"बहुत नाइन्साफी है"

Submitted by अग्निपंख on 21 November, 2010 - 00:55

वाहिन्या बदलत असतानाच मध्येच एका वाहिनीवर ते चिरपरीचित वाक्य कानी पडलं "आदमी तिन और गोली छे......बहुत नाइन्साफी है.." आणि माझं मन भुतकाळात गेलं..
नववित असतानची गोष्ट..ह्या प्रसंगाला दोन गोष्टी कारणीभूत होत्या, पहिली सगळ्या मास्तरांना असते तशीच मुलांना गोंधळात टाकण्याची सवय आमच्या हिंदीच्या मास्तरांना पण होती. अगदी सोप्या गोष्टीत पण गोंधळवुन टाकायचे. दुसरी माझी सवय, तास कोणताही असो, शिकवणारे कोणीही असो..माझी झोप ठरलेली..आजपर्यंत एकही तास या नियमाला अपवाद नाही. असो
झालं असं की हिंदीच्या चाचणी परिक्षेचे पेपर मास्तर वर्गात देत होते, आणि पडलेले गुण मोठ्याने सांगुन आम्हाला आमच्या क्षुल्लक बुद्धीची जाणीव करुन देत होते. कुणीतरी "बहुत" आणी "बहोत" या शब्दात गल्ल्त केली होती. आणि मास्तर त्याचा जाहीर "सत्कार" करत होते. मी अर्धावट झोपेत होतो ते पुर्ण जागा झालो.( चला करमणुक सुरु झाली). त्याचा खरपुस समाचार घेतल्यावर मास्तरांनी वर्गात जाहीर करुन टाकलं की अशी चुक पुन्हा कोणीही केल्यास त्याचा यापेक्षा मोठा सत्कार करण्यात येइल.
सहामाहीची परिक्षा, हिंदीचा पेपर, मी प्रश्नाचं उत्तर लिहित होतो आणि जे नव्हतं व्हायला पाहिजे तेच झालं उत्तरात मला "बहुत" शब्द लिहायचा होता, झाली पंचाइत, आधी एकच बरोबर शब्द माहित होता, पण आता दोन बहुत माहित होते एक बरोबर तर दुसरा चुकीचा.
विचार करत होतो आता काय करायचं. तेवढ्यात गब्बर आणि शोले आठ्वला. गब्बर, कालिया आणि इतर दोघे अशा तिघांना शिक्षा करणार असतो. आणि तो संवाद म्हणतो.
"सजा मिलेगी बराबर मिलेगी"
"सरदार मैने आपका नमक खाया है सरदार"
"अब गोली खा."
"आदमी तिन और गोली छह, "बहुत" नाइन्साफी है"
मी विचार केला. गब्बर रामगढ सारख्या ठिकाणी असल्यामु़ळे आणि तो डाकु असल्यामुळे त्याची हिंदी नक्कीच शुद्ध नसणार, म्हणजे त्याने संवादात वापरलेला "बहुत" नक्कीच चुकीचा असणार, पर्यायाने दुसरा "बहोत" बरोबर असणार. आणि ह्य आत्मविश्वासावर मी सगळीकडे "बहोत" लिहीत गेलो.
तरीही शक्य तितका तो शब्द टाळुन प्रत्येक वाक्य लिहायचा प्रयत्न करत होतो. माझं दुर्दैव (आणि मर्फि साहेबांचा नियम) नेमका तोच शब्द जवळ जवळ सगळ्या उत्तरांमध्ये येत गेला.
आणि तो दिवस उजाडला, हिंदीचे मास्तर तपासलेला पेपरचा गठ्ठा घेउन आले. चेहर्‍यावर एक विलक्षण हास्य. तो पर्यंत मी "बहुत" ला विसरुन गेलो होतो. मास्तर एक एक पेपर देत होते आणि परत सर्वांना त्यांच्या क्षुल्लक बुद्धीची जाणिव करुन देत होते. माझ्या आधीचा मुलगा पेपर घेउन आला, आता माझा नंबर, धडकने तेज, (गणिताच्या पण पेपरला एवढी धडकन तेज झाली नाही कधी). आणि काय आश्चर्य माझा नंबर मास्तरांनी पुकारलाच नाही, थेट माझ्या नंतरचा नंबर. आता माझ्या चेहर्‍यावर गुणांची उत्सुकता जाउन काळजी आली. पेपर गहाळ तर झाला असेल ना. जाउदेत मास्तरांना बाहेर भेटुन विचारुयात असा विचार केला. सगळे पेपर संपले, बर्‍याच लोकांचे छोटे-मोठे सत्कार झाले.
मास्तरांनी एक बाजुला ठेवलेला पेपर उचलला. "आता एका महत्वाच्या व्यक्तीचा सत्कार, सगळ्यांनी आधी टाळ्या वाजवा. (वर्गात टाळ्यांचा कडकडाट). आणि माझं नाव पुकारलं गेलं. मी खाली मान घालुन मास्तरांच्या बाजुला जाउन उभा राहिलो. (मनात विचार आज मी गायब व्हावं किंवा भुकंप, बाँबस्फोट असं काहीतरी व्हावं)
मला काही समजायच्या आत एक बराच मोठा आवाज झाला (खरचं बाँबस्फोट झाला की काय?), पुढ्च्या क्षणाला मला समजल की तो आवाज माझ्याचं गालांवर झालाय.वर्गात भयाण शांतता. "मी हजारदा सांगीतलं की "बहुत" आणि "बहोत" यांची गल्ल्त काराल तर मार खाल" (मास्तर अजुनही दोन शब्द सांगतायेत एकच काहीतरी सांगा ना जो बरोबर आहे).
ह्या प्रसंगातुन शिकलेले धडे..
१. मास्तर विनाकारण गोंधळ वाढवतात. (ह्याव्यतिरीक्त बरेच अनुभव पुढेही आले. (गोंधळ वाढवण्याचे))
२. फक्त logic बरोबर असुन उपयोग नाही, ते काय काय assumptions वर आधारीत आहे हे ही महत्वाचं आहे (गब्बरच हिंदी अशुद्ध असेल हे logic रामगढवासिय आणि डाकु यांची भाषा अशुद्ध असते या assumption वर आधारीत होतं)
३. डाकु लोक्स पण शुद्ध बोलु शकतात.
४. व्याकरण मेरे बस की बात नही है.
५. कानाखाली खाल्यावर खुप वेदना होते.
६. वर्गात अर्धवट झोपु नये,एकतर पूर्ण जागे रहावे किंवा पुर्ण झोपावे (मी हा दुसरा पर्याय निवडला, कारण गोंधळ होत नाही आणि पुस्तकं वाचायची सवय लागते)

पुणेरी टिपा
१. ह्या लेखात व्याकरणीय चुका आहेत, सांगितल्यास दुरुस्त केल्या जातील (व्याकरण खरच अवघड आहे हो..entropy, classical solid mechanics पेक्षाही).
२. हा लेख "विनोदी लेखन" या सदरात (सदर्‍यात ?) असला तरीही सर्वांनाच हसु येइल याची शाश्वती नाही. विनोदी समजुन वाचल्यास आणि हसु न आल्यास, वाया गेलेल्या वेळेला लेखक जबाबदार नाही.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ह्या प्रसंगातुन शिकलेले धडे.
१. मास्तर विनाकारण गोंधळ वाढवतात. (ह्याव्यतिरीक्त बरेच अनुभव पुढेही आले. (गोंधळ वाढवण्याचे))
२. फक्त logic बरोबर असुन उपयोग नाही, ते काय काय assumptions वर आधारीत आहे हे ही महत्वाचं आहे (गब्बरच हिंदी अशुद्ध असेल हे logic रामगढवासिय आणि डाकु यांची भाषा अशुद्ध असते या assumption वर आधारीत होतं)
३. डाकु लोक्स पण शुद्ध बोलु शकतात.
४. व्याकरण मेरे बस की बात नही है.
५. कानाखाली खाल्यावर खुप वेदना होते.
६. वर्गात अर्धवट झोपु नये,एकतर पूर्ण जागे रहावे किंवा पुर्ण झोपावे (मी हा दुसरा पर्याय निवडला, कारण गोंधळ होत नाही आणि पुस्तकं वाचायची सवय लागते)

तुम्ही शिकलेल्या धड्यांनी हसवलं ब्वॉ.... Biggrin

इथून तिथून बहुसंख्य मास्तर असेच होते हे सत्य पुन्हा अधोरेखित झालं... Happy

पुलेशु.

अग्नि.. Rofl
छानाइ रे लेख.. oops!!! माझ्याही आप्पोआप्प सुद्धलेखनाच्या छुका होऊ लाग्ल्यात .. Proud

अग्निपंख, छान जमलाय. (मी पण त्यावेळी नववीतच होतो.)
या बहुत आणि बहोत वरून मी पण अनेकदा ऐकून घेतलेय. में मधला अनुस्वार. वाक्यानंतर येणार दंड.
आवाज या शब्दाचे स्त्रिलिंग. जिंदा आणि मुर्दा या शब्दांना स्त्रिलिंगी रुप नसणे.. लाख चूका ..

अग्न्या मस्त खुसखुशित लेख Lol
थोडक्यात लिहून भरपूर हसवलंस...

माझं ही हिंदिशी अजिबात सख्ख्यं नव्हतं शाळेत.. इयत्ता सहावीत पेपरात मी मिठी ह्या शब्दात ठी ऐवजी टी लिहिला होता..म्हणून बाईंनी मार्क कापला, मी एक्सप्लेन केलं होतं की मी ठी असंच लिहिते.. मग छड्या खाल्लेल्या बाईंच्या.. Sad स्पष्टीकरण दिलं म्हणून.. Sad तेव्हा शपथ घेतली, हिंदीची साथ सोडायची...
इयत्ता ८ वी पासून मग १०० मार्कांचं संस्कृत... आणि हिंदिला रामराम ठोकला...

शेवटी बहुत बरोबर की बहोत? बरंय मी सातवीनंतर हिंदी सोडून संस्कृत घेतलं, निदान पुढचा त्रास टळला Proud

सर्वांचे आभार..
माझा गैरसमज होता की असा गोंधळ करणारे दोघचं असावेत एक ज्यामुळे हा गोंधळ सुरु झाला तो आणि दुसरा मी :)...पण बरोबरीला भरपुर लोक्स आहेत....वर्षु, दिनेशदा, दक्स, शुभांगी.
दक्स आणि स्वप्ना, तुम्ही नशीबवान, आमच्या शाळेत संस्कृत होतं पण ते वर्ग हुशार मुलांचे आणि मी टग्यांच्या वर्गातला, ज्यांच्यासाठी हिंदीच पर्याय... Wink

खरच हिन्दी ची आठवण झाली...हॉरिबल विषय...
कथा मस्तं आहे...

-परीक्षित

छान लिहिलंयस Happy
हिन्दीच काय, मराठी शुद्धलेखनातही माझी बोंबच असते. आणि आता मला त्याचं काही वाटेनासं झालंय हीच चिंतेची बाब आहे (दुसर्‍यांच्या) Proud

मनात विचार आज मी गायब व्हावं किंवा भुकंप, बाँबस्फोट असं काहीतरी व्हावं
हे 100 टक्के सत्य आहे.
खदखदुन हसलो

ये वाच के मै इतना हसी कि क्या बताऊ! Rofl
वैसे बहोत लोकों ने बहुत कॉमेण्ट्स करे, पन ये बतायाइच नई के सही कौनसा!

भाषा म्हटली की फार अस्तं बुवा हे शुद्ध - अशुद्ध - का एवढे छळतात हे शिक्षक काय कळत नाही बुवा.....
लिवलंय भारी हां......

Pages