'झी'ने मज लावियेला वेडू
"गुड इव्हिनिंग डॉक्टर"
"गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग. काय म्हणतोय आमचा पेशन्ट?"
"सकाळपासून जरा बरं आहे. पण डॉक्टर आता झी मराठी लावून द्या म्हणून हट्ट धरून बसलाय बघा. काय करायचं?"
"झी मराठी?" शॉक बसल्यासारखे डॉक्टर किंचाळतात. बाजूने जात असलेले २ डॉक्टर्स संशयाने त्यांच्याकडे पहातात पण डॉक्टरच्या गळ्यात स्टेथोस्कोप असतो म्हणून ते डॉक्टर आहेत हे त्या दोघांच्या लक्षात येतं.
"झी मराठी?" डॉक्टर थोडं हलक्या आवाजात विचारतात "ते कशाला आणखी? सकाळपासून बरा आहे असं आत्ता तुम्हीच म्हणालात ना? कमाल आहे तुमची शांताबाई."