वानू......... - भाग ९
घरी आणल्या क्षणापासून वानूची त्यानं अहोरात्र सेवा केली. महिनाभर त्याला उचलून बाहेर न्यावे लागे. वानूही शहाणा. घरात कधी घाण केली नाही. रात्री कुं कुं करे. हा लगेच उठून त्याला बाहेर नेइ. वानू तसा खूप जड आहे. दमछाक होते उचलून.
घरी आणल्या क्षणापासून वानूची त्यानं अहोरात्र सेवा केली. महिनाभर त्याला उचलून बाहेर न्यावे लागे. वानूही शहाणा. घरात कधी घाण केली नाही. रात्री कुं कुं करे. हा लगेच उठून त्याला बाहेर नेइ. वानू तसा खूप जड आहे. दमछाक होते उचलून.
वानूचं पायाच ऑपरेशन होऊन आठ दिवस झाले. ऑपरेशनच्या वेळी त्याच्या पायावरचे संपूर्ण केस क्लीन शेव्ह केले होते. पण पायाच्या नाजूक लालसर स्किनवर आता बारीक लव येऊ लागली होती.
उन्हाळ्याच्या सुट्टीचे वारे वाहू लागले की मला प्रथम आठवते ते कृष्णा नदीतले पोहोणे! ती सुट्टीत नदीवर केलेली धमाल!
वान्या लहानपणापासूनच स्मार्ट. पण वयाबरोबर त्याची वाढत जाणारी समज समजून घेणं हा एक छान अनुभव आहे. त्याची आणि आमची भाषा वेगळी पण काळाबरोबर एकमेकांना समजू लागली. आमच्या भाषेतले दोनच शब्द त्याने समजून घेतले .
वानूचं खरखरं खोल नातं त्याच्याशी. वानूचं हिंडवणं, फिरवणं, औषधपाणी, काळजी सगळं काही तोच करतो. मी थोडी दूरच. माझ्यावर येउन पडलं आणि दुसरा पर्याय नसला तर मी वानूची सेवा करते. वानू हल्ली चालताना धडपडायला लागलाय.
३१ डिसेंबरची सुखद थंडीतील मस्त संध्याकाळ. यावर्षी मी मस्त विनापाश आहे. तशीही सगळ्या गुंत्यात पाय मोकळा ठेवते मी. पण यावर्षी खरच काही पाश नाहीत. मागची पिढी आम्हाला सोडून खूपच दूर निघून गेली आहे. पुढची पिढी थोडीशी दूर आहे.
मध्यान्ह वेळेनंतर समरांगण पश्चिमेच्या काळ्याकरड्या मैदानाकडे वळले;
तेव्हा दूरवर अशुभाचा संकेत देणारी टिटवी कर्कश्श ओरडली.
भविष्यातील गहि-या तमाचाच हा जणू संकेत!
वानू वकीलाच्या घरच्या अन्नावर मोठा झालाय. आता त्या अन्नाचा गुण वान्यालाही लागणारच. वकीलांच्या संगतीत राहून त्यांच्या दिवाणखान्यातल्या गप्पा ऐकून वान्याला चांगल्यापैकी कायद्याचे ज्ञान झाले आहे.
तारेच्या कंपाउंडला जाळी बांधून घेऊन त्याने कृतकृत्य झाल्याप्रमाणे एकवार सभोवताली नजर फिरविली. आता पक्काच बंदोबस्त झाला. वान्याला पळून जायला कुठेही फट उरली नाहीये. त्याने विजयी मुद्रेने वानूकडे बघितले.