राऊंड - कॅरी ऑन डॉक्टर..

Submitted by metron on 23 February, 2009 - 10:06

डॉ. विजय भानावर आले तेव्हा आजूबाजूला प्रचंड गदारोळ माजला होता. सगळ्या नर्स इकडे तिकडे धावत होत्या . त्यांना क्षणभर काय चाललंय ह्याचा अंदाजच येईना.

"मेट्रन" त्यांनी हाक मारली.
(इश्श ! काय धाडस तरी बाई ! असं चारचौघात नावाने....)
"मेट्रन SSSS"
(हायल्ला ! आज क्या जान लेकर ही रहोगे ) धपापत्या उराने मेट्रन डॉ.समोर हजर झाल्या.
"हा आवाज कसला आहे"
(बाई बाई ! आता धडधडही ऐकू जाऊ लागली की काय )
"अं कसला आवाज ?"
"तुम्हाला हा चाललेला गोंधळ ऐकू येत नाही? लक्ष कुठे असतं तुमचं?"
"आता .. तुमचा राउंड म्हटल्यावर..." मेट्रनचं वाक्य अर्धच राहिलं.

आ...ह्हाSS . हम आपके है कौन मधे माधुरीच्या जांभळ्या एंट्रीला येतो तसा आवाज घुमला वॉर्डभर. सर्वांची नजर दारात उभ्या व्यक्तीवर खिळली. दोन्ही हातात कपड्यांनी भरलेल्या बादल्या , डोक्याला एक मोठ्ठं कापड अशा अर्धविवस्त्र अवस्थेत दारात एक माणूस उभा होता. त्याच्या मागे आणखी एक लहान चणीची व्यक्ती आणि ह्या दोघांना पकडून आणल्याच्या अविर्भावात हॉस्पिटलचा अ‍ॅडमिन ऑफिसर फुसफुसत उभा होता.(खरंतर सरळ सरळ व्यवस्थापक अशी पदवी देता आली असती पण डॉ. ना आपल्याला "अ‍ॅ"डमिन उच्चारता येतं ह्याचा सार्थ अभिमान होता.)

"तिमीर मुखवटे , हा काय प्रकार आहे?" सोल्जर पिक्चरमधल्या जॉनी लिव्हरसारखा हा माणूस कधी निरीक्षक कधी अ‍ॅडमिन ऑफिसर अशा वेगवेगळ्या अवतारात डॉ. ना दिवसभर भेटत रहायचा म्हणून डॉ. नी त्याचं बारसं केलं होतं.

"हे तात्या विंचू , न्हाणीघरात चोरी करत होते " म्हणत मुखवटे ने माधुरीकडे बोट दाखवलं.
"तात्या मी हे काय ऐकतो आहे "
"ह्यात माझी काही चूक नाही. ही दा विंची खोड आहे." तात्यांनी माधुरीचा मिश्किल टोन आणत वाक्याच्या शेवटी फुSस्स पण केलं.
"दा विंची खोड ?"
"होय. माझी बायको , विंची , तिला माझ्याकडून असली कामं करवून घेण्याची खोड आहे"
"विंची? विंची म्हणता बायकोला?चालणार नाही"-डॉ.
"आपण लिंबी अलाउ केलंय " निरीक्षक उर्फ ऍ. ऑ.
"बरं बरं पण हा काय प्रकार आहे? कंबरेचं डोक्याला का बांधलंय? - डॉ. नी राग आळवणं सुरू ठेवलं
"सर पे काफ्तान बांध के निकला हूं हुजूर . व्हॅलेंटाईन चा दिवस आहे. बायकोने छोटी पण मौल्यवान गिफ्ट मागितली आहे. मला दुसरं काही सुचलं नाही. "
"म्हणून हे असं बादल्या भरून?"
"मागच्या व्हॅलेंटाईनला अंदाज चुकला तर एका नांगीने इतक्या ठिकाणी डसली होती की तिला अमिता नांगिया नाव पडलं चाळीत. ह्या वेळी मला असली रिस्क घ्यायची नव्हती."
"आणि तुम्ही हो , खुशाल वरकर्णी , तुम्ही कधीपासून ह्या फंदात पडायला लागलात?- डॉ. नी छोट्याकडे मोर्चा वळवला.
"केवळ समाजसेवा हाच हेतू. मी ह्यांना मदत करत होतो , मदत करता करता माझे काही अनुभव सांगून मनोरंजन करत होतो. पुन्हा असे होणार नाही वाटल्यास शिक्षा तुमच्या एखाद्या फोटोवर २-३ कविता लिहून देतो किंवा व्हाईस वर्सा"
"सध्या तुम्ही खेड्यापाड्यात जाऊन समाजसेवा करा " असे म्हणून डॉ. तात्यांकडे वळले.

"तर असा हा अश्लील आणि निंद्य प्रकार केल्याबद्दल तुम्हाला काय शिक्षा द्यायची ?"
"अश्लील? तुम्हाला फक्त मीच सापडलो डॉ.? तुम्ही जरा वेळी अवेळी राउंड मारत चला. त्या पार्ले बी वाल्यांच्या काय गप्पा चालतात ते बघा. बंदिस्त पाखरं काय , अंथरुण काय "
डॉ. नी मेट्रन कडे रोखून पाहिलं (हाय!)
"हे पार्ले बी काय प्रकरण आहे मेट्रन?"
"ते होय, आपल्या वॉर्डात काहीजणांनी आघाडी उघडलीये . त्यांना सकाळी चहाबरोबर पार्ले जी च्या ऐवजी पार्ले बी बिस्कीटं मिळतात असा त्यांचा आरोप आहे. आता इथे जे काही आहे ते सगळं बी दर्जाचं असणार हे लोकांना माहीत असायला हवं , त्याला काही इलाज आहे का?"
"ते विरोध वगैरे ठीक आहे मेट्रन पण ही अशी भाषा? बंदिस्त पाखरं?
"असं नाही डॉक.(मेट्रन लाडात आल्या) आपल्याकडे कनै बर्‍याच जणांना पक्षी निरीक्षणाचा छंद आहे. तेव्हा अशा गोष्टी , अशा चर्चा होणारच. मागे एकदा अशी तक्रार आली होती तेव्हा तुम्हीच म्हणाला होतात की आपल्या खिडकीच्या बाहेर लोक काय काय बघतात हा आपला प्रॉब्लेम नाही, आठवतं का?"
"अच्छा , असं होय. मग ठीक आहे म्हणजेच तात्यांचा अपराध अक्षम्य आहे त्यांनी अंदर की बात आउटस्कर्ट्सला आणली आहे. आपल्याकडे नग्नता अलाउड नाही , अगदी सत्यासाठी सुध्दा हे त्यांना कळलंच पाहिजे.शंकेला वावच ठेवायचा नाही ह्याला काय अर्थ आहे? आजपासून त्यांना प्रत्येक खेळात लिंबूटिंबू करून टाका"

डॉ. चे वाक्य संपते न संपते तोच एक पौगंड धावत आला." मला लोक त्रास देतात" पालथ्या मुठीने नाक पुसत , पाय आपटत त्याने विधान केलं.

"काय झालं बाळ?"
"आम्ही गाण्याच्या भेंड्या खेळत होतो तेव्हा मला एकदम घाईची चर्चा आली. म्हणून मी अडून बसलो की "तरुण आहे रात्र अजुनी" हे गाणं एक आई आपल्या बाळाला उद्देशून म्हणते आहे तर सगळ्यांनी मला हाकलून लावलं "
"अले अले अशं जालं का? पन आमच्या बालाला अशं का वाटलं ?
"का म्हणजे काय ? आहेच मुळी "
"बलं बलं आपन त्यांचं घर उन्हात बांधू हां तुमी आमच्याबलोबल खेला बगू" डॉ. ना त्याला पुन्हा चर्चा येईल म्हणून भीती वाटली.
"हां मग मी तुम्हाला एक कोडं घालतो. ए , बी सी डी अशी झेड पर्यंत २६ मुलं आहेत. त्यातल्या २५ जणांना बी सतत मूर्ख म्हणतो आणि त्याच्याकडे कुणीही लक्ष देत नाही तर सर्वात मूर्ख कोण?"
"लेट इट बी" म्हणून डॉ. वैतागून पुढे निघाले.

...... क्रमशः ......

गुलमोहर: 

बहोत खूब.. आपल्याला तर शेवटचा भागच जास्त आवडला.

Rofl खलास ! मला पण हा भाग जास्त आवडला Happy

    ***
    जय हो !

    आधीच्या तुलनेत फिका वाटला
    ------------------------
    देवा तुझे किती सुंदर आभाळ

    >>शेवटचा भागच जास्त आवडला
    हा शेवटचा भाग आहे? काबरं?? आणि टण्या हे तुला काय माहित? Happy

    हा शेवटचा भाग आहे? काबरं?? आणि टण्या हे तुला काय माहित?
    >>>
    आधीच्या दोन्ही भागात क्रमशः असे लेखाच्या शेवटी लिहिले होते.. ह्यात नाही, म्हणुन Proud

    'समाप्त' तरी कुठं लिहिलंय? Proud

    हाण तिच्या आयला! काही जाग आवडल्या. विंची, तिमीर मुखवटे वैगरे Happy

    अगदी सत्यासाठी >>

    आजपासून त्यांना प्रत्येक खेळात लिंबूटिंबू करून टाका" >>>> शेवटचा भाग>>>

    गडावरची दुश्मनी गडावर ठेवा. आम्ही लिंबू नाही आहोत. तसेच 'सत्य'मध्ये आणून जो तिर मारत आहात ते ही आम्ही नाही आहोत. सत्यम वाले आमचे मित्र जरुर आहेत.

    पण आता आमचा संशय नुस्ताच बळावला नाही तर बळकट झाला आहे. तुम्ही ते इथे पिंक चड्डी आंदोलन चालविनार्‍यांचे मित्र(च) तर नाहीना?. टोळी करुन सगळीकडे हिंडनारे. आमचा लेख झोंबला म्हणून असे उत्तर दिले की काय? अन पार्ल्यात 'ध' चा 'मा' होतो ते मात्र 'सोयीस्कर्रित्या' विसरलात. शो. ना. हो.

    पुढील लेखाच्या प्रतिक्षेत. Happy

    जबरा आहे की. Proud

    --
    संपलाच नाही, भाकरीचा मार्ग;
    ग्रंथातले स्वर्ग, कशापायी?

    मस्त. Proud
    ----------------------
    एवढंच ना!

    सॉरी पण बोअर आणि पाचकळ वाटला.

    हा भाग नाही जमला पहिल्या दोन भागांइतका .

    राऊंड फारच वाढायला लागल्यामुळे डॉक्टरांचे पाय दुखायला लागले की काय...
    =========================
    रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...

    भले बहाद्दर, आपल्याला हा पण आवडला, येवुंद्या अजुन !!!

    सस्नेह...

    विशाल.
    ____________________________________________

    रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

    http://maagevalunpahataana.blogspot.com

    राऊंड फारच वाढायला लागल्यामुळे डॉक्टरांचे पाय दुखायला लागले की काय... >> नाही मेट्रनचा पाय घसरला Lol

    येउ दे अजुन... अजुन कुठे कुठे काय चालल आहे ते तरी कळेल.. हे तर मला 'सनसनी' सारख वाटत आहे Proud

    तिन्ही राऊंडस वाईट नाहीत पण मला हहची शैली जास्त आवडायची. मला हे वाचायचा कंटाळा यायला लागलाय.

    ब्येष्ट बघा येकदम,अजून येऊ द्या Rofl
    ********************************
    द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

    एकदम फुसका बार झालाय. Sad बोरींग. ओढून ताणून विनोद म्हणून किती करायचा तो.