डोक्याला झीट आला इतिहासात जावून. हे वाच ते वाच. टिपण काढ, सनाव़ळ्या शोध. आणि इतकं करून काय तर एकमत नाहीच. काल बाजारात सोनं मोडायला गेलो तर सराफ म्हणतो हे सोनं नाही. च्यायला, रोकडा मोजून घेतलं आणि हा म्हणतो सोनं नाही ? तासभर वादावादी झाली. शेवटी स्वभाव आडवा आला. निमूट त्याचे म्हणणे मान्य करून घट पदरात घेतली. आमच्या म्हणण्याला विच्चारतंय कोण..
लहानपणापासून शिकलो , शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव. बालभारती मधे चांगली चित्र काढली होती. बालशिवाजी अस्सा हातात तलवार घेऊन उभा आहे, त्याच्या मागे दादाजी ( दादोजी नाही ) कोंडदेव वाकून त्याला तलवार हातात कशी धरायची हे शिकवत आहेत. गुरूजी मग रसाळ वाणीने वर्णनं करीत.. दादाजी आणि शिवाजीच्या गोष्टी रंगवून सांगवत. दादाजींनी आत्मक्लेष केला कि शिवबाच्या डोळ्याला पाणी येई आणि हे ऐकताना आमच्या डोळ्यातून धारा वाहत असत.
भालजीं पेंढारकरांचा शिवकालीन सिनेमा टीव्हीवर असला कि बॅटींग सोडून टिव्ही बघायला जायचो. घरी टीव्ही नव्हता. ऐपत नव्हती. मग कुणातरी ओळखीच्याचा घरात घुसायचे. त्यांच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करून सिनेमा बघायचा.. अशाच कुठल्या सिनेमात दादाजींना आदिलशहाने कैद केलेले असते. शिवरायांना महत्त्वाच्या स्वारीवर जायचे असते. तिकडून दादाजींचा या परमप्रिय शिष्याला निरोप येतो.." माझी काळजी नसावी, स्वराज्य थोर आहे ". राजांना भरून येते. पण मांसाहेबांना हे मंजूर नसते. त्या राजांच्या वर्मी लागतील असे बोल सुनावून स्वतःच दादाजींच्या सुटकेसाठी निघतात.
राजांना हे समजताच ते मोहीम सोडून मासाहेबांच्या मागे निघतात. तिकडे त्या ही कैद होतात आणि नंतर महाराज आणि त्यांचे मावळे खुबीने कदींची सुटका करतात. त्यावेळच्या प्रसंगात शिवबा मासाहेबांना म्हणतात.. मासाहेब आपण कशा आहात ? आम्हाला काळजी लागली होती !!
मासाहेब नाराजीने म्हणतात.. ज्यांनी या स्वराज्याची प्रेरणा दिली ते कैदेत असताना राजे तुम्हाला काहीच कसे वाटले नाही..???
( ऐसे कैसे चलेगा.. मासाहेब क्या बात है... बराबर पाईंट हय आपका .. अब बोलो राजे.. हय क्या जवाब ?)
असे शदाब्बाळ संवाद होऊन सर्व पात्रांना आणि प्रेक्षकांना गहिवरून येते आणि दादाजींचे महत्त्व उराशी बाळगूनच आम्ही भारावलेल्या अवस्थेत बाहेर पडत होतो...
आणि आज हे एका क्षणात खोटे झाले ? हाय रे दैवा... ये क्या हुआ ? हम हम नही कोई और है ? असं वाटतंय आताच कुणीतरी सांगेल बेटे तुम हमारी सगी औलाद नही हो !!!
सगळं जग गरगरतंय...!!
ए भाय .............ए भाय .. ......अरे सुन.... सुन वो क्या बोल रहा है !
"महाराजांना शस्त्रविद्या कुणीतरी शिकवलीच असेल ना ? आईच्या पोटातून तर कुणी शिकून नाही ना येत"
प्वाईंट है बॉस.... कशाला कोण खोटं बोलल.
दादाजी असतील नक्कीच गुरू. त्यांनीच शिकवलं शिवबाला. विचारा भालजींना
पण साला ..........या डोक्यात आता नवाच प्रश्न फिरतोय..
या दादाजींचे गुरू कोण होते ?
उनको किसने सिखाया होगा ?
Kiran
लोक्सहो विनोदी लिखाण या सदरात
लोक्सहो
विनोदी लिखाण या सदरात हा लेख पाहून काही अपेक्षा ठेवूनच तुम्ही वाचले असणार.. पण काय करू? त्रागा, आत्मक्लेष असा विभाग काही सापडला नाही. मग म्हटलं जो लेख कुठंच खपत नाही तो निओदी या सदरात नक्कीच खपून जाईल.. आता मला सांगा हा लेख कुठल्या सदरात पोस्ट करायला पाहीजे होता ?
वरील पोस्टही प्रतिसादाची
वरील पोस्टही प्रतिसादाची भवानी म्हणून टाकली आहे. मनावर घेऊ नये.
कळावे
आपला नम्र
किरण
दादोजी कोंडदेवांचे गुरू कोण
दादोजी कोंडदेवांचे गुरू कोण होते ? >>>
त्यांचे " पा " .
(No subject)
:) हम्म.. आवडेश!
हम्म.. आवडेश!
>>>>>> शिवाजी महाराजांनी
>>>>>> शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासांचा अनुग्रह घेतला होता. त्यामुळे रामदास हे त्यांचे आध्यात्मिक गुरू ठरतात.
माफ करा, पण सध्याचे राष्ट्र(?) वादी(??) व त्यान्चे बगलबच्चे(???) यान्चे राजकारण गेल्या काही वर्षात वेगळेच शिजते आहे ते असे की "रामदास नावाच्या गोसावड्यचा" शिवाजी महाराजांशी काहीही सम्बन्ध नव्हता! अन इतिहासात जे काही लिहीले आहे तो "बामणी कावा" आहे!
सबब माझी अशी विनन्ति की "राजान्चे अद्यात्मिक गुरु कोण?" असा अजुन एक बीबी प्रस्तुत लेखकाने "विनोदी" लेखनात सुरू केला तरी सहज खपेल
(No subject)
<<असा प्रश्न का बरे या
<<असा प्रश्न का बरे या लोकांच्या मनात येत नाही? >>
जर टाळक्यात अक्कलच नसेल, तर असे प्रश्न मनात उद्भवतच नाहीत.
जे जे लिहीले आहे ते खोटे आहे कारण ते 'बामणांनी' लिहीले. असे म्हंटले की झाले!
ब्राह्मण सुस्थितीत आहेत याचा नुसता हेवा, मत्सर करायचा. स्वतः तसे होण्या ऐवजी त्यांना खाली ओढायचे! टाळके रिकामे असले की एव्हढाच मार्ग सुचतो.
<< ब्राह्मण सुस्थितीत आहेत
<< ब्राह्मण सुस्थितीत आहेत याचा नुसता हेवा, मत्सर करायचा. स्वतः तसे होण्या ऐवजी त्यांना खाली ओढायचे! >>
हे फक्त विशेष वर्गासाठी म्हणुनच नाही तर आमची एकुनच वैचारीक दिशा श्रेष्टांचे अनुकरन करुन काही आत्मसात करण्याऐवजी त्यांचे पाय ओढुन मागे खेचुन त्यांना आपल्यापातळीवर आणण्याकडे असते.
दादोजी कोंडदेव हे
दादोजी कोंडदेव हे शिवाजीराजांचे गुरू म्हणण्यापेक्षा प्रशिक्षक/मार्गदर्शक म्हणणे जास्त चांगले ठरेल.
गुरु, प्रशिक्षक, मार्गदर्शक........... आता यात फरक कसा ओळखायचा? बहुतेक गुरु म्हणजे हेडमास्तर, प्रशिक्षक म्हणजे पीटी टीचर आणि मार्गदर्शक म्हणजे इतिहासाचा मास्तर....... असे असावेसे वाटते...
अरे वा ! प्रतिसाद मिळाले...
अरे वा !
प्रतिसाद मिळाले... गहिवरून आले. पण थांब बेट्या किरण्या.्उरळून जाऊ नकोस. ही दाद तुझ्या लिखाणाला नसून विषयाला आहे. सर्वांचे विचार वाचले आणि सर्वांचेच विचार पतल्याने आणखीच गोंधळ झाला आहे..या गोंधळात माझा मूळ प्रश्न बाजूलाच राहीला कि हो...
दादाजींचे गुरू कोण असा प्रश्न आहे लोक्सहो.
दादाजींचे गुरू शहाजीराजे होते असे कुणीतरी म्हटलेय. म्हणजे बाल दादाजीला शहाजीने शस्त्रविद्या शिकवली आणि तो मोठा झाल्यावर सैन्यात भरती केले आणि अनुभवी झाल्यावर बाल शिवाजीला ट्रेनिंग देण्यासाठी पाठवले असे म्हणायचे का ?
मग राजे जन्माला आले तेव्हा. शहाजीराजांचे वय काय असावे ? एक नवा प्रश्न !
(No subject)
(No subject)
गुरु ही विशाल संकल्पना आहे...
गुरु ही विशाल संकल्पना आहे...
स्वरांची ओळख करुन देणारा काय आणि गळ्यामध्ये संगीत संक्रमित करणारा.... दोघांबाबत आदर तर तुम्ही तेवढाच करणार ना? का बालवाडीची बाई आणि कॉलेजमधील प्रोफेसर यांच्यात एकाला गुरु आणि एकाला प्रशिक्षक मानून एकाला हात जोडून नमस्कार आणि दुसर्याला साष्टांग दंडवत असे काही करायचे असते का, हा माझ्यासमोर पडलेला प्रश्न आहे.
गुरु ही विशाल संकल्पना आहे. पण गुरु व्हायला फार विशाल बडेजावाची गरज नसते हेही आपलीच संस्कृती सांगते... अन्यथा १-२ मिनिटांच्या नुसत्या निरिक्षणाने दत्तगुरुनी केलेले २४ गुरु अर्थहीन ठरतील.... त्याना गुरु न म्हणता मार्गदर्शक/परिक्षक्/निरिक्षक्/समन्वयक/शिक्षक/.... असे काहीतरी म्हणावे, पण गुरु मात्र म्हणू नये.... म्हणून आणखी एक धागा उघडेल कुणीतरी.........
रामदासांच्याबाबतीत असाच एक धागा पूर्वी इथे झाला होता.... लिन्क मिळाली तर देईन....
प्रयोगभाऊ चालू द्या चालू
प्रयोगभाऊ
चालू द्या चालू द्या... !! अधून मधून हजेरी लावून जाईन म्हणतो. ईतिहास म्हटले कि ती जाडजूड छडी आणि हातावरचे वळ आठवतात. त्या वेदना आजही विसरलेलो नाही.. आणि माराचे जाऊ द्या हो
बाकिची पोरं हसायची त्याचा लई राग यायचा ..आणि त्यात वर्गात मुली पण होत्या !!
असले प्रश्न पडण मात्र थांबलं नाही अजून !
का बालवाडीची बाई आणि
का बालवाडीची बाई आणि कॉलेजमधील प्रोफेसर यांच्यात एकाला गुरु आणि एकाला प्रशिक्षक मानून एकाला हात जोडून नमस्कार आणि दुसर्याला साष्टांग दंडवत असे काही करायचे असते का, हा माझ्यासमोर पडलेला प्रश्न आहे. ::-)
<<शहाजीराजांचे वय काय असावे ?
<<शहाजीराजांचे वय काय असावे ? एक नवा प्रश्न !>>
यात वयाचा संबंध नाही. जरी दादाजी शहाजीच्याच वयाचे असले तरी शहाजी त्यांना शिकवू शकतात. लक्षात घ्या की आत्तासारखे पाच सहा वर्षाचे झाल्यावर आपो आप कुणि शाळेत जात नसत. त्यामुळे अगदी वीस वर्षाचे होइस्तवरसुद्धा दादाजींना काही शिक्षण मिळाले नसण्याची शक्याता आहे. शहाजी मात्र श्रीमंत घरातले असल्याने त्यांच्या शिक्षणाची सोय लहानपणापासून झाली असण्याची शक्यता आहे.
पुढे पाच सहा वर्षात्त शहाजींनी त्यांना शिकवले. शिकण्याची आवड असेल, नि बुद्धी चांगली असेल तर आवश्यक त्या गोष्टी शिकता येतात. दादाजींचि आई काही असे म्हणाली नसेल की सारखा अभ्यास करू नको, जरा व्हिडिओ गेम्स खेळ, क्रिकेट खेळ, टीव्ही बघ, दुपारचा झोपत जा जरा! शिवाय शिक्षण काहि नुसतेच पुस्तकी नव्हते.
झक्की त्या काळी आरटीओ
झक्की
त्या काळी आरटीओ नसल्यानं अठरा वर्षे झाल्याशिवाय कुणी कुणाला काही शिकवू नये असा नियम नसण्याची दाट शक्यता तुम्ही वर्तवली आहे. म्हणजे शहाजी घरातून शिकून यायचे, दादाजींना आवाज द्यायचे कि लगेच दोघे पटांगणात जाऊन तलवार तलवार खेळत बसायचे.. असंच असल.
पण मग शहाजीराजांचे गुरू कोण ??
असं तर नसंल ?
शहाजी आणि दादाजी या दोघांना दादाजींच्या पिताश्रींनी शस्त्रविद्या शिकवली असेल ? नाही म्हणजे शक्यता नाकारता येत नाही ना..
शिवाजी-दादोजी-शहाजी-दादाजीचे
शिवाजी-दादोजी-शहाजी-दादाजीचे पा.................. असं मागं मागं जात राहिलात तर डार्विनच्या पहिल्या माकडाजवळ एक दिवस नक्कीच जाल..... ! शुभेच्छा!!!!
डार्विनचा
डार्विनचा ............................ ?
शहाजी मात्र स्ह्रीमंत घरातले
शहाजी मात्र स्ह्रीमंत घरातले
>>
तुम्हाला नीट लिहिता येत नसेल तर इथे विद्वज्जनात कशाला लुडबुडायला येता हो ?
<विषय सोडून भलतेच
<विषय सोडून भलतेच काहीतरी>
याला मराठीविषयी वाटणारी कळकळ म्हणायचे की वैयक्तिक डूख?
< /विषय सोडून भलतेच काहीतरी>
डार्विनचे माकड... इतिहासात
डार्विनचे माकड...
इतिहासात मागं मागं जात राहिलं तर एक दिवस माणूस ज्या माकडापासून उत्क्रांत झाला , तिथे आपण पोहोचणार, म्हणून डार्विनचे माकड असे लिहिले.
मी विचारले डार्विनचे गुरू
मी विचारले
डार्विनचे गुरू कोण..
ओह, माझा गैरसमज झाला...
ओह, माझा गैरसमज झाला...
विनोदाचा भाग सोडला तर
विनोदाचा भाग सोडला तर एकनाथांनी गुरुची जी लक्षणे सांगितली आहेत ती लक्षणीय आहेत. सम्पूर्ण कविता पुस्तक सापडल्यावर टाकीन..
'' जयापासुनि घेतला गुण, तो म्यां गुरु केला जाण,
गुरुस आले अपारपण , जग सम्पूर्ण गुरू दिसे''
एकनाथ.
.
.
रॉबिन, मान्य, सपशेल मान्य!
रॉबिन, मान्य, सपशेल मान्य!
मी तर पावलोपावली भेटणार्या अशा प्रत्येक गुरुसमोर "मनोमन" नतमस्तक" होत असतो
मुद्दा वेगळाच
रामदासान्नी (की कुणीतरी?) मूर्खान्ची लक्षणे सान्गितली आहेत, तसेच कुणी "कृतघ्न" माणसाची काही लक्षणे सान्गितली असतील अन ती या किरणच्या वाचनी येती, तर त्यास हा बीबी उघडण्ञाची गरज न पडती! बरोबर ना?
गन्गाधर मुटे यान्नी मान्डलेला पाय ओढण्याचा मुद्दा हा "कृतघ्नतेची" पुढची पायरी म्हणून ओळखायला कुणाची हरकत नसावी, अन तसे असेल, तर याच समाजात अमिबाप्रमाणे हाडीमाशी खिळलेल्या या कृतघ्नतेच्या रोगास कोण बरे करु शकेल?
हे हे हे हे लिंबूटिंबू आमची
हे हे हे हे लिंबूटिंबू
आमची सवय काही जात नाही हो.. कुणावरही विश्वास ठेवतो आम्ही !
श्रीमान योगी वाचतानाही दोन पात्रातले संवाद खरंच लेखकाने ऐकले असावेत यावर आमचा पूर्ण विश्वास आहे..
बाकि कसे काय चाललेय ?
गेल्या वेळेला तुमच्या अपेयपानाचे बिल मीच दिले आणि तुम्हाला घरी पोहोचते केले..आता यात कॄतघ्नता कुठून आली बुवा ?
आणि आता यांत नारायण ठोसर पण घुसवले का तुम्ही !!
( आमच्या प्रश्नाबाबत कुणी समाधानकारक उत्तर देईल असे वाटत नाही...इथे लोकांना महाराजांचे गुरू शोधण्यात रस दिसतोय )
अवांतर : आमच्या मागच्या आळीत दरोडा पडला. घर धुवून नेलं चोरांनी..चोर कोण ते माहीत आहे, उजळमाथ्याने फिरतात , चांगले सुस्थितीत दिसतात..पण ब्र काढायची सोय नाही बघा... काही बोलायला गेलं तर म्हणतात... काय म्हणत असतील हो ? तुम्हाला कल्पना असेलच ना? काढा कि धागा !!
गेट वेल सून ..!!
गेट वेल सून ..!!
Pages