"काय अप्रतिम आलाय फोटो!... रंग कसले सॉलिड दिसतायेत!... मावळत्या सूर्याचा केशरी गोळा बघ ना, काय छान वाटतो फोटोत...!... आणि त्याचं पाण्यातलं प्रतिबिंब... " मी आनंदून म्हणाले.
यावर, माझ्या एकुलत्या एक श्रोत्याचा म्हणजे माझ्या मुलाचा चेहेरा कोराच! मला नाही म्हटलं तरी रागच आला. आदल्याच दिवशी मी काढलेला तो सूर्यास्ताचा फोटो इतका सुंदर आला होता पण जरा कौतुक होईल तर शप्पथ!
"मी काढलाय ना हा फोटो! नाहीच आवडणार तुला... तू काढलेल्या फोटोंचं मात्र मी अगदी तोंडभरून कौतुक करायचं... " मी जरा घुश्श्यातच त्याला म्हटलं.
रोजच्यासारखीच एक घाईगर्दीची सकाळ. नवरा ऑफीसला निघून गेलेला होता; माझ्या कामांचं पहिलं सत्र आटोपलं होतं. (रोजच सकाळी नवरा एकदा(चा) घराबाहेर पडला की मला उगीचच एखादा गड सर केल्यासारखं वाटतं.) थोड्याच वेळात माझ्या तीन-चार वर्षांच्या मुलाला शाळेत सोडायला जायचं होतं. माझी कामाची घाई आणि त्यात मुलाची लुडबुड सुरू होती. त्याच्याबरोबर काहीतरी गाणी म्हणत, बडबड करत मी आता त्याचा किल्ला लढवत होते. मध्येच तो थोडा वेळ दुसऱ्या खोलीत जायचा आणि काही न सुचल्यासारखा परत यायचा. असं तीनचारदा झालं आणि अचानक त्यानं मला प्रश्न केला - "आई, चिमणी का असते गं? "...
डिक्लेमर : ज्यांना पिझ्झा आवडतो आणि करायची इच्छा आहे त्यांनी आवर्जून वाचावे आणि ज्यांना आवडत नाही पण करायची इच्छा आहे त्यांनी ही वाचावे पण ज्यांना दादरच्या प्रकाश हॉटेलमधील भाजणीचं थालीपीठच फक्त आवडतं...
वाक्यातल्या एखाद्या मुद्यावर भर द्यायचा असेल की आपण ’च’ किंवा ’सुद्धा’ असे प्रत्यय वापरतो. मराठी भाषेतल्या या ’च’च्या प्रत्ययाकडे फारसं कुणाचं लक्ष जात नाही. पण हा प्रत्यय ’लई पॉवरबाज’ आहे असं माझं मत आहे.
कॉलेजात असताना मी भरपूर लांब केस ठेवले होते. रस्त्यात पोरी देखील वळून वळून बघत असत. त्या नजरा मत्सराच्या होत्या की 'काय ध्यान आहे' अशा अर्थाच्या होत्या यावर विचार करून मी त्रास करून घेत नसे.
(वैधानिक इशारा(?) : क्लास लावून कार चालवायला शिकताय? किंवा शिकायचा विचार करताय? तर हा लेख आपापल्या जबाबदारीवर वाचा. याआधीच क्लासला जाऊन कार चालवायला शिकला आहात? मग हा लेख बिनधास्त वाचा. तुम्हाला पुनःप्रत्ययाचा आनंद देण्याची जबाबदारी माझी.)
’तुझ्या पासपोर्टसाठी फोटो काढून आणले नाहीस तर... तर माझ्याबरोबर नेणार नाही.’, मला अजून नवर्याकडून असल्या निकराच्या धमक्या मिळतात.
’नेताय कसले? मला चढूच देणार नाहीत विमानात’, मी अक्कल पाजळली.
भारताला स्वातंत्र्य मिळून साठ वर्षे होऊन गेली असली तरी इंग्रजांनी मागे ठेवलेली इंग्रजी भाषा आजही आपल्या माय मराठीवर आक्रमण करते आहे. किंबहुना 'माय मराठी' आता 'My Marathi' झाली आहे. "तुझा काय प्रॉब्लेम आहे?
'स्त्री' मासिकाच्या ऑगस्ट-२०११च्या अंकात हा लेख प्रकाशित झाला.
------------------------------------------
खाद्यपदार्थांच्या काही जोड्या या ऐकताक्षणी विजोड वाटतात. जसं पिठलं-पोळी. म्हणजे, वेळप्रसंगी भुकेला ही जोडी काही वाईट नाही पण पिठलं-भाकरी ची मजा त्यात नाही हे ही खरं. आमटीभात किंवा आमटीभाकरी खाणाऱ्याला पोट भरल्याचं समाधान नक्कीच वाटेल. पण आमटी-ब्रेड? झालं ना तोंड वाकडं? चिवड्यावर दही किंवा ताक अनेकजण घेतात पण चिवड्यावर दूध कसं लागेल? किंवा चकली दुधात बुडवून खाल्ली तर? तर काही नाही; फक्त दिवाळी, फराळ आणि एकंदरच मराठी खाद्यसंस्कृतीचा बट्ट्याबोळ ठरलेला!