विनोदी लेखन

आजचा दरबार

Submitted by देवनिनाद on 2 November, 2010 - 02:30

प्रधानजी - (धावत धापा टाकत) माराज, माराज, माराज
महाराज - प्रधानजी, तोंड सांभाळून बोला, आम्ही ह्या राज्याचे राजे आहोत, म्हणायचं असेल तर नीट महाराज म्हणा,
प्रधानजी - आय माय सॉरी. महाराज ... धावत धावत आलो .... त्यामुळे मी दमलो, मग माझ्या पाठोपाठ शब्द दमले म्हणून चूकून ... महाराजऐवजी काय माराज ... शब्द तोंडातून बाहेर पडला. `ह' सायलेंट' होता.
महाराज - बरं बरं. बोला, एवढं दमायला, थकायला काय झालं
प्रधानजी - महाराज, आपण जिंकलो ... विरोधकांच्या नांग्या ठेचत ... बाण पुढे गेला

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

म्हैलांचे गटग अर्थात गेट्टु !

Submitted by मितान on 1 November, 2010 - 12:52

आशुडी च्या " दिवाळी 'त्यांची' " या धमाल लेखात पेमाडेंची शैली मस्त दाखवली आहे. काही दिवसांपूर्वी मी त्या शेलीची नक्कल करत हा लेख लिहिला होता. आमच्याकडे आठवद्यातून एकदा एका भारतीय घरी आम्ही सगळ्या भारतीय मुली जमतो आणि दंगा करतो. त्या कार्यक्रमाचे हे फोडणी दिलेले रूप.. Happy

( या लेखाची प्रेरणा : कोसला कादंबरीतील 'बखर' )

दिनांक १ जुलै ३०१०.

आणि मग त्या काळामध्ये महिलांचे गेट टुगेदर नावाचे मनोरंजक कार्यक्रम चालत असत. आता तुम्ही म्हणाल महिला म्हणजे काय ? तर लग्न झालेल्या स्त्रीजातीय प्राण्याला महिला हे विशेषण मिळत असे. 'लग्न' म्हणजे काय असा प्रश्न चिकित्सक डोक्यात आलाच असेल.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

नवीन फटाके लॉन्चींग

Submitted by देवनिनाद on 1 November, 2010 - 09:04

दुकानदार - आले, आले सुप्रसिध्द भाई भांगरे यांचे दिवाळी स्पेशल `नवे' फटाके आले. भाई भांगरेचे फटाके घ्या आणि सणाचा आनंद द्विगुणीत करा.

गिर्‍हाईक - का उगाच सणाच्या नावाखाली गिर्‍हाईकांना लुटताय.

दुकानदार - लुटायला मी काय दरोडेखोर आहे का ? काहीतरी बोलून का उगाच भरल्या बाजारात फटके खायला लावू नका. त्यापेक्षा आल्यासारखे फटाके घ्या. आले, आले सुप्रसिध्द भाई भांगरे यांचे फटाके आले.

गिर्‍हाईक - हे बघा आधी तुमची जाहीरातबाजी बंद करा. चांगलं वाईट लोकांना कळतं.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

फटाके परंपरा

Submitted by देवनिनाद on 28 October, 2010 - 03:23

बबन - (गाणं - सर्दी खासी ना मलेरीया हुआ चालीत)

लाडू, करंजी, अन चकली खाऊया ...

चला मिळूनी सगळे

फ फ फटाके वाजवूया

फटाके वाजवूया ... फटाके वाजवूया

बबन - .. हॅलो, नमस्कार .. सगळ्यांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. काय मंडळी फराळ तयार असेलच. मस्त खा, मस्त रहा ... आणि भरपुर फटाके वाजवा ...

शाम्या - (एंट्रीच गाणं हातात फुलबाजे फिरवतोय अशी अ‍ॅक्शन)

दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी ... गाई म्हशी कुणाच्या,

गाई म्हशी लक्षुमणाच्या, लक्षुमण कुणाचा, आई बाबांचा

बबन - अरे, वा शाम्या ... आज नेहमीपेक्षा गोरा दिसतोयस.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

लव्ह यु~~

Submitted by ऋयाम on 25 October, 2010 - 11:09

"अरे.. मला निघायला हवं.. ", तो म्हटला.
"अरे! थांब की. जाशील सकाळी." आम्ही.
"नाही रे... खरंच जायला हवं.."
"अरे, काय एवढं त्यात? उद्या सकाळी बोल की. उद्याही सुट्टीच आहे ना? रविवार सकाळ मस्तपैकी!! म्हणुन सांगतोय, आत्ता फोन करुन सांग.. 'मित्रांबरोबर आहे. उद्या सकाळी बोलुया निवांत..' "
"नाही रे, चिडेल."

गुलमोहर: 

मित-भाषी

Submitted by धनुकली on 22 October, 2010 - 07:57

काही लोक बडबडे.. तर कही लोक मितभाषी.. असं कधी असतं का? कुणी इतकं कमी बोलु शकतं का? आणि तसं असेल तर असं का? हे मला कुणी ४ वर्षे आधी विचारलं असतं तर मी उत्तर देऊ शकले नसते. काही दिवस आधी मला साक्षात्कार झाला ..

त्यासठी थोडं मागे जावं लागेल आपल्याला...
Flashback:
सारखं चरफडत होते "अरे बोल ना.." आधी आडुन आडुन.. मग खाणा-खुणा करुन. पठ्ठा गुमान बसुन होता. माझी मावशी पहिल्यांदा आलेली एवढ्या दूर, आणि नवरा हा असा हाताची घडी घालुन बसलेला.
कसे तरी सांभळले..ती गेल्यावर बसुन विचार करत होते, असे कितीदा झलंय?
आणि झाला हो!!..झाला साक्षात्कार. डोळ्यासमोरुन तरळले या आधीचे प्रसंग.

PreCondition:

गुलमोहर: 

सुप्रसिद्ध अभिनेत्री करूणा कर्पूर यांची मुलाखत

Submitted by पाषाणभेद on 16 October, 2010 - 14:14

(खुप दिवसांपासून माझे वरिष्ठ संपादक मला सुप्रसिद्ध अभिनेत्री करूणा कर्पूर यांची मुलाखत घेण्यास सांगत होते. गेल्या पंधरवड्यात एके दिवशी तिच्या सेक्रेटरी आहूजाशी फोनाफोनी करून तिची वेळ ठरवून घेतली. गेल्या आठवड्यात गोरेगावात फिल्मीस्तानमध्ये तिच्या आगामी पिच्चर 'तेरी आंखे काली काली - The Black End' याची शुटींग चालू होती. आम्हाला तिने तेथेच बोलावले. गेटवर आमचे नाव सांगीतले. स्टूडीओत अजून इतर चार पिच्चरचे शुटींग असल्याने बर्‍यापैकी गर्दी होती. आम्हास आतमध्ये सोडण्यात आले. स्पॉटवर गेलो तर करूणा कर्पूर अन वहिद कर्पूर यांच्या 'तेरे हाथमें अंगूठी हिरेकी' या गाण्याचे टेक चालू होते.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सर्वपित्री

Submitted by कौतुक शिरोडकर on 14 October, 2010 - 23:37

सासू - आले ग बाई आले, आले ग आले, आले नरकातून खाली आले ग बाई आले... हुं... हुं.... अग बाई, लेकीचे घर हे आले ग बाई आले...... (चाल सांगायला हवी का ?)
जावई - आला पितरांचा दिस आला, आलो मी ही वाडी ठेवायला, येवा पितरांनो येवा, गोड मानुनी घेवा.. भाजी आजीला, भजी आजाला, पुरी आईला, वडा बापाला.....चला सगल्या वाड्या झाल्या. (चाल - 'तुमसे जो देखते ही प्यार हुवा, जिंदगीमे पहली बार हुवा' )
सासू - आणि मेल्या माझी वाडी...
जावई - जल्ला, कोणी हॉर्न वाजिवला ?
सासू - तुझी सासू रे मेल्या.
जावई - निलेशभौ, मांज्या सासूचा आवाज काढायचा नाय, सांगून ठिवतो.
सासू - ये अक्करमाश्या, इकडे बघ, मी आहे..

गुलमोहर: 

जाहिरातीरेक!!! (जाहिरातीने व्यापून व्यापून थोड्याश्याच उरलेल्या उर्वरीत जगाची गोष्ट!)

Submitted by निमिष_सोनार on 11 October, 2010 - 06:45

(आजचे युग हे जाहिरातींचे युग आहे हे मान्य. पण जाहिरात करण्याला स्थळ, काळ, वेळ यांचे कसलेच बंधन उरले नाहीए.

आजकाल जाहिराती अगदी कुठेही दिसतात.

चित्रपटात, त्यातल्या गाण्यांत, वर्तमानपत्रात, बातम्यांच्या ब्रेक मध्ये, सिरियल्सच्या ब्रेकमध्ये, होर्डींग्ज वर, पुलांवर, भिंतींवर, रिक्षेवर, घरांवर, भींतींवरल्या घड्याळांमध्ये, टी शर्टांवर, लहान मुलांच्या चॅनेल्सवर, वाहनांवर, कॅलेंडरवर, मुलांच्या वह्या-पुस्तकांवर, कॅरी बॅग्जवर, बस स्टंण्ड्वर, एस. टी. बसेस च्या स्थळदर्शक पाट्यांवर, रेल्वेवर, लोकलमध्ये....

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विनोदी लेखन