स्वभाव

Submitted by सुहासिनी on 21 June, 2011 - 11:03

टाकुन बोलण्याचा माझा स्वभाव नाही
तू बोल जे हवे ते माझा दबाव नाही

संभाषणात असतो स्वार्थी पणाच हल्ली
स्वार्थाशिवाय आता कुठलाच आव नाही

भोन्दु तसेच ढोन्गी पूजा करून घेती
सच्चेपणास आता कोठेच वाव नाही

लोभामुळेच आता बनलेत चोर सारे
दावाय वानगीला विश्वात साव नाही

होते अनेक ज्याना जगतात मान होता
आदर कराय आता कुठलेच नाव नाही

माणूस़की असाया माणूसपण हवे ना
शोधू कुठे तयाला त्याचाच ठाव नाही

-सुहासिनी सुरेश

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

टाकुन बोलण्याचा माझा स्वभाव नाही
तू बोल जे हवे ते माझा दबाव नाही >>> मस्त.. दिलखेच मतला..!

'लोभामुळे'... हा शेरकळला नाही.

शेवटचा शेर ही आवडला.

हाय सुहासिनी, तू ही गझल ऐकवलीस तेंव्हाच मी प्रतिसाद दिला आहे. आता परत देण्याची गरज नाही.
आता फक्त तू मायबोलीवर आल्याचा आनन्द व्यक्त करते. लवकरच मेल करीन.

शिरोढाणकर सुहासिनी का?

अखिल भारतॉय मुस्लिम मराठी संमेलनातील?

गझल बाबत शायर हटेलांशी सहमत!

-'बेफिकीर'!

सुहासीनी तुमची गजल वादातीत उत्तम. पण जरा जपूनच पोस्ट करीत जा. द्रुष्टाळण्याचा संभव आहे. ओठी एक अन पोटी एक असा अनुभव कदाचित तुम्हाला येईल. तेव्हा रात्र वै-याची आहे. सावध रहा.