इन्स्पेक्टर साखरदांडेंनी फोनवरील बोलणं आटोपून रिसीव्हर ठेवला.
आणि त्यांची नजर समोर बसलेल्या एका तरूण गृहस्थावर पडली.
"बोला. काय पाहीजे?" इ. साखरदांडेंनी सवयीने प्रश्न केला.
"चंदा पाहीजे." रूमालाने कपाळावरचा घाम टिपत गृहस्थ म्हणाला.
"चंदा..!!" इ. साखरदांडेंच्या कपाळावर आठ्या जमल्या. "अजून गणेशोत्सव होऊन महीना लोटला नाही. लगेच आले चंदा गोळा करायला." आपला "हलका" खिसा चाचपत साखरदांडे तडकलेच.
"तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो माझ्या बायकोचं नाव आहे "चंदा." गृहस्थाने "नाव" घेतले.
"मग मी काय तिच्या बारशाचे पेढे वाटू?" इ. साखरदांडेंनी आपल्या बायकोवरचा राग ह्या गृहस्थाच्या बायकोवर काढला.
वाहिन्या बदलत असतानाच मध्येच एका वाहिनीवर ते चिरपरीचित वाक्य कानी पडलं "आदमी तिन और गोली छे......बहुत नाइन्साफी है.." आणि माझं मन भुतकाळात गेलं..
नववित असतानची गोष्ट..ह्या प्रसंगाला दोन गोष्टी कारणीभूत होत्या, पहिली सगळ्या मास्तरांना असते तशीच मुलांना गोंधळात टाकण्याची सवय आमच्या हिंदीच्या मास्तरांना पण होती. अगदी सोप्या गोष्टीत पण गोंधळवुन टाकायचे. दुसरी माझी सवय, तास कोणताही असो, शिकवणारे कोणीही असो..माझी झोप ठरलेली..आजपर्यंत एकही तास या नियमाला अपवाद नाही. असो
काही दिवसांपूर्वी 'Hey dude!', 'Hi dude!' अशी काही वाकये माझ्या कानावर सारखी पडत असायची,.. अजूनही पडतात ... मला कळायचे नाही की ही 'dude' भानगड काय आहे? हा 'dude' असतो कसा ? करतो काय? मला का लोक 'dude' म्हणत नाहीत? ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी मी 'dude' म्हणल्या जाणाऱ्या लोकांवर जरा लक्ष ठेवले... काही गोष्टी लक्षात आल्या ... ज्या आल्या त्या लिहाव्याश्या वाटल्या ...
आमची पाच वर्षाची एक भाची आहे. ती इंग्रजी शाळेत आहे. तिला के.जी. नामक इयत्तेत तब्बल अठ्ठ्यानौ ९८% मार्क्स म्हणजे गुण मिळाले. तेंव्हा आम्ही आमच्या गुणपत्रिकेबद्दल (बालवाडी ते एम.ए.पर्यंत) विचार करू लागलो. तब्बल अठरा इयत्ता (बालवाडीसह) आणि दोनदा दहावी नापास अशा एकंदर वीस शालेय आणि एम.पी.एस.सी. आदी तब्बल दहा अशा तीस परीक्षेत आम्हाला कधी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले नाहीत अगदी दहावीतील दोन परीक्षेची बेरीज करून देखील! आम्हाला खरोखर आमच्या भाचीचा आणि एकंदर आजच्या पिढीचा हेवा वाटला.
केवळ आपल्या मनोरंजनासाठी परमेश्वराने "नवरा" नावाचा प्राणी निर्माण केला असावा, असा बर्याचशा बायकांचा (ग्गोड!) गैरसमज आहे.
हिरोशिमा, नागासकी दुर्घटनेनंतर "लग्न" हीच जगातली सर्वात मोठी दुर्घटना असावी, याचा प्रत्यय नवर्याला पदोपदी येतो. यज्ञकुंडाभोवती सात फेरे मारून बायकोसारख्या साडेसातीच्या फेर्यात अडकलेल्या नवर्याचे तीन-तेरा वाजायचे राहतील का??
आम्ही स्वतःला 'काहीतरी' समजतो....समाजात, चार लोकांत आमची ओळख आहे, आम्हाला चार प्रतिष्ठित लोक ओळखतात याचा आम्हाला सार्थ अभिमान असतो. हे चार लोक (आई,बाप,बहिण,भाऊ!) सोडून आम्ही समाजात ओळखीचे काही स्थान राखून आहोत याबद्दल आम्हास खात्री असते. पण....
काल फूड बझार मध्ये भाजी घ्यायला गेलो होतो. तिथे एका काउंटरवर चक्क वाळलेली बोरे दिसली. पंधरा रुपयाला जवळपास अर्धी मूठ. थर्माकोलच्या सुंदर ट्रे मध्ये पॅक केलेली. वरून पातळ प्लॅस्टीकचे आवरण. बाजूलाच घट्ट नूडल स्ट्रॅपच्या टॉप मध्ये पुरण भरल्याप्रमाणे उतू चाललेली एक आई आणि त्याच मार्गावर चाललेली छोटी मुलगी भाज्यांची वजने करीत होत्या. मुलीने ती बोरे हातात घेत तिच्या मम्माला विचारले, " मम्मा, सी व्हॉट धिस इज ! इट लूक्स लाइक दॅट ब्राऊनिश थिंग ना दॅट ग्र्यांम्मा होल्ड्स इन हर हंड्स व्हाईल पूजा एव्हरी डे! डू दे ऑल्सो इट इट ऑर व्हॉट? वॉव !
'तुमच्या वेळेला कंप्युटर होता?'.. नव्या युगातल्या एका सळसळत्या रक्ताच्या अजाण कोडग्याने (प्रोग्रॅमरने) आश्चर्याने मला हा प्रश्ण चॅट करताना विचारल्यावर हे नेट दुभंगून त्याला पोटात घेईल तर बरं असं वाटलं. हा शेंबड्या किती बोलतो? माझ्या लग्नाला जितकी वर्ष झालीयेत तेव्हढं याचं वय पण नाही. आणि हा त्या कालातल्या पुण्याच्या आयटीतल्या स्थानाबद्दल हे उद्गार काढतो? क्षणभर, गुहेतून बाहेर पडून वल्कलं संभाळत लकडी पुलापाशी शिकारीला जाण्याची दृश्यं तरळून गेली. पण क्षणभरच, मग विचार केला.. हल्लीचे लोक एखादी माहिती गुगलून नाही मिळाली तर ती अस्तित्वातच नव्हती असं सर्रास समजतात.
घर पहावं बांधुन, म्हणुन ना हरकत, मंजुरी वगैरेच्या मागे लागलो.
ऑफ़िसात शिरुन समोरच्या मेजाकडे वळलो,
“यावं महाराज, काय सेवा करु? मावळे, साहेबांना तलवारीचं,.... नको, साधच पाणी पाजा."
शिपाई पाणी घेउन आला, जरा सावरत समोरच्या महोदयांना विचारलं
“माझं थोडं काम होतं, बरेच दिवस रखडलेलं"
“होय, यवनांनी फ़ारच उच्छाद मांडलाय, कामं होतच नाही. पण आपण निश्चिंत असावे, आम्ही आहोत ना? मायभवानीचे कृपेने सारं सुरळीत होईल, आपण जेष्ठ चतुर्थीला यावे"
हैराण होत मी पुढच्या मेजावर दुसय्रा अर्जाची चौकशी करायला गेलो.