तो काळ १९८५ च्या आसपास चा होता. मी दिल्ली मुंबई प्रवासासाठी दिल्ली स्टेशनवर आलो. आणि आच्शर्य म्हणजे कम्फंर्ड तिकिट मिळाले. कारणही तसेच होते. काम्प्युटरायझेशन नुकतेच झाल्याने ते अजुन दिल्लीकरांच्या पचनी पड्ले नव्हते. त्यामुळे गोलमाल करायला वाव नव्ह्ता. संध्याकाळी स्टेशनवर आलो आणि एसी कम्पार्ट्मेंट मधे सुखावलो. एवढ्यात शेजारी एक गोरे जोड्पे बसले.
संध्याकाळी चहा झाला आणि थोड्या वेळाने वेटर डिनर बुकिंग साठी आला.
मी गप्प.
शेजारचे गोरे जोड्पे - ' तो वेटर काय म्हणतोय?'
'जेवण हवे का?' मी
गोरे जोड्पे 'त्याचे वेगळे पेसे असतात का ?'
मी वेटरला - ते विचारतात की ' जेवणाचे पेसे वेगळे चार्ज करणार का?'
वेटर - 'नाही. ते तिकिटाच आहेत.'
गोरे जोड्पे - ' दोन नॉनव्हेज'
मी वेटर ला - " तीन नॉनव्हेज"
तर मंडळी, असे प्रसंग आपल्या आयुष्यात येतच असतात. फक्त आपण ते कसे एंजॉय करतो ते महत्वाचे.
तुमचे असे गंमतीचे किस्से सांगा आणि स्वतःवर हसायला शिका.खूप गंमत येते.
माझा ही प्रवास
Submitted by सुनिल जोग on 8 June, 2010 - 04:59
गुलमोहर:
शेअर करा
छान !
छान !
यात विनोद काय ते कळला नाही
यात विनोद काय ते कळला नाही बा आपल्याला
नमस्कार सुनिल जोग. >> तुमचे
नमस्कार सुनिल जोग.
>> तुमचे असे गंमतीचे किस्से सांगा
हे असे किस्से लोकांनी येथे लिहीलेले आहेत. तुम्ही देखील तिथेच लिहावेत ही विनंती.