... अशीही उत्तरे-भाग-२
.... थोडक्यात उत्तरे लिहा ....
प्रश्न - आपले नांव सांगा ?
उत्तर - श्यामला तात्याविंचू चावला.
प्रश्न - पृथ्वीचे खंड किती व कोणते ?
उत्तर - सात. एखंड,श्रीखंड,भुखंड,दोरखंड,रेवाखंड,झारखंड आणि उत्तराखंड.
प्रश्न - महासागराची नावे लिहा ?
उत्तर - नवसागर,गंगासागर,आनंदसागर,प्रेमसागर आणि विद्यासागर.
प्रश्न - काकाच्या पत्नीला काकी,मामाच्या पत्नीला मामी तर मेव्हण्याच्या पत्नीला ?
उत्तर - मेव्हणी
प्रश्न - कवि हरिवंशराय बच्चन यांची सर्वश्रेष्ठ रचना ?
उत्तर - अमिताभ बच्चन.
प्रश्न - उंदीर दुधात पडल्यास काय करावे ?
उत्तर - उंदीर दुधाबाहेर काढून स्वच्छ पाण्याने साबुन लावून धुवून टाकावा नंतरच दुधाची बासुंदी करावी.
.......................
प्रश्न - अनुप्रास अलंकाराचे उदाहरण सांगा ?
उत्तर - अर्थाअर्थी अर्थ नसलेल्या अर्थशुन्य अर्थकारनाचा अर्थपूर्ण अर्थसंकल्पाशी अर्थाअर्थी अर्थ जोडून अर्थाचे अनर्थ करण्यात काय अर्थ आहे अर्थमंत्री साहेब?
.....................
..... अपूर्ण गाणी/म्हणी पूर्ण करा. ....
प्रश्न - देखा है पहली बार ...............
उत्तर - उद्धव के घरमे पवार... कसके पकड़, कसके पकड़.
प्रश्न - पाण्यातला मासा झोप घेतो कैसा ............
उत्तर - खावे त्याचा रस्सा तेंव्हा कळे .
..............................
१) प्रकाशवर्षाची व्याख्या करा .
उत्तर - अनवाणी पायाने प्रकाश एका वर्षात जेव्हड़े अंतर पायी-पायी चालत जातो त्या अंतरास प्रकाश वर्ष म्हणतात.
२) तुमच्या आवडीची जाहिरात लिहून दाखवा.
उत्तर -
........ काय झालं ?
........ बाळ रडत होतं.
........ एक कानशिलात दे त्याच्या.
........ तू लहान असताना मी पण तुला तेच देत होते.
----------------------------------------------------------------
अशीही उत्तरे- भाग -1 येथे मिळेल.
http://www.maayboli.com/node/12328
...............................................................................
नोंद :- या रचना माझ्या स्वरचित आहेत परन्तु या घडामोडी दैनंदिन जिवनचर्येशी संबधित असल्याने या तर्हेची विनोदनिर्मिती यापूर्वीही झाली असू शकते.
छान !!! श्यामला तात्याविंचू
छान !!!
श्यामला तात्याविंचू चावला.>>>>>>:हाहा:
उद्धव के घरमे पवार... कसके पकड़, कसके पकड़.>>>>>>>>>
(No subject)
(No subject)
गंगाधरजी, दोरखंडानंतर श्रीखंड
गंगाधरजी, दोरखंडानंतर श्रीखंड राहीलंच.
छावाजी,जिमीजी,झकासरावजी,चिन्न
छावाजी,जिमीजी,झकासरावजी,चिन्नुजी,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद..!!
-----------------------------------------------
चिन्नुजी,आठवन करुन दिल्याबद्दल धन्यवाद...!!
शरद
शरद
धन्यवाद शरदजी...!!
धन्यवाद शरदजी...!!
(No subject)
धन्यवाद जागोमोहनप्यारेजी...!!
धन्यवाद जागोमोहनप्यारेजी...!!
श्यामला तात्याविंचू चावला>>>
श्यामला तात्याविंचू चावला>>>
छान
छान
मस्त आहे सगळे प्रश्न आणी
मस्त आहे सगळे प्रश्न आणी त्यांची उत्तरे...
मधुकरराव्,अनुजी,साधनाजी प्रति
मधुकरराव्,अनुजी,साधनाजी
प्रतिसादाबद्दल धन्यवाद..!!
(No subject)
>>उद्धव के घरमे पवार टू मच!
>>उद्धव के घरमे पवार
टू मच!
कविताजी,स्वप्नाजी प्रतिसादाबद
कविताजी,स्वप्नाजी
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.!!
मस्त, खूप आवडलं
मस्त, खूप आवडलं
धन्यवाद चिमुरीजी..!!
धन्यवाद चिमुरीजी..!!
हाहाहाहा!!! झक्कासच
हाहाहाहा!!! झक्कासच
गंगाधरजी, जमले तर हा धागाही पहा विनोद, ईकडेही अशीच माहिती टाकू शकाल.
विरंगुळा हा ग्रुप जोईन करावा लागेल काही एरर आला तर
गौतमजी माहीतीबद्दल
गौतमजी माहीतीबद्दल धन्यवाद.
विरंगुळाचे मी सदस्यत्व घेतले.
बघुया काही जमले तर..!!
वा! मस्तच ..... भाग -३ टाका
वा! मस्तच
..... भाग -३ टाका पटकन 
मस्त...
मस्त...

वा छानच .गंगाधरजी ''शिवसागर''
वा छानच .गंगाधरजी ''शिवसागर'' राहिला .
सास,किरण,छायाजी प्रतिसादाबद्द
सास,किरण,छायाजी
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.!!
लई भारी!!
लई भारी!!
(No subject)
गंगाधरजी छान फक्त एखंड ऐवजी
गंगाधरजी छान
फक्त एखंड ऐवजी वेखंड कराल का?
दोन्ही भाग मस्तच! ~साक्षी.
दोन्ही भाग मस्तच!
~साक्षी.
प्रश्न - कवि हरिवंशराय बच्चन
प्रश्न - कवि हरिवंशराय बच्चन यांची सर्वश्रेष्ठ रचना ?
उत्तर - अमिताभ बच्चन.
प्रश्न - उंदीर दुधात पडल्यास काय करावे ?
उत्तर - उंदीर दुधाबाहेर काढून स्वच्छ पाण्याने साबुन लावून धुवून टाकावा नंतरच दुधाची बासुंदी करावी.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
लयच भारी.
प्रश्न - काकाच्या पत्नीला
प्रश्न - काकाच्या पत्नीला काकी,मामाच्या पत्नीला मामी तर मेव्हण्याच्या पत्नीला ?
उत्तर - मेव्हणी>>>>>>>>> छान लॉजिक आहे
प्रश्न - कवि हरिवंशराय बच्चन यांची सर्वश्रेष्ठ रचना ?
(अर्थात हे माझं मत आहे. अमिताभ म्हटलं की मला जुने सिनेमे गाजवलेला अभिनेता न आठवता आत्ताचा कांगावेखोर, फाजिल, करबुडव्या अमिताभ आठवतो.)
उत्तर - अमिताभ बच्चन.>>>>>>>>>> मला नाही मान्य हे उत्तर... अमिताभ बच्चन आणि सर्वश्रेष्ठ? कशात बुवा?
प्रश्न - उंदीर दुधात पडल्यास काय करावे ?
उत्तर - उंदीर दुधाबाहेर काढून स्वच्छ पाण्याने साबुन लावून धुवून टाकावा नंतरच दुधाची बासुंदी करावी.>>> नक्कीच पाळलेला उंदीर असणार...अर्थात, उत्तर लिहिणार्याचा...
खुप धम्माल मनोरंजक प्रश्नोत्तरे आहेत मुटेजी... भाग ३ लवकर येऊ द्या!
Pages