तो माझा वाडा होता...

Submitted by अ. अ. जोशी on 22 March, 2011 - 11:25

तो माझा वाडा होता अन ती वाड्याची खिडकी
अजून जपली हृदयी, होती जरी इमारत गळकी

गुणी मुलांनी आपआपले वाटे करून नेले
उरले आई-बाबा, ...विटकी पिशवी, ...वस्त्रे मळकी

वस्त्रें चमचमती, लखलखते महाल, गाड्या भारी
जगणे राजस, खाणे ताजे; ...तरी मने का कुजकी?

पहा, जगाची रीत अशी, ना कुणी कुणाचा वाली
कुणी नाहते मद्याने तर कुणास नसते 'दिडकी'

असते अशी नोकरी, ललना, कीर्ती, सत्ता, प्रतिभा
पहा, पहा आलीच... म्हणेतो निघते घेउन गिरकी

जरी दूरच्या देशांमध्ये नाती जोडुन आलो
तरी आपल्या शेजारी का नजर राहते तिरकी ?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वस्त्रें चमचमती, लखलखते महाल, गाड्या भारी
जगणे राजस, खाणे ताजे; ...तरी मने का कुजकी?

जरी दूरच्या देशांमध्ये नाती जोडुन आलो
तरी आपल्या शेजारी का नजर राहते तिरकी ? >> आवड्ले.

तो माझा वाडा होता अन ती वाड्याची खिडकी
अजून जपली हृदयी, होती जरी इमारत गळकी... व्वा !!

चांगली गझल. आवडली.

असते अशी नोकरी, ललना, कीर्ती, सत्ता, प्रतिभा
पहा, पहा आलीच... म्हणेतो निघते घेउन गिरकी...........हा शेर वाचताना पहिल्या मिसर्‍यात लय बिघडल्याचे जाणवले.

तो माझा वाडा होता अन ती वाड्याची खिडकी
अजून जपली हृदयी, होती जरी इमारत गळकी>>> मस्त!

गुणी मुलांनी आपआपले वाटे करून नेले
उरले आई-बाबा, ...विटकी पिशवी, ...वस्त्रे मळकी>>>व्वा!

गुणी मुलांनी आपआपले वाटे करून नेले
उरले आई-बाबा, ...विटकी पिशवी, ...वस्त्रे मळकी>>> टोचला आतवर Sad

जरी दूरच्या देशांमध्ये नाती जोडुन आलो
तरी आपल्या शेजारी का नजर राहते तिरकी ? >>> आवडला !!

छान.. Happy

असते अशी नोकरी, ललना, कीर्ती, सत्ता, प्रतिभा
पहा, पहा आलीच... म्हणेतो निघते घेउन गिरकी...........हा शेर वाचताना पहिल्या मिसर्‍यात लय बिघडल्याचे जाणवले>>>

सहमत आहे.

लय या विषयावर गझल चर्चा मध्ये कुणीतरी काहीतरी लिहायला हवे. मागे सुरेश भट या स्थळावर चित्तरंजन भट यांनी काही लिहीलेले होते. ते कुठे सापडते का ते बघूयात.

असो !

कैलास,
नोकरी पाशी अंमळ अडखळायला झाले. Happy
हा हा... तिथे तर कोणीही अडखळतेच.

विनोद जाऊ देत.
नोकरीपाशी का? अशी या शब्दापाशी का नाही?

मुळात लय म्हणजे लघु-गुरूचे ठोकळे नव्हेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. समान अंतरावर पडणारी विश्रांती म्हणजे लय. ही गझल मात्रा वृत्तात असल्याने लघु-गुरू जसेच्या तसे येणारच नाहीत. असो. तुम्हाला समजलेच असेल. आणखी स्पष्टीकरण कशाला?

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

धन्यवाद विजय!

मात्र, आता इथे लिहायचे नाही असे मी ठरविले आहे.>>>>>

Sad

हे हो काय .....????
अजयजी,मी गझल शिकण्यास नुकती सुरुवात केली आहे.प्रतिसाद देतांना अज्ञानतेतून आगळीक घडू शकते...कृपया त्यासाठी इतका टोकाचा निर्णय घेवू नका.

कैलासजींशी सहमत!
मी देखील रदीफ ची फोड होणे चालते का? या तांत्रिक गोष्टीबद्दल स्पष्टीकरण व्हावे या दॄष्टीने मागे एका गझलेवर प्रतिसाद दिला होता.
त्याचीही परिणती अशीच झाली आहे.
मुळात मला विरस झाल्यासारखे वाटले.
आपण आपल्या निर्णयाचा पुन्हा विचार करावा.

कैलास, रामकुमार, महेश
आपण आणि इतरांनी दाखवलेल्या आपुलकीबद्दल धन्यवाद!

रामकुमार,
विरस होण्याचे कारण नाही. केवळ आपल्या प्रश्नामुळे मी असा निर्णय घेतला नव्हता. असो.

लवकरच नक्की विचार करेन....

आवडीने वाचाव्यात अशा तुमच्या गझला आहेत. प्रगल्भता आहे. ही पण खासच..

अजयजी.. आपल्या निर्णयाचा आदर तर आहेच, पण फेरविचार कराल अशी आशा वाटतेय.

वा, छान आहे गझल.

जरी दूरच्या देशांमध्ये नाती जोडुन आलो
तरी आपल्या शेजारी का नजर राहते तिरकी ?

हा शेर आवडला.

"असते अशी नोकरी, ललना, कीर्ती, सत्ता, प्रतिभा" या ओळीपाशी मलाही अडखळायला झाले. वरपासून वाचत येतांना- येणारे १४ "गा" इथे जरासा वेगळा क्रम घेऊन येतात. 'असते अशी नोकरी' या शब्दात लय जाते आहे.
'लय' शब्द वापरला म्हणून कदाचित मला धन्यवाद मिळणार नाहीत. पण जे जाणवले ते सांगीतले. बाकी गझल चांगलीच आहे. तेवढ्या ओळीत बदल केला (जे अजयरावांना सहज शक्य आहे) तर आणखी चांगली होईल.

अनिलजी, ज्ञानेश धन्यवाद!

ज्ञानेश,
>> १४ "गा" इथे जरासा वेगळा क्रम घेऊन येतात >>
म्हणून लय गेलेली नाही तर फक्त लगक्रम बदलला आहे.

लगक्रम बदलणे आणि लय जाणे यात फरक आहे.

संगीतातल कळत नाही पण गुणगुणताना काही ठिकाणी विलंबित तान घेऊन छान जमतेय.. कित्येक गाण्यात असतं कि हो असं. मात्रा वृत्त आहे का ?

सहीच आहे कि गझल.

अनंत ढवळे यांची ही गझल पहा...

मी इतिहासाचा एखादा सांधा बहुधा
माझ्यावरती गतकाळाचा ताबा बहुधा

तुझियासाठी किंचित रडलो आणि वाटले
या ही कर्तव्यातुन झाली सुटका बहुधा

उगाच क्षणभर सळसळली हिरमुसली झाडे
धुळारल्या पानांवर पडला तारा बहुधा

माझ्या गझलेबद्दल लयीबाबत आक्षेप घेणार्‍यांना इथे सर्व व्यवस्थित वाटते. ते भरभरून स्तुती करतात.
अनंतची स्तुती करण्यात मला गैर वाटत नाही. ते तसेच चांगले शायर आहेत.
मात्र मला हे म्हणावयाचे आहे की केवळ नाव पाहून प्रतिसाद देणे आता बंद करा. केवळ कोणालातरी आक्षेप घ्यायचा म्हणून घेऊ नका. निदान स्वतःच्या मतांशीतरी प्रामाणिक रहा.
मी ठळक केलेल्या लगक्रमात आणि माझ्या गझलेतील लगक्रमात फारसा फरक नाही. मात्र सहज विचारलेल्या प्रश्नासाठी डोळा ठेवून काहींनी नाक खुपसलंय आणि नसलेल्या चुका दाखवून स्वतःचे महत्व वाढवायचा प्रयत्न केलाय हे मला पटले नाही. मी कोणीही राम नाही. त्यामुळे मला हे फार सहन झाले नाही. तसेच बेफिकीरपणे ज्ञानोपासना करून मला कोणत्याही कैलासावर माझा झेंडा रोवायचा नाही.
असो. उगाच विषय कशाला वाढवायचा?
ज्याला जे लिहायचे आहे ते त्याने लिहावे. आचार-विचार स्वातंत्र्य आपल्या देशात आहेच.

अप्रतिम
शेरे अन ताशेरे मनावर घेऊ नका.
आमच्या सारख्या फक्त आशयात रस असलेल्यांचे काय होईल तुम्ही थांबवले तर?
हत्ती चालतो--------------

असो. उगाच विषय कशाला वाढवायचा?
>>>

हाच विचार करून शांत होतो. आज दुपारी तुमची खबर घेईन!

लय, छंद वगैरेचं मला फारसं ज्ञान नाही.
पण गझलेचा आशय व्यवस्थित पोहोचतोय..
जोशी लिहायचं थांबवू नका...

मी आपल्या गझलेवर प्रतिसाद देणे थांबवले होते ते याचसाठी की खुल्या दिलाने चर्चा होत नाही. चर्चा करताना अत्यंत कुजकट मतप्रदर्शन, मागचे कुठलेतरी सदर्भ देऊन काहीतरी शेरेबाजी व जो तुमच्याशी बोलत आहे त्याची जाहीर टर उडवणे किंवा त्याची लायकी काढण्याचा प्रयत्न करणे हे आपण नेहमिच करत आला आहात. येथे उपस्थित नसलेल्या अनेक गझलकारांनी इतर संकेत स्थळावर हे पाहिलेले आहे व माझ्याशी चर्चाही केलेली आहे.

मी वर जे म्हणालो त्याची येथेच असलेली उदाहरणे देतो.

पहिले उदाहरणः

कैलास,
लय बिघडली म्हणजे नेमके काय बिघडले? लय बिघडलेली नाही..

...... तुम्हालाही सवय लागली की काय?>>>

येथे लय बिघडणे यावरची चर्चा आपण कैलासरावांना कुणाची तरी सवय लागण्यावर नेलेली आहेत. हा अत्यंत वैयक्तीक स्वरुपाचा शेरा असून यानंतर आपल्याला उद्देशून वैयक्तीक बोलले जाऊ नये अशी कुणीही काळजी घेणार नाही. कैलासरावांना कुणाचीतरी सवय लागणे यत कैलासराव व तो जो कुणी आहे त्याच्याहीवर आपण शेरेबाजी केलेली आहेत. आपल्याला जर केवळ छान छान असे प्रतिसाद हवे असतील तर निदान मला तरी जमणार नाही.

दुसरे उदाहरणः

लय' हा विषय सोडून प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे आभार!>>>

याचाच अर्थ आपल्याला स्तुतीयुक्त प्रतिसाद फक्त हवे आहेत. खुल्या दिलाने चर्चा होऊ शकत नाही.

तिसरे उदाहरणः

लगक्रम बदलणे आणि लय जाणे यात फरक आहे.>>> हे आपण त्या गझलकाराला सांगत आहात ज्याला महाराष्ट्राने गौरवलेले आहे. विविध व्यासपीठांवर! ज्ञानेश हे अनुभवी गझलकार आहेत. लय आणि लगक्रम वेगळे असतात हे सांगताना त्या विशिष्ट शेरात लय कशी जात नाही हे आपण सिद्ध करायला हवे होतेत, असे मला वाटते. निदान ज्ञानेश यांच्याशी बोलताना!

चौथे उदाहरणः

माझ्या गझलेबद्दल लयीबाबत आक्षेप घेणार्‍यांना इथे सर्व व्यवस्थित वाटते. ते भरभरून स्तुती करतात.

अनंत ढवळे यांच्य त्या गझलेतील प्रत्येक शेर लयीत वाचता येत आहे. आपण केलेली तुलना चुकीची आहे व ती कशी चुकीची आहे ते पुढच्या प्रतिसादात लिहिणार आहे.

पाचवे उदाहरणः

मात्र मला हे म्हणावयाचे आहे की केवळ नाव पाहून प्रतिसाद देणे आता बंद करा.>>>

हा आरोप दिशाहीन व बिनबुडाचा आहे. याचजागी आपण डुप्लिकेट आय डी घेऊन हीच गझल दिली असतीत तरी मी तेच म्हणालो असतो. नुकतीच मृणमयी यांची एक गझल वाचली व त्यावर असाच प्रतिसाद दिला. आपल्या गझलेवर नकारात्मक प्रतिसा देणारे आपले नांव वाचून प्रतिसाद देतात असे आपण म्हणता इतके लोक दुधखुळे नसतात.

सहावे उदाहरणः

केवळ कोणालातरी आक्षेप घ्यायचा म्हणून घेऊ नका. निदान स्वतःच्या मतांशीतरी प्रामाणिक रहा.>>

हा सल्ला अनाठायी आहे. मुळात आपण केलेली तुलनाच शुकीची असल्याने प्रतिसादकांच्या प्रामाणिकपणावर ताशेरे ओढणे गैर आहे.

सातवे उदाहरणः

सहज विचारलेल्या प्रश्नासाठी डोळा ठेवून काहींनी नाक खुपसलंय आणि नसलेल्या चुका दाखवून स्वतःचे महत्व वाढवायचा प्रयत्न केलाय हे मला पटले नाही. >>>

आपल्यवर डोळा ठेवायला काय अशी परिस्थिती आहे की काय की आपल्या तांत्रिक चुका दाखवल्य तर कुणी पुरस्कार किंवा ज्ञनपीठ देणार आहे? स्वतःचे महत्व प्रत्येक जणच वाढवतो व हे आपल्या या सातव्या उदाहरणातून स्पष्ट दिसतेच! इथे महत्व हवे आहे कुणाला? जे काही मिळते ते स्वतःच्या लेखनाने मिळते. नुकत्यच मी लिहिलेल्या 'स्स्स्स्स्स्स्स्स' या ललिताकडे एकदा नजर टाका. टोकाची स्तुती व टोकाची टीका असे दोन्ही प्रतिसाद तेथे आहेत. मी टीका करणार्‍यांना स्वतःचे महत्व वाढवणारे म्हंटलेले नाही. आता ललित व गझल यात फरक आहे असा मौलिक सल्ला देऊ नयेत अशी विनंती!

आठवे उदाहरणः

मी कोणीही राम नाही. त्यामुळे मला हे फार सहन झाले नाही. तसेच बेफिकीरपणे ज्ञानोपासना करून मला कोणत्याही कैलासावर माझा झेंडा रोवायचा नाही.>>>

लोक खुळे नाहीत. येथे आडून आडून माझे, ज्ञानेश व कैलास यांचे नांव घेऊन आपण आणखीन एक हिणकस शेरेबाजी केलेली आहेत हे सर्वांना समजतेच! ज्ञानेश, मी व कैलास यांचा काही अजेंडा असेल असा आपला ग्रह असल्यास तो निखालस चुकीचा आहे. लय हा विषय इतक्या हीन थराला नेणे हे आपण पुर्वीही केलेले आहेतच! तेव्हा अधिक बोलत नह. आठ उदाहरणे पुष्कळ झाली असावीत.

असो. उगाच विषय कशाला वाढवायचा?
ज्याला जे लिहायचे आहे ते त्याने लिहावे. आचार-विचार स्वातंत्र्य आपल्या देशात आहेच.>>>

हा मानभावीपणा पहिल्याच प्रतिसादात सुचला असता तर डोकेदुखी कमी झाली असती.

आपल्या गझलेवर पुढचा प्रतिसाद देणार आहे व लयीवर त्याच्या पुढचा!

अजयराव,

येथे कुणीही दुसर्‍याला दुखावून , नकारात्मक प्रतिसाद देऊन काहीही मिळवणार नसतो. स्पष्टच लिहितो, की कैलास किंवा कणखर हे मला शंका विचारतात व जमेल तसे मी शंका निरसन करतो याचा अर्थ मी मायबोलीवर स्वतःचे प्रस्थ वाढवत आहे हा ग्रह सुमार आहे. मला ते मानधन देत नाहीत किंवा मायबोली प्रशासन मला रॉयल्टी देत नाही. जे काही आहे ते आपल्या साहित्य निर्मीतीतून होत असते. नकारात्मक प्रतिसाद मिळवणार्‍यांचा मी राजा आहे. अती झाल्यावरच मी हल्लाबोल केल्याचे आपल्याला माझ्या पाऊलखुणांमध्ये दिसून यावे. पण कुणीही 'फालतू, निरर्थक, चवन्नीछाप, बाष्कळ, टुकार, कुत्र्याप्रमाणे' अशा उपाधीयुक्त प्रतिसाद दिल्यानंतरही मी शांतपणेच सामोरा गेलेलो आहे. तेव्हा वरील 'लय'युक्त प्रतिसादात कुणाचाही काहीतरी अजेंडा असणार हा ग्रह काढून टाकावात अशी विनंती!

-'बेफिकीर'!

तो माझा वाडा होता अन ती वाड्याची खिडकी
अजून जपली हृदयी, होती जरी इमारत गळकी

वाड्यात अनेक बिर्‍हाडे असतात. प्रत्येक बिर्‍हाडाला एक खिडकी असू शकते. आपल्याला कोणत्या खिडकीबाबत म्हणायचे आहे ते काही समजले नाही. यात स्वतःच्या घराची, समोर राहत असलेल्या एकेकाळच्या प्रेयसीच्या घराची, कॉमन संडासची व मालकांच्या दिवाणखान्याची अशा अनेक खिडक्या असू शकतात. आपली नेमकी कोणती आठवण या शेराच्या पहिल्या मिसर्‍यात जागी झाली ते काही समजले नाही. असो! 'अजून जपली हृदयी' या भागात - 'होती' हा शब्द पुढच्या भागातील असल्यामुळे - काळ बदलतो आहे. तो वाडा 'होता'. ती खिडकी 'होती'! इमारत गळकी 'होती'! फक्त सगळे काही 'जपले'! जपली आहे किंवा जपतो आहे असे होत नाही. तेव्हा 'जपतो' हा शब्द योग्य व्हावा. संपूर्ण शेराकडे पाहिल्यानंतर जो अर्थ जाणवतो तो हा की इमारत गळकी असली तरी तो माझा वाडा होता आणि ती त्या वाड्याची खिडकी होती आणि मी हे सगळे उरी जपलेले आहे. यात संवेदना ही, की जुना जमाना आपल्याला आठवत आहे व यात प्रभावी समारोप इतकाच आहे की सगळे आपण उरी जपलेले आहेत. यात इमारत 'गळकी' असणे व वाड्याला 'खिडकी' असणे हे यमकानुसारी आहे जे अजिबातच गैर नाही.

गुणी मुलांनी आपआपले वाटे करून नेले
उरले आई-बाबा, ...विटकी पिशवी, ...वस्त्रे मळकी

उत्तम शेर!

वस्त्रें चमचमती, लखलखते महाल, गाड्या भारी
जगणे राजस, खाणे ताजे; ...तरी मने का कुजकी?

ठीकठाक व टीकात्मक शेर! आशय समानपणे विभागल्यासारखा नाही.

पहा, जगाची रीत अशी, ना कुणी कुणाचा वाली
कुणी नाहते मद्याने तर कुणास नसते 'दिडकी'

ठीकठाक!

जरी दूरच्या देशांमध्ये नाती जोडुन आलो
तरी आपल्या शेजारी का नजर राहते तिरकी ?

तिरकी नजर हे आपण वाकडी नजर या अर्थाने वापरले आहेत. स्वातंत्र्य आपलेच, कुणी विचारलेच तर आपण सांगालच की वाकडीला तिरकीही म्हणतात. (हे विधान मायबोलीवरील वाकडी तिरकी या आयडीला उद्देशून नाही). हाही शेर आवडला.

-'बेफिकीर'!

Pages