मी

तो मी..तोच मी...

Submitted by आठवणीतला मी.... on 9 May, 2012 - 05:39

हसत खेळत स्वतःचाच
असाच आहे तो मी,
स्वता:च्या जगात बेधुंदपणे
स्वछंद वावरणारा तोच मी..

सुख थोडे दु:ख भारी
हसत सोसणारा तो मी,
लयबद्धतेने आयुष्य जगणारा
माणुस सामन्या तोच मी..

सहन करणे पुरुण ऊरणे
लढत जगणारा तो मी,
शत्रुलाही पुरुण ऊरेण
झुंजणारा तोच मी..

प्रेम करणे विरह सोसणे
॑अश्रु न ढाळणारा तो मी,
आठवणीमधे तुझ्याच प्रत्येकक्षणी
गुंफणारा तोच मी..

तो मी नव्हेच
होता तो तुझाच कोणी,
तु निघुन गेल्यावर मात्र
स्वत:मध्ये विखुरलेला "तोच मी"....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मी पण अण्णा !!!!

Submitted by मकरन्द जामकर on 29 April, 2012 - 11:13

मी पण अण्णा !!!!

राउळी वळकटी ,
न ठेला कनवटी,
मालमत्ता ताठ वाटी,
धरीतो सरकारास वेठी,
फकीर तो मराठी !!!
फकीर तो मराठी !!!!

महामेरू निश्चयाचा,
लढवय्या हिंद सेनेचा,
खंदा वीर सत्तरीचा,
कर्दनकाळ भ्रष्टाचाराचा,
पुत्र राळेगण चा !!!!
पुत्र राळेगण चा !!!!

भरितो हुंकार,
नेकीचा,
संकल्पाचा,
जागृतीचा,
कोटी कोटी क्रुद्ध मनांचा,
गगनभेधी नारा त्याचा,
वंदे मातरम !!!!
वंदे मातरम !!!!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अभंग, शहर, जथा आणि मी!

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

हे पण जुनेच ललित आहे.
---------------------------------------------------
सकाळची कामं उरकणं चालू होतं. अचानक मोठ्या आवाजात पखवाज आणि पेटीच्या दमदार साथीने अभंग ऐकू आले. शब्द लांबून येत होते त्यामुळे कळले नाहीत पण सूर होता सच्चा आणि खणखणीत बंदा रूपया.
एकेक सूर पांडुरंगाच्या पायाकडे नेणारा. मधेच एक दुसरा आवाज आला. योग्य जागी, योग्य वेळी आणि योग्य सूर उचलून अप्रतिम ताना आल्या. परत पहिला आवाज मूळ अभंगावर आला. आता दोन्ही आवाज पांडुरंगाला आळवत होते.
अशी स्वर्गीय भक्ती.. का नाही पांडुरंग येणार भेटीला.
मला त्या आवाजातच पांडुरंग भेटून गेल्यासारखं वाटलं.

प्रकार: 
शब्दखुणा: 

चांदो आणि मी!

Submitted by भानुप्रिया on 6 April, 2011 - 09:05

मी उशीवर मान टेकवली
की चंद्र हळूच डोकावतो..
तुझ्या आठवणीत बुडलेल्या मला बघून
चांदणीला अजूनच बिलगतो..

'रोजचाच झालाय हा चाळा त्याचा'
म्हणून मी आज मान फिरवली,
तर चांदणीला सोबत घेऊन स्वारी
थेट माझ्या खिडकीशी आली!
पडदा हळूच बाजूला सारून
म्हणतो कसा मला..

'रुसतेस कसली राणी, उठ की जरा!
माझ्या लाडक्या चांदणीचा
तुला दाखवायचाय तोरा!'

चांदणीनं ऐकलं हे
अन झक्कासशी लाजली
लखलखत्या तेजाला तिच्या
क्षणभर लाली चढली!
चंद्रानंही मग तिला
हळूच मिठीत घेतलं..
अन एक तळहातानं
माझ्या डोळ्यांनाही झाकलं!
मग मात्र माझा
पारा जरा चढलाच..

'काय चालवलयस चांदोबा,
हा काय तुला पोरखेळ वाटला?'

गुलमोहर: 

तू, मी, चंद्र - त्रिवेणी..

Submitted by मी मुक्ता.. on 19 January, 2011 - 23:17

स्वतःच्या मनात दाटलेल्या अमावस्येला
लाखोली वाहत असताना एकदातरी पहायचा होतास

माझ्या नजरेत उतरलेला चंद्र...
**********************************

जग नसतं दीपलं पण
वाट दाखवण्यापुरतं चांदणं नक्की होतं

माझ्या चंद्रमौळी आकाशात...
**********************************

भैरवी बरीच रेंगाळली होती,
तरी तू आला नाहिस..

गालावर सुकून गेलं चंद्रपाणी..
**********************************

डोळे गच्च मिटुन
सगळी कवाडं बंद करुन बसले

तरी श्वासात दरवळत होताच चंद्र...
**********************************

चंद्राळलेलं आभाळ नाही मिळालं तुला
पण तोवर माझ्यात रुजला होता

तुझा चंद्राचा हट्ट...

गुलमोहर: 

स्पर्धा आणि मी

Submitted by अमित अरुण on 19 November, 2010 - 20:04

मी खर सांगु, मला ना उंच आकाशात उडायचय
पार अगदी क्षितिजापलिकडे जाउन पोचायचय
जिथे कुणीच नसेल माझ्याशी स्पर्धा करायला
अशा अनोख्या जागी जाउन पोचायचय

तुला माहीत्येय, तसं मला स्पर्धेचं भय नाही
नाही...खरच नाही...
आजही नाही आणि आधिही नव्हतं कधी
पण काय सांगु तुला,
आजकाल कधी नव्हे तो मी धावताना दमायला लागलोय
धावता धावता मधेच मागे वळुन बघायला लागलोय
मी पुढे जाण्यापेक्षा बाकीचे मागेच आहेत ना
याची खात्री करायला लागलोय

कुठुन आलो ते पहायला आता वेळ नसतो
कुठे चाललो त्याचे आताशा भान नसतं मला
अक्शरश: काळ मागे लागल्यासारखा पळत असतो मी
डोळ्यावर झापडं चढल्येत गं माझ्या
पाठीवर आसूड कुणाचा उडतोय

गुलमोहर: 

मी

Submitted by प्रीतमोहर on 18 September, 2010 - 08:59

स्वत:तच गुंतलेली .......मी
स्वतःलाच शोधणारी मी.......
क्षणा़क्षणाला नवीन शोधाने
अधिकच व्याकूळ मी...

......नाही आवडत त्यांना हे असे....
म्हण्तात एकुलकोंडी मी...
माणुसघाणी मी
.....
हे ऐकुन , पुन्हा माझ्यातच हरवलेली वेडी मी.....

चाललाय माझा प्रयत्न स्वतःला ओळखण्याचा .....

कळत असूनही नासमझ, मूर्ख मी.....
-- प्रीतमोहर/प्रीमो

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जीवन - ५

Submitted by Deepali_Mali on 18 August, 2010 - 05:29

विनिता शांतपने नोट्स काढ्त होती. स्वाती काहीच न सुचुन तास कधी संपतोय याची वाट पाहत होती. शेवटी एकदाची रिंग झाली व तास संपला. विनिताने सवईप्रमाने कॅफे गाठ्ला. स्वाती पन विनिताच्या मागे कॅफे मध्ये पोहचली. विनिता टेबलवर बसली होती त्याच टेबलवर स्वातीपन बसली. काहीही विचारण्याची तिची मनस्थिती नव्हती.
'तु अशी काहेस?' स्वातीने सरळ मुद्याला हात घातला.
'म्हनजे?'
'काल तु जे केलं, ते?'
'ते...., ते तर नॉर्मल होतं, एव्हडा विचार करु नकोस. झालं ते विसर आणि चल कामाला लाग. कॉलेज नंतर ऑफिसला पन जायायचं आहे.'
'पन....., तु....., मी तुझ्याशी कशी वागले, आणि तु..'

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जीवन - ४

Submitted by Deepali_Mali on 13 August, 2010 - 03:55

विनिताचा धिटपना पाहुन स्वातिपन क्षणभर आवाक झाली. कारण स्वाती नंतर जवळ जवळ दिड महिन्यानि जॉइन होऊनहि विनिता शांत होती. जनु काही फरकच पडत नव्हता.

समोर तिशिच्या आसपास वय असनारा एक तरुण उभा होता.

'yes....'

'सर, आपने बुलाया था .' विनाता उत्तरली.

'अं....... , ओह, तुम वो पार्ट्-टाइम जॉब,'

'जी, सर ...., कुछ काम था?' विनिताने त्याचं वाक्य अर्धवट तोडत त्याला सरळ प्रक्ष्ण विचारला. आणि
स्वातीने हळुच विनिताचा हात दाबला.

त्याने दोघींना निट न्याहलले, त्यातलि एकजन शांत होती. तर दुसरी काहीशी घाबरलेली, कुठला जुनियर घाबरतो तसा. पण ति ?

'सर...?' विनिताने परत आवाज दिला.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जीवन - ३

Submitted by Deepali_Mali on 11 August, 2010 - 03:22

विनिताचे संपुर्ण नाव समजल्या पासुन स्वाती खुप तुटक वागत होती. विनिता जावेद अली खान हे नावच त्याचे कारण होते. विनिता हे समजत होती पन जोवर स्वाती स्वतः विचारत नाहि तोवर काही नाही ह्या विचाराने ति वागत होती. कोणतीही चुकी नसताना उगाचच कारणे द्या हा स्वभावच मुळात विनिताचा नव्ह्ता.सकाळी कॉलेज, दुपारी ऑफिस, रात्री घर, विनिताचे दिवस ह्या चोकटीत चालले होते. मुंबईत स्वतःला समावुन घेण्याची धड्पड स्वाती उघड्या डोल्यानी पाह्त होती. पन पुठे केलेला मैत्रीचा हात तसाच पुठे ठेवन्यास काचरत होती.
*****************************************************

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मी