विनोदी लेखन

कैच्या कै संगीतिका

Submitted by चिमण on 17 March, 2009 - 08:24

(टीपः- एका बंगल्यात दुपारच्या वेळी निवांत बसलेलो असताना अचानक मागच्या दारातून दोन पाली आणि पाठोपाठ एक सरडा प्रवेश करते झाले. त्यांनी क्षण दोन क्षण थांबून माझ्याकडे पाहीलं आणि लगेच पुढच्या दारातून पसार झाले. यावर आधारित बाकीचा हा कल्पना उल्हास 'काहीच्या काही कथा' असा विभाग नसल्यामुळे इथं टाकला आहे! )

एक आटपाट शेत होतं. शेताला खडबडित बांध होता. त्या बांधाच्या खबदाडीत 'देसरडा' नावाचं सरडा कुटुंब रहात असे. रणबीर हा देसरडांचा एकुलता एक मुलगा. बांधापलीकडे एक बंगला होता. त्याच्या भिंतींवर 'पाल' नावाचे पालींचे कुटुंब विहार करायचे. दीपिका ही पालांची एकुलती एक मुलगी.

गुलमोहर: 

रंग

Submitted by दाद on 9 March, 2009 - 19:25

’मी ना, केस रंगवायचं म्हणतेय.... अगदीच कसेतरीच दिसतायत... तुमच्या लक्षातही आलं नसेल दोघांच्या...’, एका निवान्त गुरूवारी संध्याकाळी मी आमच्या अस्ताव्यस्तं पसरलेल्या कुटुंबात... म्हणजे कुटुंब इन-मिन-तीन माणसांचं...

गुलमोहर: 

निवडुंगाचा गजरा भाग २(अंतिम भाग)

Submitted by देवा on 9 March, 2009 - 11:08

त्या कविसंमेलनातील शेवटचा आणि अखेरचा भाग सादर करतांना मला अतिशय आनंद होत आहे. (जाणकार रसिकांनी मी शेवटचा आणि अखेरचा हे एकाच अर्थाचे दोन शब्द वापरून केलेला क्लेष अलंकार ओळखलाच असेल.. कविसंमेलनाची कृपा)
-----------------------------------------
एका माता असलेल्या कवियत्रींची कविता

कवितेचं नाव: माझं बाळ

माझं बाळ
सुंदर बाळ

माझं बाळ
सुदृढ बाळ

माझं बाळ
गुटगुटीत बाळ

नाही करणार
कशाची आबाळ

माझं बाळ
माझं बाळ

----------------------------------------
एका खगोलशास्त्रीय कविंची कविता

आईनस्टाईनच्या केसांना
आवर घालतांना आणि
गॅलिलिओच्या दुर्बिणीला
भोक पाडतांना

गुलमोहर: 

अंतिम सsप्राईज!

Submitted by चिमण on 9 March, 2009 - 04:52

(टीपः- बरं झालं मी 'ताणलेलं सsप्राईज!' आधी लिहीलं ते. का ते तुम्हाला ह्या 'अनु'दिनीतील निवडक उतार्‍यांवरून कळेल! )

गुलमोहर: 

माझा आवडता पक्षी : कोंबडी

Submitted by roshantembhurne on 9 March, 2009 - 03:59

निबंध :- माझा आवडता पक्षी : कोंबडी

मला सगळेच प्राणी आवडतात. प्राणी खुप चविष्ट लागतात.
कोंबडी विशेषतः अधिक चविष्ट असल्याने माझ आवडता पक्षी आहे.

कोंबडीपासुन वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. मला बनवता येत नाहीत पण खाता येतात.

गुलमोहर: 

मला पंखा मिळाला....

Submitted by mee_na on 6 March, 2009 - 02:36

आम्ही सगळे boston ला फिरायला गेलो होतो. माझ्या नवर्याच्या मित्राकडे जायचा plan ठरला. मी पहिले कधीच भेट्ले नव्हते त्याला आणी त्याच्या कुटुंबाला. अजुन एक दोन कुणीतरी येणार होते. गप्पा रंगात आल्या.

गुलमोहर: 

निवडुंगाचा गजरा

Submitted by देवा on 5 March, 2009 - 22:55

काल मी एका काव्य संमेलनाला उपस्थित होतो. संमेलनाचं नाव होतं 'निवडुंगाचा गजरा'. त्या संमेलनातल्या काही निवडक कविता तुमच्यासमोर सादर करीत आहे. कविंची नावे काही कारणास्तव गुप्त ठेवत आहे.

*नुकत्याच प्रेमात पडलेल्या कविची कविता

गुलमोहर: 

भूषण

Submitted by जयदीप. on 3 March, 2009 - 03:39

एक मुलगा असतो....त्याच नाव असत भूषण.
अगदी साधा सुधा असतो. नेहमी साधे कपडे घालतो..पान्ढरा शर्ट आणी काळी पॅन्ट.

एक दिवस अचानक्.......तो कार्गो पॅन्ट, टी शर्ट वगैरे घालायला लागतो.

तर त्याच नाव काय ठेवायच?

...

...
...
....
....
....
....
....

गुलमोहर: 

पी. जे.

Submitted by उमेश कोठीकर on 3 March, 2009 - 01:39

लांबच लांब
मुंग्यांची रांग
मधेच एक मुंगी.....
अचानक
थांबली...
कारण.......
तिच्या पायाला..
मुंग्या आल्या होत्या!!!

गुलमोहर: 

राऊंड - कॅरी ऑन डॉक्टर..

Submitted by metron on 23 February, 2009 - 10:06

डॉ. विजय भानावर आले तेव्हा आजूबाजूला प्रचंड गदारोळ माजला होता. सगळ्या नर्स इकडे तिकडे धावत होत्या . त्यांना क्षणभर काय चाललंय ह्याचा अंदाजच येईना.

"मेट्रन" त्यांनी हाक मारली.
(इश्श ! काय धाडस तरी बाई ! असं चारचौघात नावाने....)

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विनोदी लेखन