हसण्यावारी नेण्यासारखा प्रकार नव्हता तो! हळूहळू वाड्यात सगळेच समजायला लागले. शैलाचे लग्न एका रात्रीत, तेही आदल्याच रात्री आणि भर कार्यालयात का मोडले यावर ग्रूप्समध्ये प्रचंड कुजबूज होऊ लागली. तीही शैला आप्पाच्या घरात पाऊल ठेवतीय तोवर! त्या जमान्यात हा असा प्रकार म्हणजे खूप काही होते.
एका मुलीच्या लग्नासाठी अख्खा वाडा सजतो आणि ती वाड्यातून कार्यालयात निघताना रडतो. आणि दुसर्या दिवशी काय तर ती मुलगी ठरलेल्या स्थळाला कार्यालयातून हाकलून देऊन वाड्यातीलच एकाशी लग्न करून वाड्यातच परतली आहे.
मग त्याची कारणमीमांसा! आप्पाचे आणि तिचे आधीपासूनच होते का! मला तरी वाटायचे, मी कधी नाही लक्ष दिले वगैरे वगैरे! मग त्या घरगुती पातळीवरच्या कुजबूजीने शेजारच्या उंबर्यातून हळूच एक पाऊल आत टाकणे. तिथे तिचे जोरदार स्वागत होऊन मग ती कुजबून दोन, तीन घरांची सामुहिक कुजबूज होणे व शेवटी आप्पा आणि शैला या दोन घरांना लक्षात येणार नाही असे पाहून अख्खा वाडाच त्यात गुंतणे!
आणि शेवटी तो प्रकार समजणे!
की हे सगळे निवेदिता आपटेमुळे झाले.
मग तोंडावर हात ठेवून आश्चर्य व्यक्त होणे, तरीच त्यांचं दार बंद दिसतंय, तोंड कुठे आहे आता वगैरे बोलणे, मला आधीपासूनच ती जरा अशीच वाटते, आइ उमेशला समजत नाही का, राईलकर वहिनींनी त्याला पहिल्या पासूनच मोकाट वागू दिलेले आहे इत्यादी इत्यादी!
त्यातच नितुच्या आईने तिला दिलेल्या थपडा वाड्याच्या मातीच्या भिंतींनी शेजारच्या आप्पाच्या घरात आणि त्याकारणेन सर्वांनाच ऐकवणे! मग गांभीर्य वाढणे!
आणि????
आणि या सगळ्यात उमेश, विनित गुजर आणि राहुल, हे तिघे गायबच असणे??????????
==============================================================
उमेश - अरे काल ऐकलं
विनित - काय..... काय आहे ती ओळ...ये मैकदा है यहां का निझाम उल्टा है??
उमेश - जो पीके लडखडा न सका... वो हो गया है गुलाम
राहुल - हे मात्र भारीय बर का! आयला आणूचयात आपणही... म्हणजे कळलं का तुला विन्या? जो आता दारू पिऊन वाकडा चालूही शकत नाही तो दारूचा खरा गुलाम झाला आहे...
विनित - सॉलीडच...
उमेश - शेवटी तर इतकी मस्त ओळ आहे... नीट आठवत नाही... पण त्याचा अर्थ असा आहे की ही इतकी सभ्यपणाची चीज आहे की ती पिऊन माणू......
"शराब इतनी शरीफाना चीज है आदम... के पीके आदमी सच बोलता है सुबहो शाम"
खाडकन तीनही माना पलीकडे वळल्या. हा शेर उच्चारणार्याकडे!
प्रसन्न व्यक्तीमत्वाचा कळस होतं ते व्यक्तीमत्व! चांगली पावणे सहा फूट उंची, प्रमाणबद्ध, वय असेल साठ वगैरे, गोरा गुलाबी रंग, छातीवर पोचलेल्या दाढीचे आणि डोक्यावरचे केस पांढरे शुभ्र, मोत्यांची माळ लख्खकन चमकून जावी तसे निखळ, शुद्ध, टवटवीत आणि प्रेमळ स्मितहास्य आणि .... एक आदब, एक दरबारी ढब, जिने तो गृहस्थ या तिघांना त्याच्या टेबलवर बोलवत होता.
पांढर्या शुभ्र सलवार झब्यात आणि चांदीच्या काड्यांच्या चष्म्यात तो माणूस राजबिंडा वाटत होता. प्यासाला कसा काय आला असावा असेच वाटत होते.
"बैठो दोस्त, मालूम होता है शायरीमे दिलचस्पी रखते हो?"
त्याचे वय, व्यक्तीमत्व आणि भाषा याचा व्हायचा तोच परिणाम झाला. आपोआपच या शिकाऊ मुलांच्या तोंडी 'सर' हा शब्द आला. त्याच्या शेजारी कुणीच बसले नाही, तिघेही दाटीवाटीने समोरच बसले. तोवरच त्यांचे ग्लासही वेटर्सनी तिथे आणून ठेवले. हिंदू मुसलमान निदान त्या क्षणी तरी एक झाले प्यासामध्ये!
"जुनैद अख्तर का सलाम"
त्याने एक हात स्वतःच्या कपाळापाशी मिश्कीलपणे तीन वेळा वरखाली केलेल पाहून बुचकळ्यात पडलेल्या तिघांनी पटकन हात जोडून नमस्कार केला.
"नाचीज अख्तरमियाँ कहलाता है"
"मै नाचीज उमेश राईलकर"
उम्याने येडचापसारखे स्वतःलाही उगाच नाचीज वगैरे जोडले. त्याला वाटले 'नाचीज' असे काहीतरी नांव सांगण्यापुर्वी बोलायचे असते. अख्तरमिया हासले आणि विन्या आणि राहुलही!
"मी विनित, हा राहुल"
"बढिया नावे आहेत, चीअर्स"
अँ? मियांना मराठी तर शुद्ध येतंय की? किणकिणले चार ग्लास!
"इस उम्रमे पीने कैसे लगगये"
"आज दोस्तकी शादी थी.. इसके बहेनके साथ"
"मतलब... तुम्हारेही एक दोस्तकी शादी इनके बहन के साथ हुई?"
"सर"
"फिर तो और भी बढिया है... ना बिदाई ना जुदाई.. बडी बेचारगीसे लौटती बारात तकते है, बहादुर होके भी मजबूर होते है दुल्हनवाले.... है ना?"
"म्ह... णजे??"
"म्हणजे आपल्या मुलीला, जी नववधू आहे, तिला वाजत गाजत घेऊन जाणारी वरात बघताना तिच्या घरचे हवालदिल झालेले असतात, मायूस हुवे होते है, कितीही शूर असले तरी त्या क्षणी ते बिचारे झालेले असतात... है ना?.. पर वो घडी तो आयीही नही आपकी बहेनाके शादीमे... घरसे निकली और घर गयी.... चीअर्स"
जुनैद अख्तर म्हणजे पैमाना होता पैमाना! त्याचं ते 'है ना' असे लाडीक विचारणे, सतत स्मितहास्याची एक पॉष लकेर ओठांवर आणि जीभेवर ओघवती भाषा! मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे तिघे त्याच्याकडे बघत होते.
"कितनी पीते है आप लोग?"
"सर... दस दिन मे एक बार..... सर.... आप??"
"एक दिनमे दस बार"
प्यासा अख्तरमियाच्या सात मजली हासण्याने दुमदुमले तसे वेटर्सनाही समजले, आज मैफील जमणार! आता सगळेच गिर्हाईके आटोपून तिकडे येण्याच्या मार्गावर होते वेटर्स! कारण एकदा अख्तर मिया हासले म्हणजे वाजले पहाटेचे चार आता! आणि अख्तरमियांचे टेबल आपल्याकडे असावे असे प्रत्येकच वेटरला वाटायचे कारण ते देत असलेली भरघोस टीप!
"सर वो लाईन क्या थ जो ..."
"शराब इतनी शरीफाना चीज है आदम... के पीके आदमी सच बोलता है सुबहो शाम"
"आदम म्हणजे?"
"शायर का नाम है वो... शेख आदम आबूवाला... जिनकी गझल है यह.. शायरी सुनते नही हो?"
" माहीतच नाही कुठे मिळते!!!"
"लो कर लो बात! पुरा का पुरा जुनैद अख्तर यहा पेश -ए - खिदमत है, और आप किताब ढूंढ रहे है"
तिघांचे चेहरे उजळले. कारण जुनैद अख्तरने स्वतःबरोबरच त्यांच्याहीसाठी कबाब मागवले. आता हे बिल हा माणूस नक्की देतोय ना इतकेच बघायचे होते.
"तो आप लोग पढते है?"
"सर.. मै जॉब करता हूं... ये बी ए हुवा है.. जॉब ढूंढ रहा है... और ये डिप्लोमा.. ये भी ढूंढ रहा है"
एवढ्या मोठ्या माणसाकडून काही काम झाले तर चांगलेच असे समजून विन्याने तिघांची पार्श्वभूमी सांगून टाकली.
"बीए करके जॉब ढूंढ रहे हो? ये कौनसी आजादी आगयी हिंदोस्तांमे.. ट्रान्स्लेशन लिख्खोगे? इंग्लीश, उर्दू और हिंदी का मराठी मे?"
"मुझे... उर्दू नही आती..."
"भैय्या वो तो आती है जुबां आते आते... पर हम जो है..."
"क्या काम है?"
"हमारे पास पडोसमे काफी हमारी कौमके बच्चे है... जो मराठीही जानते है.. इन्हे ना हिंदी आती है ना इंग्लीश... हमारे पास कुछ लिटरेचर है... जो ट्रान्स्लेट कररहे है हम... ताकी आगे कई ऐसे बच्चोंको अच्छा लिटरेचर पढनेको मिले... "
"सर आप... कोई संस्थासे है?"
"मै खुदही इन्स्टिट्यूट हूं बेटा.. इन्स्टिट्युट ऑफ लाईफ... अल्लाहका दिया सबकुछ है... इक.. अपनोंके सिवा..."
"कहां काम करना पडेगा?"
"पर्वतीके पीछे गोगटे चाय की दुकान मालूम है??"
"येस सर"
"उसीके उपर चले आओ कल सुबह दस बजे? तुम भी आओगे डिप्लोमा होल्डर?"
राहुलने लाजून जीभ चावली अन म्हणाला
"मेरेको नही आयेगा ट्रान्स्लेशन"
"कोई बात नही... जबतक दूसरा जॉब नही मिलता.... आजाया करो.. दिल तो बहलजाये.. दिल को बहलाना जरूरी होता है बरखुरदार... "
"चलेगा स्सर"
"तो इस बाते पे?????"
खण्ण्ण्ण्ण्ण्ण!
राहुल आणि उम्याला तर कधी एकदा ही बातमी वाड्यात जाऊन घरी सांगतोय असे झालेले होते. पहिला जॉब! पण अर्थातच आत्ता प्यायली आहे म्हंटल्यावर आत्ता सांगणारच नव्हते ते, पण उद्या सकाळी उठल्या उठल्या!
"सर पहले आपको कभी देखा नही प्यासामे"
"आज भी कहा देख रहे हो?"
"म्हणजे?"
"मै कौन हूं, क्या हूं ये तो जानते नही हो, बस दौरे जाम चलरहा है तो साथ बैठे है हम सब"
अपराधीच वाटले सगळ्यांना! खरच की, याला निदान आधी हे तरी विचारायला पाहिजे होते की आपण कोण आहात! त्याने आत्ता आपल्याला कशी का असेना नोकरी ऑफर केलीय, एक प्रकारे म्हंटले तर आत्ता आपण साहेबासमोर बसलेलो आहोत.
"फुर्सते-कार फकत चार घडी है यारो
ये न सोचो कि अभी उम्र पडी है यारो
जब भी चाहेंगे जमानेको बदल डालेंगे
सिर्फ कहने के लिये बात बडी है यारो"
खिन्नपणे अख्तरमियां ऐकवत होते.
"म्हणजे काय?"
"म्हणजे काम करायला, कर्तव्य करायला दोन चार घटिका उरल्यात, असं समजू नका की अजून खूप आयुष्य आहे"
मगाशी याच माणसाने रोमॅन्टिक मूड आणला आणि आत्ता हाच माणूस आपल्याला नोकर्या बिकर्या खिरापतीसारखा वाटून आता खिन्न का करत आहे हे कुणाला समजेना!
"आहटसी कोई आये तो लगता है कि तुम हो
साया कोई लहराये तो लगता है कि तुम हो
सन्दलसी महकती हुई पुरकैफ हवा का
झोका कोई टकराये तो लगता है कि तुम हो"
"व्व्वा"
अत्यंत आपोआप उमेशच्या मुखातून दाद गेली यावेळेस आणि हातही पुढे झाला टाळी द्यायला. मग पटकन त्याला समजले की हा काही मित्र नाहीये टाळी वगैरे द्यायला. पण????
अख्तरमियांनी खिन्नपणे हासत हासत टाळी दिली.
वेटर्सनी एकमेकांकडे हासून पाहिले. आता रंग चढणार होता मैफिलीला!
"किसीसे इश्क हुवा?"
उम्याने पटकन विन्याकडे पाहिले तसे विन्या आणि राहुल हासले, राहुल म्हणाला..
"इसका है एक लडकीके साथ"
"अच्छा?... उसे मंजूर है?"
"येस सर"
"बडे खुषकिस्मत हो यार... हमे तो ये मुहोब्बत कभी नसीब नही हुई"
"सर.. आप भी.."
"मुहोब्बत हर कोई करता है दोस्त.. मिलती नही है... मिलती तो निभाके दिखा देते..."
आणखीनच खिन्न झाले मियाँ!
नोकरीच्या आनंदावर एक खिन्नतेचे आवरण चढले...
"बडी खूबसूरत थी.. मुहल्लेमे नयी नयी रहने आयी थी... उसकी तबस्सुमकी क्या कहिये... आहिस्ता आहिस्ता जानपहचानसी होने लगी... मै साइकिलपे अखबार बेचने निकलता... और वो सुबह उठकर मुझे देख लेती और मुस्कुराती... पहले तो मुझे शरम आती थी अपने हालातपे... फिर पता चला की अखबार बेचू या न बेचू.. वो तो मुझे चाहतीही है... लेकिन हालातने कुछ ऐसे मोड लेलिये... की कसमे खाकर भी जुदा होना पडा.. निकाह हुवा उसका.. जब जा रही थी... एकही लम्हा... जिसमे उसने मेरी तरफ देखा... क्या नही था उस वक्त हमारी नजरोंमे... दिल कहरहा था... अभी जाओ जुनैद अख्तर.. और उसे लेकर भाग जाओ... लेकिन दिमागकी सुननी पडी.. गरीब जो ठहरा.. इश्कने गालिब निकम्मा करदिया... वर्ना हमभी आदमी थे कामके... "
रात्रीचा दिड!
सामसूम झालेल्या प्यासातून सगळेच उठले. खरे तर प्यासा तीन तीन वाजेपर्यंत चालूच असायचे, पण तुरळक! सगळेच बिल, म्हणजे अगदी या तिघांचे आधीचेही बिल अख्तरमियांनी दिले.. आता मात्र ते लडखडत चालत होते.. मधेच मिश्कीलपणे म्हणत होते... जो लडखडा न सका पीके ... हो गया है गुलाम... या तिघांना जास्त झालेली होती... किमान दोन तास टाईमपास केल्याशिवाय वाड्यावर जाण्यात अर्थ नव्हता.. नाहीतर नुसते लांबून बघूनही पब्लिकला समजले असते की हे प्यायलेले आहेत.. हे विचार चालू असतानाच सगळ्यांची ट्यूबलाईट पेटली..
च्यायला... वाड्यात तर नातेवाईक आहेत राहुल्याकडचे.....!!!!!!
आता? आपण कुथे झोपणार असे पिऊन?? की अजून बसायचं नुसतंच आपलं प्यासामध्ये? काही घ्यायचं वगैरे नाही! छे छे, प्यासात कसे बसता येईल हवा तितका वेळ? आप्पाच पाहिजे होता, त्याने काहीतरी शक्कल लढवली असती..
हे विचार चाललेत तोवर आणखीन एक धक्का बसला...
अॅम्बॅसिडर???? पांढरी स्वच्छ गाडी घेऊन एक रायव्हर आला आणि मियांच्या समोर थांबला..
"कही छोडना है दोस्तो??"
हा माणूस इतका श्रीमंत आहे???? आणि ह्याने आपल्याबरोबर घेतली?? सगळच अजब! अर्थातच म्हणा, आपल्याला नोकरीही देतोय म्हणजे नक्कीच तेवढा मोठा असणारच की!
"नही सर... हम इस तरफ रहते है... चले जायेंगे हम"
"ठीक है... सुबहा जरूर आना.."
"येस्स स्सर"
उपकृत चेहरा ठेवून मियाँना आत बसताना पाहात होते सगळे! गाडी सुरू होण्यापुर्वी मियांनी पुन्हा एकदा यांच्याकडे पाहिले आणि हात हालवत हासत म्हणाले....
"जमाना आज नही डगमगाके चलने का
संभलभी जा कि अभी वक्त है संभलनेका
बहार आये चली जाये फिर चली आये
मगर ये दर्द का मौसम नही बदलनेका
मगर ये दर्द का मौसम नही बदलनेका"
कितीतरी वेळ लांब जाणार्या गाडीकडेच पाहात होते तिघे! 'अभी वक्त है संभलनेका, संभल भी जा' हा मियाँचा उपदेश कानांमधून हृदयांपर्यत गेला होता.
पश्चात्ताप वाटू लागला होता. डोके जड झालेले होते. कुठे फिरत बसायचे आता, काय होईल ते होवो असा विचार करत तिघेही एक शब्दही न बोलता वाड्याकडे निघाले..
आणि वीस मिनिटांनी कसेबसे वाड्यापाशी पोचले तर... लांबूनच वाड्याच्या मुख्य दारातच अनेक लोक थांबलेले दिसले..
एकदम उतरलीच! मियाँ वगैरे सगळे झटकले गेले मनावरून! आणि यंत्रवत हालचाली करत सगळे दारात पोचताच.....
'खाड'
उमेशच्या आईने तमाम वाड्याच्या देखत हाताशी आलेल्या मुलाच्या कानफडात वाजवली...
एकदा..... दोनदा.... मोजून आठवेळा..
गालांपाशी हातही न नेता उमेश स्तब्ध उभा होता.....
"चालता हो.... असला मुलगा घरात ठेवणार नाही आम्ही"
"अरुणा, काय करतीयस तू?"
उमेशची आई सर्वउमेशला, अगदी आपटे दांपत्याच्याही देखत उमेशला ढकलत होती आणि तो ढकलला जात होता..
उमेशची आई किंचाळत म्हणाली...
" काय करतीय काय काय करतीय??? पिऊन आलाय हा पिऊन... आणि वाड्यातल्या मुलींवर प्रेमं बसतात ह्यांची ह्या वयात?????? बापाने आणि आजोबांनी किती कष्ट घेतले आहेत आठवले नाही??? आज आलेले भाडेकरू सगळ्यांदेखत आम्हाला जे बोलले ते ऐकायला तुला जन्माला घातले मी??????"
प्रत्येक वाक्याबरोबर उमेशची आई एकेक फटका लगावत होती त्याला... तो रडत नसला तरी क्षमा तिथे येऊन रडू लागली होती.....
आजोबाही मधे पडत नव्हते आता... सगळा वाडा थिजलेला होता...
"चालता हो म्हणाले ना?????"
आईने कर्कश्श आवाजात रस्त्याकडे बोट दाखवत उमेशला विचारले..
आता मात्र आसवांची दोन सरी खळ्ळकन ओघळल्या... पाठ फिरली... राहुल आणि विन्या त्याच्याबरोबर निघाले असते तर त्यांच्या घरच्यांनी त्यांनाही दम भरला असता...
एकटा.... एकटा उमेश पाठ फिरवून निघाला.. क्षमा धावत आली... त्याने तिलाही झिडकारले...
आता मात्र आईही रडू लागली... तिला आवरावे की उमेशला थांबवावे हे उमेशच्या बाबांना समजत नव्हते..
आणि त्याच क्षणी... उमेशने पाठीमागे वळून पाहिले... दहा पावले चालत पुन्हा आईपाशी आला...
" जातोय मी... फक्त नमस्कार करतो दोघांना आणि आजोबांना... आज मला आणि राहुलला नोकरी मिळाली... पहिलीच नोकरी आहे गं आई.. तेवढ्यापुरते तरी कौतुक कर की??........?"
आणि ते ऐकून.... वात्सल्याच्या उमाळ्यांनी सर्व अपराधांना वाहवून नेत....
..... हुंदके देत आसवांच्या वर्षावाने अरुणा राईलकरांनी चिरंजीवांना आशीर्वाद दिला...
"चल घरात... पुन्हा असं केलंस तर मी बोलणार नाहीये तुझ्याशी"
उमेश राईलकर आणि निवेदिता आपटे हे रास्ते वाड्याच्या दृष्टीने .......आजपासून...
... एक असफल प्रेमप्रकरण ठरलेले होते....
तरी झोपताना उमेशचे त्या खिडकीकडे लक्ष गेलेच... अचाट हुषार होती नितु...
तिने एक लाल ओढणी त्या खिडकीबाहेर बांधली होती... वाळत घातली असावी तशी...
आणि.... जेथे तिचे आई बाबा झोपत... म्हणजे स्वयंपाकघरात... त्या दाराच्या मुठीला...
... हिरवा रुमाल होता...
आजपासून खोल्या बदलल्या... हे तिने व्यवस्थित सांगीतलेले होते...
दोघांनीही मार खाल्ला होता... एकाच कारणावरून... आणि..
त्याचमुळे... ही प्रेमकहाणी अजूनच तावून सुलाखून निघत होती..
हे ओढणी आणि रुमाल प्रकरण लक्षात येतंय तोवरच मगाशी रागावलेले असलेल्या आजोबांचा आवाज ऐकू आला उमेशला.....
"पहिला पगार आईच्या हातात द्यायचा बर का???"
उमेशने मान डोलावली...
"फक्त... एखादे कानातले वगैरे मात्र आण स्वतःच्या निवडीने... त्या समोरच्या चिमणीसाठी..."
आजोबा...ग्रेट!!!!
आजोबा...ग्रेट!!!!
धन्यवाद.... सावरी
धन्यवाद....
सावरी
मस्त हाहि भाग आवड्ला
मस्त हाहि भाग आवड्ला
तद्दन टाईमपास, आजचा भाग असंगत
तद्दन टाईमपास, आजचा भाग असंगत वाटला
खुप छान पुढिल भाग आत वेळ
खुप छान पुढिल भाग आत वेळ जास्त न घेता पाठ्वा .
राव साहेब एखाद्या च मन कितिहि
राव साहेब एखाद्या च मन कितिहि पाशानाचे असले तरि हि विरघळुन जाइल एकदम मस्त
आजोबा ग्रेट्च... पण ते
आजोबा ग्रेट्च... पण ते प्यासामधले वर्णन नको वाटते! आणि ती ट्रान्सलेशनची नोकरी एका अनोळखी माणसाकडे... काय ट्विस्ट देताय पुढे??
मला वाटायचे जुनैदचा उच्चार
मला वाटायचे जुनैदचा उच्चार जुनाइद असा असतो.
बाकी व्यवस्थित चालु आहे. फटके मिळाले हे पण बरोबर वाटले. नोकरी नसताना प्यासाच्या
खुपच वार्या होत होत्या.
अख्तरमियाँच्या सारखे उमेशचे
अख्तरमियाँच्या सारखे उमेशचे होणार नाही ना हेच वाटते. गझल टाकल्यामुळे हा भाग थोडा लहान वाटला. पण गझल मात्र अप्रतिम.
असेच म्हणतो.... विशेष काही
असेच म्हणतो.... विशेष काही गोष्ट पुढे सरकली नाही...
आणि प्यासा, दारू .. जरा अतीच वर्णन वाटत
बिचारा एखादा पीत नसेल तर तो पण अशी वर्णन आईकून.. अट्टल पिणारा होईल..
(ह घ्या)
पण बेफिकीर एखाद निर्व्यसनी मुलगा पण असू शकतो ना.. सगळेच कसे बेवडे
बेफिकिर, तुमच्या अचाट कल्पना
बेफिकिर,
तुमच्या अचाट कल्पना शक्तिला आणि अफाट लेखन सामर्रथ्या ला मनापासुन सलाम.मी तुमचि नियमित वाचक आहे. पण आज राहवले नाहि म्हणुन हा प्रतिसाद,तुमचे भषिक प्रभुत्व ,उर्दु भाषेचि यथोचित जाण ,वेगवेगळे विषय घेउन सक्षम पणे हाताळ्ण्याचि ताकद आणि मानवि मनाचा सुयोग्य अभ्यास या काहि घटकान मुळे आपले प्रत्येक लिखाण वाचक उचलुन धरतात. पण तरिहि मागिल काहि कादम्बर्या /कथा मध्ये काहिसा तोच तोच पणा वाटतो .नायका चा प्रेमभन्ग , दारु प्रत्येक वेळि कशा साठि? कदाचित हे फ़क्त मलाच वाटत असेल,पण तरिहि एकदा विचार करा.कारण वाचू नका सान्गितलेत तरिहि मी वाचणारच आहे,पण माझ्या आवडत्या लेखकाचि एकता कपूर होउ नये हिच इच्छा आहे.आणि प्लिज रोज एक भाग टाकत जा.फार वाट पहायला लावता.
नविन भागाच्या प्रतिक्षेत...
नविन भागाच्या प्रतिक्षेत...
तुम्हि का ईतका वेळ लावता. एक
तुम्हि का ईतका वेळ लावता. एक दिवस ग्याप ठिक आहे पन ईतके दिवस मग सगळा रस जातो मग वाचावेसे वाटत नाहि लवकर पाठ्वा.
पुढील भाग टाका लवकर... खुप
पुढील भाग टाका लवकर... खुप दिवस झाले नविन भाग नाही आला.
ह्म्म्म.. येवु द्या पुढचा
ह्म्म्म.. येवु द्या पुढचा भाग. आवडला हे सांगणे न लगे.
मी तुमच्या कथान्ची नियमित
मी तुमच्या कथान्ची नियमित वाचक आहे. खुपच सुन्दर लिहीता आपण.. क्रुपया थांबवु नये...
लवकर येउदेत पुढ्चा भाग. खुप
लवकर येउदेत पुढ्चा भाग. खुप उत्सुकता आहे.
मालक घ्या कि लिव्हायला आता.
मालक घ्या कि लिव्हायला आता. किती दिवस वाट बघायची?
मी पुर्वी शायरी खुप आवडीने
मी पुर्वी शायरी खुप आवडीने वाचायची आणि तोडकं मोडकं लिहायचा प्रयत्न पण करायची. मध्ये काही कारणांनी दोन्हीही नाही जमलं, पण आता परत काही लिहावं असं वाट्तंय. बघु ......धन्यवाद !
किती दिवस झाल अजुन पुढ्चा भाग
किती दिवस झाल अजुन पुढ्चा भाग का आला नाहि.
लवकर पाठवा वाट बघतोय.
तुम्ही पुढ्चा भाग कधी लिहिणार
तुम्ही पुढ्चा भाग कधी लिहिणार ?.. वाट पहातेय
पुढील भाग टाका लवकर... खुप
पुढील भाग टाका लवकर... खुप दिवस झाले नविन भाग नाही आला.
पुढील भाग टाका लवकर... टाका
पुढील भाग टाका लवकर... टाका लवकर...टाका लवकर...टाका लवकर...टाका लवकर...टाका लवकर...टाका लवकर...टाका लवकर...टाका लवकर...टाका लवकर...................................................
बेफ़िकीरजी ही कादंबरी लिहीणे
बेफ़िकीरजी ही कादंबरी लिहीणे थाम्बवलेय का तुम्ही..??
mazi hi pahilich pratikriya
mazi hi pahilich pratikriya aahe mi tumchya saglya kadanbrya wachalya atishiy chhan aahe sply Shriniwas !!!! phkt end chhan hava hota ase watate ,tumhala aajkal prataikriya aawdt nahi mahit aahe pn hi mazi pahilich aahe so rag naka manu ,baki saglya chhanch aahet tumchya kadbrya .
he kadambari matr tumhala swatala aawdleli dist nahi anytha tiche tumhi mothe bhag takle aste aani ti aataprynt sampli pn asti aso navin bhagachi aitishay wat bghatoy aamhi ,
tumhi chhan lekhak aahat hyat wadch nahi ,kadhi kadhi aamhich wachak aamchya dokyat ek kahitri vichar karun thevto aani tumhi nemke ulte lihile ki aawdt nahi pn tumhi vegle lihita hech tumche yash aahe :))
dhanyawad
पुढील भाग कधी येनार? एक
पुढील भाग कधी येनार? एक महिना व्हायला आला. वाट पहातेय
अजुन नाहि आला पुढील भाग
अजुन नाहि आला पुढील भाग
धन्यवाद बेफिकिरजी. इतके दिवस
धन्यवाद बेफिकिरजी. इतके दिवस वाट पाहिलि,तेव्हा भिती वाटली कि परत लिहायचे थांबवले कि काय. मस्तच. आणी पुढचा भाग लवकर टाकाल अशी अपेक्षा.