिक आवडलेली गझल!
-'बेफिकीर'!
आई शप्पथ!! खरंच की!! शेवटच्या
आई शप्पथ!!
खरंच की!!
शेवटच्या शेरामध्ये मात्रांचा घोळ झालाय!
करतो दुरुस्त!
अजूनही त्या पत्रांमध्ये अबोल
अजूनही त्या पत्रांमध्ये अबोल थरथर आहे
(कविता सुचण्यासाठी बाकी काही लागत नाही) - असे नाही का चालणार? फार बदलत नसावा अर्थ?
जगण्याचे कुठलेच पुरावे मनात ठेवत नाही - अप्रतिम शेर! अजून चघळतोय!
-'बेफिकीर'!
वेल, मात्रांची चूक झाली होती
वेल, मात्रांची चूक झाली होती खरी.. क्षमस्व!
स्वाती ताई, sorry!
झाड, रामकुमार, नंद्या, कणखर - thanks!
ज्ञानेश, विशेष आभार! आणि
बेफिकीर, आपलेही विशेष आभार!
बेफिकीर,
बेफिकीर,
जगल्याचे कुठलेच पुरावे 'जगात'
जगल्याचे कुठलेच पुरावे 'जगात' ठेवत नाही अशी ओळ खरे म्हणजे तरहीसाठी घ्यायला पाहिजे. मात्रावृत्तात गझल होईल किंवा १४ वेळा गा असे अक्षरगणवृत्त मानू! आनंदयात्रींचा 'मनात' हा शेर सुपर्ब, तरहीसाठी तो जगात केला तर?
कुठे आहेत कैलासराव?
जगण्याचे कुठलेच पुरावे मनात
जगण्याचे कुठलेच पुरावे मनात ठेवत नाही - अप्रतिम शेर! अजून चघळतोय!
>>
बेफिकीर, तो शब्द 'जगल्याचे' आहे ! चुभूद्याघ्या...
खरे आहे, जगल्याचे! चूक झाली
खरे आहे, जगल्याचे!
चूक झाली लिहिताना!
व्वा नचिकेत.. एक सुरेख आणि
व्वा नचिकेत.. एक सुरेख आणि प्रगल्भ गझल... सगळे शेर छान
त्यातही
छोट्यामोठ्या दु:खांचे संचार भोगतो आहे
एकहि आदिम तेजस्वी पण दु:ख झपाटत नाही
(खालची ओळ अजून प्रवाही झाली असती का? )
बोलत असतो केवळ आम्ही, नाते अबोल अमुचे
(कारण आम्हा त्याची भाषा बहुधा समजत नाही)
जे सुचते ते लिहून जातो, उलटत जातो पाने
जगल्याचे कुठलेच पुरावे मनात ठेवत नाही
अजूनही त्या पत्रांमधली थरथर तशीच आहे
(कविता सुचण्यासाठी बाकी काही लागत नाही)
हे जास्ती आवडले ... निवडक १०त
सगळेच आवडले.. सगळेच
सगळेच आवडले..
सगळेच खास..
खूप खूप छान..
>>जे सुचते ते लिहून जातो,
>>जे सुचते ते लिहून जातो, उलटत जातो पाने
जगल्याचे कुठलेच पुरावे मनात ठेवत नाही>>>>
बहोत खूब!!
मस्त गझल. अजूनही त्या
मस्त गझल.
अजूनही त्या पत्रांमधली थरथर तशीच आहे
(कविता सुचण्यासाठी बाकी काही लागत नाही)
हा शेर तर खूपच आवडला.
जे सुचते ते लिहून जातो सुद्धा मस्तच.
मात्रावृत्तात आहे का ? कोणते
मात्रावृत्तात आहे का ? कोणते वृत्त आहे ?
सगळेच शेर छान आहेत. आवडले.
जे सुचते ते लिहून जातो, उलटत जातो पाने
जगल्याचे कुठलेच पुरावे मनात ठेवत नाही
गमावण्याचे भय सरता माणूस बेफ़िकिर होतो
जे आहे त्याचीही किंमत बहुधा राहत नाही
या दोन द्विपदीमधल्या दुस-या ओळी बरोबर आहेत का ? गुणगुणताना खटकताहेत..
मिल्या डॉन, मुक्ते, रेव्यु,
मिल्या डॉन, मुक्ते, रेव्यु, सुवर्णमयी, अनिल - धन्यवाद!
अनिल, होय.. मात्रावृत्तच आहे. १४ मात्रा आहेत किंवा एकूणात ७ गुरू असा विचार केला तरी चालेल..
आपण उल्लेख केलेल्या दोन्ही शेरामध्येही १४ मात्राच आहेत, मलातरी गुणगुणताना प्रोब्लेम आला नाही... कदाचित आपण उच्चार करताना र्हस्व-दीर्घ किंवा आघात वेगळे केले असतील..
मात्रावृत्तच आहे. १४ मात्रा
मात्रावृत्तच आहे. १४ मात्रा आहेत किंवा एकूणात ७ गुरू असा विचार केला तरी चालेल..??
>>>
??
७ गुरू की १४ गुरू??
१४ गुरू! चूक झाली...
१४ गुरू!
चूक झाली...
सही! सगळेच शेर खास! निवडक
सही! सगळेच शेर खास! निवडक १०त.
पुरावे आणि थरथर विशेष आवडले
पुरावे आणि थरथर विशेष आवडले !
तशी सगळी गझलच अप्रतिम !!
ही आधी वाचली होती असं का
ही आधी वाचली होती असं का वाटतंय???
छानच आहे
सुंदर गझल नचिकेत
सुंदर गझल नचिकेत
छोट्यामोठ्या दु:खांचे संचार भोगतो आहे
एकहि आदिम तेजस्वी पण दु:ख झपाटत नाही>>हा शेर फार भारीये, मक्तापण जोरात एकदम
क्रांतिताई, विशाल, हर्षल,
क्रांतिताई, विशाल, हर्षल, श्यामली... मनःपूर्वक धन्यवाद!

गझल सुंदर आहे. आवडली...
गझल सुंदर आहे. आवडली...
पण कधी कधी अगदी बरं वाटतं कळत नाही तेच.. कारण मग निदान गझलेचा निखळ आनंद तरी घेता येतो... मात्रा, छंदाच्या भानगडीत पडलं की आनंद लोप पावतो.. 
गझलेवरची चर्चा पाहून कधी कधी वाटतं की आपल्याला काहीच कळत नाही.. (हे मात्रा/छंद्/वृत्त वगैरे)
Pages