Submitted by श्रीकांत on 25 December, 2009 - 17:10

श्लेष अलंकाराच्या अशा उदाहरणा सारखी माहिती देऊन व्याकरण शिकवले तर मराठी व्याकरण मुले आयुष्यभर विसरणार नाहीत असे माझे मौलिक मत आहे. मनसे च्या भावी शिक्षण मंत्र्याना सांगायला हवे.!!
गुलमोहर:
शेअर करा
अप्रतिम मस्तचं आहे व्याकरण
अप्रतिम
मस्तचं आहे व्याकरण शिकवन्याची पद्धत.. आज मला श्लेष अलंकार समजला.. आणि मि आता तो कधीही विसरणार नाही
श्रीकांतजी, तुम्हालाच शि.मं.
श्रीकांतजी, तुम्हालाच शि.मं. करायला हवं खरं तर!
भ्रमरला अनुमोदन!! शरद
भ्रमरला अनुमोदन!!
शरद
हा धड विनोदही नाही. कोटीही
हा धड विनोदही नाही. कोटीही नाही. श्लेष तर मुळीच नाही.
अगदी व्याकरणाच्या अर्थाने पाहिले तरी 'मि' पहिला की दुसरा . आता मि मध्ये आहे वेलांटी . तीच पहिली अथवा दुसरी असू शकते. पुल्लिंगी जर असेल तर उकारच असू शकतो. तो तिथे नाही. म्हणजे हा ओढून ताढून केलेला विनोदही नाही. वास्तविक हा प्रश्न तिने विचारायला पाहिजे होता. मिठीतली 'मि' पहिली की दुसरी.? मग त्याने काय असेल तो 'नॉन झिरो पॉझिटीव्ह रिअल नम्बर' सांगायला पाहिजे होता.
बाय द वे , आमच्या ऑफिसमध्ये सौ. लता तुकाराम *** नावाची कलीग होती. तिला आम्ही 'तुकारामाची तु पहिली की दुसरी? ' हा प्रश्न विचारत असू. आणि ती' पहिली, पहिलीच' असे ठासून उत्तर देत असे
रॉबीनहूड सही!!!
रॉबीनहूड
सही!!!
इथे स्वतःचं साहित्य अपेक्षित
इथे स्वतःचं साहित्य अपेक्षित आहे ना?
<< अप्रतिम मस्तचं आहे व्याकरण
<< अप्रतिम
मस्तचं आहे व्याकरण शिकवन्याची पद्धत.. आज मला श्लेष अलंकार समजला.. आणि मि आता तो कधीही विसरणार नाही >>
..मि पण आता कधीही विसरणार नाही. व्वा मजा आली.
रॉबिन्हूडजी,
हा प्रसंगानुरुप विनोद असेल. 'अशा' प्रसंगी बुद्धी भानावर असते काय व्याकरण शोधित बसायला?.
जावे त्याच्या वंशा.....!
आपण फक्त आनंद लुटायचा!
आपण फक्त आनंद लुटायचा! व्याकरण शोधायचं नाही. तसा श्लेषाचा इथे काडीमात्र संबंध नाही.
रॉबिन हुड चा विनोद तर मूळ मिठीपेक्षा भारी!
व्वा!!
शरद
हो का?? बरं झालं सांगितलंत
हो का??
बरं झालं सांगितलंत की इथे श्लेषाचा संबंध नाहिये ते... उगीचच कोणाला हे उदाहरण दिलं असतं नाहीतर
हूड बरोबर लिहिलेत.
हूड बरोबर लिहिलेत.
हे महाशय बहुतेक मुंबैच्या
हे महाशय बहुतेक मुंबैच्या मिठीत विसावले असावेत.
रॉबीनहूड अनुमोदन
रॉबीनहूड अनुमोदन
सर्वप्रथम प्रतिसादांसाठी
सर्वप्रथम प्रतिसादांसाठी आभार!,
धनुडी यांचे बरोबर आहे. इथे स्वत:चे लिहिलेलेच प्रकाशित करणे अपेक्षित आहे.म्हणूनच संपादन टिप्पणी मधे संपादकांना मी तसे स्पष्ट लिहिलेही की हा फोटो/चित्र मला एका मित्राने पाठवले आहे धोरणात बसत नसेल तर अप्रकाशित केले तरी चालेल.( चित्रा खालची टीप मात्र माझी आहे.मला मिळालेला आनंद मायबोली करांनाही मिळावा एवढाच हेतू.)
आता श्लेष आहे की नाही त्या बद्दल. मराठी विकि वर मला खालील माहिती मिळाली सोयी साठी डकवतोय. ती वाचून आपले आपण ठरवा.(व्याकरणाचा क्लास घेणे हा हेतू नाही.तज्ञांनी विकिमराठीत भर घालावी.)
श्लेष:
एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो.
उदा: सूर्य उगवला झाडीत...
म्हारीण* रस्ता झाडीत...
शिपाई गोळ्या झाडीत...
अन् वाघहि तंगड्या झाडीत...
राम गणेश गडकरीकृत हे एक "झाडीत" या शब्दावरील श्लेषाचे उदाहरण
* जातीयवाचक शब्दाबद्दल क्षमस्व. आहे तसे लिहिले आहे.
[संपादन] शब्दश्लेष
* वाक्यात दोन अर्थ असणार्या शब्दाबद्दल दुसर्या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष कायम राहिला तर त्यास अर्थश्लेष म्हणतात अन्यथा त्यास शब्दश्लेष म्हणतात.
उदा: मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही?
मित्र- सूर्य/सवंगडी
[संपादन] अर्थश्लेष
वाक्यात दोन अर्थ असणार्या शब्दाबद्दल दुसर्या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष कायम राहिला तर त्यास अर्थश्लेष म्हणतात अन्यथा त्यास शब्दश्लेष म्हणतात.
उदा: तू मलिन,कुटिल,नीरस जडहि पुनर्भवपणेहि कच साच कच - केस/कच हा हा
[संपादन] सभंग श्लेष
उदा: श्रीकृष्ण नवरा मी नवरी
शिशुपाल नवरा मी न-वरी
कुस्करू नका ही सुमने
जरी वास नसे तिळ यांस, तरी तुम्हांस अर्पिली सु-मने
ते शीतलोपचारे जागी झाली हळूच मग बोले
औषध नलगे मजला, परिसुनि माता 'बरे' म्हणुनि डोले
सहज आठवले, शब्दाचे दोनच अर्थ असावेत असे नाही तीनही असु शकतात. उदा.शंकरास पुजिले सुमनाने येथे सुमन- फूल/ चांगले मन/ सुमन नावाची व्यक्ती.
श्रीकांत, वर दिलेली सर्व
श्रीकांत,
वर दिलेली सर्व उदाहरणे मला मान्य आहेत.
माझा आक्षेप फक्त "मिठीतली मी पहिला की दुसरा" याला आहे. यात कुठे श्लेष येतो? "तुकारामाची तू पहिली की दुसरी" यात श्लेष जरूर आहे. "मिठीतली मी पहिली की दुसरी?" "नव्हे तिसरी" असे लिहिले असते तर तो श्लेष अलंकार झाला असता.
उगाचच काहीही लिहायचे आणि ते मान्य करा असे म्हणायचे याला काय अर्थ आहे?
शरद