"नवरा" नावाचा प्राणी..!!

Submitted by A M I T on 15 November, 2010 - 23:50

केवळ आपल्या मनोरंजनासाठी परमेश्वराने "नवरा" नावाचा प्राणी निर्माण केला असावा, असा बर्‍याचशा बायकांचा (ग्गोड!) गैरसमज आहे.

हिरोशिमा, नागासकी दुर्घटनेनंतर "लग्न" हीच जगातली सर्वात मोठी दुर्घटना असावी, याचा प्रत्यय नवर्‍याला पदोपदी येतो. यज्ञकुंडाभोवती सात फेरे मारून बायकोसारख्या साडेसातीच्या फेर्‍यात अडकलेल्या नवर्‍याचे तीन-तेरा वाजायचे राहतील का??

लग्नाआधी "फुला"सारखं जपणार्‍या नवर्‍याला बायको अशी "फळं" देइल, याची कल्पनाही नसावी. शेजार्‍यांसाठी बायकोचा "गडे" असलेला नवरा घरात मात्र बायकोचा "गडी" असतो. बायकोबरोबर खरेदी करण्यासाठी निघालेला नवरा आणि खाटकाने मानेवर सुरा ठेवलेला बकरा यांच्यात इतकं साम्य कसं काय? ते केवळ त्या नवर्‍याला आणि बकर्‍याला ठावूक..!! त्यासमयी त्या दोघांचं काळीज एकाच गतीने धावत असावेत, असा संशय येतो.

नुकतच आम्ही एक सर्वेक्षण केलं. त्यात आम्ही (पत्नीपीडीत) नवर्‍यांना काही प्रश्न विचारले. त्यांनी दिलेली उत्तरे (अर्थात प्रश्नासहित) खाली देत आहोत. अगदी जशीच्या तशी..!!

प्रश्न :- "लग्न" हा स्वर्गाचा दरवाजा आहे?
उत्तर :- होय. पण बाहेर जाण्याचा..!!

प्रश्न :- भांडणात एका बायकोबरोबर कोणी जिंकू शकतं का?
उत्तर :- होय.
प्रश्न :- कोण?
उत्तर :- दूसरी बायको..!!

प्रश्न :- "नारी" म्हणजे काय?
उत्तर :- "शक्ती".
प्रश्न :- मग पुरूष म्हणजे?
उत्तर :- "सहनशक्ती"..!!

प्रश्न :- बायको आणि गाडी यांच्यामध्ये काय फरक आहे?
उत्तर :- गाडी बिघडली की बंद पडते आणि बायको बिघडली की सुरू होते.

प्रश्न :- असं कोणतं डिपार्टमेंट आहे, जिथं बायका (महिला) काम करू शकत नाहीत?
उत्तर :- फायर ब्रिगेड.
प्रश्न :- का बरं?
उत्तर :- कारण, बायकांचं काम आग लावण्याचं असतं. आग विझवण्याचं नाही.

प्रश्न :- नवरा - बायको सोबत मोटरसायकलवर जात असताना अपघात झाला तर नवर्‍याने सर्वप्रथम काय करावे?
उत्तर :- सर्वप्रथम नवर्‍याने आपल्या मोटरसायकचे सर्व पार्टस् नीट चेक करावेत..

प्रश्न :- कुत्रे लग्न का करत नाहीत?
उत्तर :- कारण ते ऑलरेडी कुत्र्याचं जीणं जगत असतात.

(वरील लेख वाचून माबोवरील (विवाहित) बायका माझ्या घरावर "लाटणं मोर्चा" घेऊन येण्याची शक्यता अधिक आहे. म्हणून आवरतं घेतोय..)

(टिप :- या लेखातील विनोद आपण कुठे वाचले, ऐकले असतील, तर तो निव्वळ योगायोग समजावा.. Happy )

हा लेख इथेही वाचू शकता..
http://kolaantudya.blogspot.com/

गुलमोहर: 

प्रश्न :- "नारी" म्हणजे काय?
उत्तर :- "शक्ती".
प्रश्न :- मग पुरूष म्हणजे?
उत्तर :- "सहनशक्ती"..!!

Rofl

अमित एक भा प्र. "तुझं लग्न झालय का?"
बाकी ह्या चवीचवीने कायम चर्वण केलेल्या गोष्टी (बायको कशी वाईट) चांगल्या जमल्यात तुला Happy

जल्ला, एवढा कुटाणा करून बायकोला जर्दा .. बनवण्याचा .. आयमीन दर्जा देण्याचा अट्टहास जमला रे तूला. पण बरेचसे विनोद ऐकलेले अन वाचलेलेही आहेत. एखाद्या गमतीशीर प्रसंगातून हे विनोद वाचायला मिळाले असते तर आणखी छान वाटलं असतं.

प्रश्न :- कुत्रे लग्न का करत नाहीत?
उत्तर :- कारण ते ऑलरेडी कुत्र्याचं जीणं जगत असतात.>>>. मस्तच! फार आवडला. मला वाटते यात 'उत्तर' या जागी 'पतीने दिलेले उत्तर' असे केल्यास स्वतंत्ररीत्या, म्हणजे हा लेख समोर नसतानाही नुसताच तो विनोद समोर आला तरी शोभेल!

गडे आणि गडी फारच आवडले.

मस्त मस्त!

अरेरे!काय ही नवरा या प्राण्याची दुर्दशा..हे सगळं तोंडपाठ असताना कशाला ''नवरा'' या प्राण्यांच्या कळपात शिरतात शहाणी माणसं??