मान्सून केरळच्या किनार्यावर आला. पुणेकरांना पावसाने चिंब केले. या वर्षी पाऊस समाधानकारक होण्याची चिन्हे.
वगेरे बातम्या वाचल्या की मला खूप हसू येते. कारण की गेली कित्येक वर्षे मी रेनकोट वापरू शकत नाही. कारण पुरेसा पाऊसच नाही.
शिवाय पावसावरील कविता मंगूआण्णा पापडावर लिहित नाहीत.
त्यामुळे लिज्जतचा सेल पावसासारखाच कमी कमी होत चालला आहे.
पेपर वाले मात्र दरवर्षी त्याच बातम्या वेळापत्रकाप्रमाणे त्याच हेडिंग मधे जुने पाने फोटो छापून शिळ्या कढीला उतू जाउ देतात.
व्यापारी जुना माल म्हणून तोच न खपलेला माल जंगी डिस्काऊंट दाखवून खपवतात.
सकाळ वाले मान्सून च्या पुरवण्या काढून साप्ताहिक सकाळ ची रदी विकतात.
प्रविण मेहेंदीवाले आपली मेहेंदी खपवतात.
आपण सारे मेंढ्या कळपाने त्यांचे सन्माननिय ग्राहक बनतो -
फक्त माल बद्लून न मिळण्याच्या अटीवर.
आपण मात्र पुरेसा पावसाळा आला म्हणून स्वतःवरच खूष असतो {विनाकारणच}
मग लोणावळयाला गर्दी होते,त्याचेच आपणाला कोतुक असते
राजकपूरने पिक्चरमध्ये भुट्टा खाल्ला म्हणून आपणही १५ रु ला खायचे आणि वर किती महाग म्हणून
ओरडायचे.
थोड्क्यात काय तर पाऊसही हल्ली कमर्शियल झालाय
आपणच आपल्याला विकायचे आणि महागाईच्या नावाने ओरडायचे.
असो आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार मान्सून कात्रज पर्यंत पोहोचला असून तो केव्हाही
पुणे आणि मुंबईत पोचेल अशी बातमी आहे. बाय द वे मान्सून मुंबईला व्हाया पुणे जातो ?
असेल नवे शास्त्र नवे विज्ञान. आमच्यावेळी हे असले काही नव्ह्ते बाबा.
पहिल्या पावसाचे कौतुक असते