वानु फोटोच्या रुपाने

Submitted by टवणे सर on 9 April, 2008 - 02:30

vanya.jpgvanya1.jpgvanya2.jpgvanya3.jpg

हा आमचा वानु - तुम्हा सर्वांसाठी

गुलमोहर: 

खरच , खुप छान आहे तुमचा वानु............
त्याच्याबद्दल वाचल्यानंतर खुप उत्सुकता होती त्याला भेटायची ... फोटोमुळे काहि अंशी पूर्ण झाली....

किती छान आहे. अगदी शहाणं वाटतं आहे. Happy आता जाऊन त्याची(म्हणजे वानूची) दृष्ट काढा. Happy

आत्ता म्हणजे कसं गार गार वाटलं. वान्या कसा असेल, कसा असेल.... असं आपल्याच शेपटाभोवती फिरून फिरून माझं ल्हा ल्हा झालं होतं Happy

टण्याभाव, हा वान्या तुमच्या अन मीनाताईंच्या घरचा आहे होय.... दोघेही जबरी लिहिणारे आहात.... काय सांगता येत नाही... वान्यालाही येत असेल (इतकं दोघेही छान लिहिता)!
खूप लिहा... आम्हाला खूप वाचायला मिळू दे. एक निखळ आनंदाचं गाव लागतं तुमचा लेख 'लागला' की... खरच.

अरे हा तर खूपच सुंदर आहे. जर्मन शेपेर्ड आहे का? चेहरा नीट दिसत नाहीय. आवडला. पण हा पॉपिलॉन नाही वाटत आहे?(जात नाही काढत आहे पण कुतुहलाने विचरतेय). Happy
आय मीस माय सीन्डी.(माझी कुत्री).

मनुस्विनी, मलाही कुत्र्याच्या जातीतल फारस कळत नाही. पण पॅपिलॉन ही एक कादंबरी आहे. पॅपिलॉन हे तिच्या नायकाचे टोपण नाव- याचा अर्थ फुलपाखरु. या नायकाला काही गुन्हा नसताना केवळ सूड म्हणून तुरुंगवास होतो. तोही फार भयानक. ही एक आयुष्याशी टक्कर घेणार्‍या नायकाची सत्यकथा आहे. हा तीनदा पलायन करतो. तिसर्‍या वेळी यशस्वी होतो. आम्ही वान्याला पॅपिलॉन म्हणायचो, ते त्याच्या स्वातंत्र्यप्रेमामुळे. गच्चीत वानू दूरवर बघत बसला की हेलेना बेटावरचा नेपोलियनही म्हणायचो.

मनु, तुमचा लेख ही वाचला, अन वान्य चे फोटो हि छान आहे,

आमचा जिमी पण असाच होता सेम अगदी हुबेहुब ...तो ही धनगराकडुन आणला होता...पण धनगरी नव्हे ही मिश्र जात असेल...
मला एका श्वान प्रेमी ने सांगितले होते की मिश्र जातेचे श्वान नेहमीच उत्तम असते. शुद्ध परकीय जाती पेक्षा मिश्रीत प्राणी आपल्या इथे खास करुन गावा कडे चांगले सूट होतात. असो तुमचा वान्या आवडला... तुमच्या लेखा मुळे माझ्या लहानपणिच्या माझ्या एका मुक मित्रा ची त्याच्या आजार पणात त्याच्या साठी सलाइन धरुन बसुन काढ्लेल्या दिवसानन्ची आठ्वण झाली....खुप लळा लावतात हो हे मुक जिव...

आता कशी ओळख पूर्ण झाली.
आमच्याकडेही दोन कुत्रे होते, पण ते दोघेही पाण्याला खुप घाबरायचे. त्याना अंघोळ घालणे महाकठीण असे. त्याना बरोबर कळत असे आणि मग ते लपून बसत असत.
हा वान्या मात्र हौसेने पाण्यात जातोय.

खूप छान आहे तुमचा वानू. लेख ही खूप छान होते .

बेडेकर,

तुमची लेखन प्रतिभा खरच अतिशय छान आहे. तुमचे लेख वाचून जसा वानू कल्पीलेला तसाच आहे.

अप्रतिम्!तुमचे लेखन आणि वानुही.शब्द्च सुचत नाहीत.फुलापानासारखे एक् रुप झालेला तुम्ही.
पुस्तक् रुपात हे लेखन प्रसिध्द करा ना,मग मायबोली बाहेरील वाचकानाही हे सुन्दर लिखाण वाचायला मिळेल.

तन्याजी,
वानु फोटोत जेवढा छान दिसतो त्याहुनहि कितितरि पटीने मनाला भावतो तो तुमच्या लिखाणातुन...
काल ब-याच दिवसांनि मायबोलिवर कथा कादंबरिकडे वळले... आणि प्रथम भेटला तो वानु... मग वाचण थाबंण शक्य नव्हते... खरच फारच छान लिहिता.

बर्वे यांना मी अनुमोदन देते, पुस्तकरुपात तुम्हि हे लिखाण करा, म्हणजे वानु सर्वांच्या परिचयाचा होईल.

छान आहेत फोटो...
या सर्व गोष्टीतुन हे समजते कि प्राण्यांना पण माया समजते. नाही का?
(माणुस हा पण एक प्राणीच आहे. फक्त विचार करण्याची जास्त शक्ती असल्याने त्याला कधी कधी त्या मायेची जाणीव होऊनही किंमत कळत नाही हे दुर्भाग्य Happy )

अप्रतिम!!!! ...... खुप छान , सुरेख लिहिता तुम्हि ...... तुमचा वानु खुप सुंदर आहे .... तुमच लिखाण वाचताना मन अगदि गुंतून जातं ....डोळ्यासमोर चित्र उभं रहातं.....मनाला स्पर्श करतो तुमचा लेख.

लेखमालिका उत्तम उतरली आहे. प्रसंगांचे तुकडे जिवंत झाले आहेत.

वानूचे, 'त्याचे' आणि तुमचेही कौतुक वाटले.

मीनाताई, गोड आहे हो तुमचा वानू.. तुम्ही त्याला दिलेले पॉपीलानचे नावही समर्पक वाटले. बर्वे ताईंना माझा दुजोरा आहे. तुम्ही जर मराठी साहित्याचा विचार केला तर अशा विषयांवर पुर्वी कुणी लिहीलेलं जर असेल तर ते खूपच कमी लेखकांनी आणि तुमची तर ही खूप मोठी लेखमाला आहे. जरूर एक पुस्तक काढा ह्यांच. सचित्र..

हा लेख मी २ वर्षांनी वाचतेय. डोळ्यात पाणी आला वाचताना.
वानू चा फोटो शेवटच्या पेज वर आहे. तोवर मी माझ्या Leo शी त्याचा चेहेर्याचं साम्य मनात धरून वाचत होती.
खूप सुंदर लिहिलेत हे लेख तुम्ही. निरपेक्ष प्रेम देतात ही.

रेणुका

खुप रडले आज. तुमच्या वानुच्या रुपाने माझा चिकु जिंवंत झाला.
कदाचित खोट वाटेल तुम्हाला पण वानु आनि चिकु मधे जास्त फरक नव्हता. वानु सारखाच होता माझा चिकु, अगदि तसाच दिसायचा,तसाच पळुन जायचा,त्याला पण बोललेल सगळ कळायच आणि बरच काही.
तो पण जायच्या आधी ३ दिवस गायब होता, फरक फक्त एवढाच की तुमचा वानु काही वर्ष होता तुमच्या बरोबर पण माझा चिकु फक्त १ १/२ वर्षातच गेला.

ह्या वेळी मुंबईत गेलेना की त्याचा फोटो इथे टाकीन. त्याचा फोटो माझ्या अल्बम मधे आहे पण वानुच्या रुपाने तो मझ्या समोर राहील

हे सर्व मला कदाचित लिहिता आंल नसत पण तुम्ही खुप सुदर लिहिल आहे.

वानुचे बाकी फोटो पुन्हा उपलोड कराल का? १च दिसतो आहे

अरे वा, वान्याबद्दल अजूनही लोकं वाचत आहेत हे पाहून आनंद झाला. वान्याचे फोटो जे दिसत नव्हते ते पुन्हा अपलोड केले आहेत.

दिसला वानू. ती कृष्णा आहे का? आणि तो वानूकडे वाकून बघणारा निळा शर्टवाला चिंट्यापिंट्या कोण आहे?

कृष्णा नदी नाहिये काय ती. असच जवळच्या एका डोंगराखालचा पाझरतलाव आहे. तो वाकून बघणारा माझ्या आतेभावाचा मुलगा आहे.

मी दोनदाच कृष्णा बघितलीय. एकदा सांगलीला आणि एकदा नरसोबाच्या वाडीला (इथे ती पायर्‍या चढून वर आली होती). कदाचित मधल्या कुठल्या पॅचमधे अशी नागमोड्या काठाची आणि जरा आटलेली असेलही असं वाटलं होतं Happy

सुंदर लेखमालिका! वानू जास्त नशिबवान की तुम्ही, हे ठरवणं मात्र अवघड आहे. वानू हरवण्याचा अनुभव सांगणारा लेख रडवणारा आहे. वानूशी ओळख करून दिल्याबद्दल अनेकोनेक धन्यवाद. (मी माझ्या श्वानप्रेमी मित्रांसोबत ही लेखमालिका शेअर करत आहे.)

फार फार बोलकं आणि देखणं लिहिलयंत तुम्ही मीनाताई... वान्याबद्दल वाचून आणि त्याला बघून खूप भरून आलं... त्यानं हसवलंही आणि रडवलंही आणि अखेरीचं जमाखर्चाचं चिंतन तर अंतर्मुख करणारंच... परवाच कुणीतरी सांगितलं ते मायबोलीवरलं वान्याबद्द्ल लिहिलेलं वाच... म्हणून शोधून वाचायला घेतलं... आणि इथवर येऊनच थबकले... वान्याची सुख-दु:ख आपली वाटावीत इतुकं स्वच्छ सुरेख लिहिलंयत तुम्ही.... हे असलं आमच्या पदरी घालून आमची आयुष्य समृध्द करताय... खूप खूप आभार! Happy

मस्तच

गोड आहे हो वान्या. खूप आधी वानू ची लेखमालिका वाचली होती इथे माय्बोलिवरच. फोटो बघून खूप छान वाटलं.