माझे विनोदी लेखन

Submitted by tayadeashwin on 23 August, 2009 - 02:16

मला लिहिण्याचा नाद अगदी बाल वयापासून च लागला.नाहिम्हट्ल तरी माझ्या वयाच्या मानाने मी चांगले लिखाण करतो ,असा माझा समज झालेला!!! तो का झाला? हा कदाचित संशोधनाचा विषय ठरू शकेल.

ते काहीही असो पण माझे लिखाण हे अगदी जोरात सुरु होते .प्रेमकविता , शेतकर्यांच्या समस्या, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार......माझा सध्याच्या परिस्त्थितिवर असलेला राग की मी स्वतः काहीच करू शकत नाही ही जाणीव, माझे लिखाण मात्र अगदी समृद्ध करीत होती.

वयापरतवे लिखाणात थोडाफार सुधार झाला , शब्दांचा खजिना वाढला अणि अणि माझे लिखाण अजुन जास्त वाचनिय होऊ लागले!!! हा तसा माझा समज (हो पुन्हा एकदा!!!!! )

विनोदी लेखन या एका प्रकारापासुन मात्र नि बराच लांब राहिलो. प्रयत्न केला नाही अस नाही पण त्याचि मजल "एक चांगला प्रयास" याच्यापुढे काही गेली नाही. प्रतिक्रिया देणारे सुध्दा अगदी सावध, म्हणजे कस "अश्विन, छान लिहिले आहेस रे, नविन प्रयत्न.... विनोदी लेखन!!! छान आहे" अस म्हण्ताना अगदी सत्यजीत रे यांचा एखादा गंभीर चित्रपट बघितल्या सारखे भाव आणायचे.
आता पु ल देशपांडे आणि प्र के अत्रे या दोघांनी जर विनोदी लेखणांचे झेंडे अशा काहि उंची वर नेवुन ठेवले आहे कि तेथे जातांना माझ्यासारख्या पामराच्या तोंडी फेस येनार आणि मि पुन्हा माझी हतबलता च पांढर्‍यावर काळी करनार, ह्यात माझा दोष तो काय?
पण अस म्हणताना माझे इतर लेखन मि अगदीच विजय तेंडुलकरांच्या छ्त्रछायेतच केल अस मी कदापिही म्हनणार नाही (असा माझा स्वता: चा समज झालेला असला तरिही!!!!!!!).
"हे , जे काही आहे ते चांगल आहे, पण पु ल ची मजा नाही!!" अशी प्रतिक्रिया देन म्हणजे भारताचे चंद्रायान बरं आहे पण ते अपोलो १३ होते ना ते फार छान होत अस होइल. अरे!!, ते US of A आहे आणि आम्हि विकसनशिल भारत, आम्ही आमच्या बळावर यान बनवल ते काय कमी होय??
असो माझे विनोदी लेखन हे अस अगदी टोकाच्या टीकेला बळी पडलेल. पण अशा टीकेला भीक न घालता मि माझे अनोखे असे विनोदी लेखन सुरुच ठेवनार आणि सत्यजीत रे ते चार्ली च्यापलीन हा खड्तर प्रवास मि नक्किच पुर्ण करनार!आणि या माझ्या विनोदी लढाईत तुमच्यासारखे असंख्य दर्दि वाचक मला साथ देतील, असा या एका (छे!!Struggling चा मराठी .....काय होता??????) लेखकाचा झालेला समज.

अश्विन.२३.०८.०९

मायबोली वरचा पहिलाच प्रयत्न.....

गुलमोहर: 

अश्विन..
तुम लिखते रहो.. हम पढते रहेंगे..
और हसाओगे तो हसते रहेंगे.. Happy

तुम्हाला पुढील लेखनाकरता शुभेच्छा ..

मला वरचे वाचुन पुलंच्या (सॉरी!!! Happy ) वार्‍यावरची वरात मधल्या त्या वार्षिकोत्सवातले भाषण आठवले.
"आजचे पाहुणे हे खुप विनोदी आहेत. ते आपल्याला वाक्यावाक्याला हसवतील. तरी सर्वानी हसुन त्याना सहानुभूती दाखवावी" Happy

अश्विन,
तुम्हाला पुल /अत्रे वगैरे लोकांमुळे काळजी करण्याची गरज नाही. मायबोलीवर "येडा का खुळा" आणि "चिमण्यागोखले" या आयडी नी लिहिलेले वाचावे. मला स्वतःला पुल सोडता इतरांचे विनोदी फारसे आवडत नाही पण हे दोन आणि मायबोलीवरचे इतर काहीनी लिहिलेले मला खुप म्हणजे खुपच आवडले. इथे साधारणपणे कोणी तुमची कोणाशी तुलना करणार नाही. तुम्ही "चांगले" विनोदी लिहिल्यास तुम्हाला दाद नक्की मिळेल. गंभीर लिहिण्यापेक्षा विनोदी लेखन हे खुप कठीण आहे हे मात्र लक्षात ठेवा.

तुम्हाला लिखाणास शुभेच्छा!