माझे शिकण्याचे प्रयोग : नेट सर्फींग

Submitted by वर्षा_म on 17 February, 2010 - 05:10

मध्यंतरी मला मैत्रीणींच्या ग्रुप मधे खुपच निवडुन टाकल्यासारखे वाटायला लागले. काय बोलतात एकमेकींशी तेच कळायचे नाही. बरे म्हणावे मला कळाले नाही तर आपले अज्ञान दाखवावे लागणार. Sad

खालील वाक्य एकली की खरच मैत्रीनी बदलल्या आहेत असे वाटायचे. कधी कधी तर यांनी पुर्ण लाज सोडली आहे असे वाटे. बघा तुम्हाला पण माझे म्हणने पटेल. कंसात माझ्या मनात आलेले विचार लिहीले आहेत.

मैत्रीण : "मला मेल कर."
(आता ही काय जादुगार आहे का फिमेल ची मेल करायला)

मैत्रीण : "तुझ्या ऑफिसात नाही ना ग हॉटमेल नी जीमेल वर बंदी?"
(:अओ:)

मैत्रीण : "बॉस आला की मी नेटची विन्डो बंद करते. उगी स्मायली पाहुन भडकायचा"
(पण मी म्हणते कशाला खिडकी उघडी ठेवायची)

मैत्रीण : "मला सर्फींग आवडते"
(वर्क चे वर्कींग तसे सर्फ चे सर्फीग असेल.. माझ्या डोळ्यासमोर दिप्ती नवल आणि फारुक शेख आले चश्मेबद्दुरमधे साबनाचे फुगे खेळताना)

मैत्रीण : "माझ्या नेटला प्रॉबलेम आहे... कॅफेत जाउन येते जरा."
(त्यासाठी कॅफेत जायची काय गरज Uhoh गुड नाईट लावले की झाले)

मैत्रीण : "तु नळी वरचे गाणे आहे"
(आजी चिडल्यावर "यडी फुकणी" म्हणायची ते आठवले..नळी म्हणजे मॉडर्ण फुकणी असेल)

मैत्रीण : उद्या १० वाजता ये चॅटीगला.
(आता १० ही काय चॅट खायची वेळ आहे)

तुम्हीच विचार करा असे हे बोलणे एकले की मला माझा चेहरा नॉर्मल ठेवायला किती कष्ट पडत असतील. पण काही दिवसात माझ्या लक्षात आले हे काहीतरी इंटरनेट संदर्भात आहे. मग मी निश्चय केला आपण पण इंटरनेट शिकुन घ्यायचे.

आता शिकायचे म्हणजे कुणाला गुरु करावे हा मोठा प्रश्न. तसे गुरुंची कमी नव्हती, नवरा, मुलगा, मैत्रीणींपैकी कुणीतरी. पण मला माझी टिंगल केलेली चालणार नव्हती. मग त्यातला त्यात बरा पर्याय म्हणुन मुलाला निवडले.

बरेच वर्षात नविन काही शिकले नव्हते. मुलाला मात्र अभ्यासावरुन नेहमी पिदडायचे. सगळा वचपा काढला त्याने. माकडाच्या हातात कोलीत म्हणतात ना तसे झाले. शेवटी कसेबसे त्याने मला इमेल कसे करायचे, रिप्लाय कसा द्यायचा हे शिकवले. मग मी एटीत सगळ्यांना माझा इमेल आयडी दिला. मैत्रीणींनी पण मला मस्त मस्त इमेल केल्या. कविताने एक रेसीपी पाठवली. नाव जरा विचित्रच होते "नानबा स्पेशल पोह्यांची उकड".

उद्या सोसायटीचा भोंडला म्हणुन हा वेगळा पदार्थ करायचा ठरवला प्रसादासाठी. आणि कविताच्या इमेललाच रिप्लाय करुन तिला सांगितलासुध्दा माझा बेत. संध्याकाळी माझा प्रसाद ओळखायची वेळ आली तेव्हा सगळ्या एका सुरात ओरडल्या "नानबा स्पेशल पोह्यांची उकड". मी पुरती गोंधळुन गेले. मला कळेना या सगळ्यांना माझा मेनु कसा कळाला Uhoh मग एकीने मला सांगितले मी रेप्लाय तु इमेल करायच्या एवजी रेप्लय टु ऑल केले म्हणुन माझी इमेल त्या सगळ्यांना मिळाली होती. Angry

गुलमोहर: 

Happy

मैत्रीण : "बॉस आला की मी नेटची विन्डो बंद करते. उगी स्मायली पाहुन भडकायचा"
(पण मी म्हणते कशाला खिडकी उघडी ठेवायची)

Lol
बिचारा !

खतरी Rofl

Happy माझ्या आईला इन्टरनेट सर्फिंग शिकायचंय.... पण ती हातात मूषक ( माऊस) आला की त्याला आपट आपट आपटते, मी 'उजवीकडे' पहा म्हणून सांगितलं तर मॉनिटरच्या उजवीकडे पाहाते... तिला रंग, 'फुली', चमचमणारे टीव्ही, इन्ग्रजी 'ई' अक्षर वगैरे भन्नाट शब्द वापरून क्लू द्यायला लागतात.... आणि दर वेळेला तोच धडा पुन्हा :-)...... वर्षा.... तुझं व तुझ्या लेकाचं कौतुक! Happy

बर, चान लिहीलय बर्का! Happy
(ASL म्हन्जे काय? age & sex, Ok, L म्हणजे काय ते मी विसरलो, मला माहि[त होत ९८ मधे, हल्ली कुणी विचारतच नाहि ना Sad [अन विचारल तर काय सान्गणार कप्पाळ?] )

मी पूर्वी इन्डोनेशिअन चॅटर्स बरोबर हळूहळू त्यांची बहासा इन्दोनेशिया ही भाषा थोडीशिकलो होतो. ते लेकाचे मानायचेच नाही की मी भारतीय आहे. इन्डोनेशियन मुले मुली खूप सुसंस्कृत असतात आनि उत्तम गप्पा मारतात. शिविगाळ न करता.
त्यातल्या एका मुलाचे नाव सहस्त्रबाहु असे होते आणि ते अर्जुनाचे नाव आहे हेही त्याला माहीत होते. पण तिथे त्याचे सोस्रोबाहु झाले होते

हा हा हा.. आज पाहिला हा लेख!
पोह्याच्या उकडीबद्दलच लिहिलेलस, म्हणजे स्वस्तात सुटलीस वर्षा! (इमॅजिन आपण काय काय लिहू शकतो Wink )

तटी: लेख काल्पनिक असेल ह्याची कल्पना आहे!

Pages