मी बराच भटकत गेलो
कवितेच्या ऐकून हाका
अर्थांचे विणले जाळे
शब्दांचा घेऊन धागा
दररोज तुझ्या सृजनाचे
रहस्य नवे उलगडते
प्रतिमांची उंची तुझिया
विश्वाला व्यापून उरते
तो आला , रमला, जगला
संध्येच्या कातर वेळा
तो महाकवी दुःखाचा
दुःखाला सजवून गेला
मज सूर्यास्ताची आता
हुरहूर सतावत नाही
तिन्हीत्रिकाळ संध्यासुक्ते
हृदयात ग्रेस गुणगुणतो.
-----©मयुरेश परांजपे(किमयागार)-----
१६/१०/२०२०
‘कावळे उडाले स्वामी..’ म्हणत ,
तू कवितेच्या अनवट वाटेवर केलेली शब्द्फुलाची उधळण
डोळ्यांत साठून राहिली आहे अजून...
तू दु:खाचा महाकवी असशीलही,
पण तुझ्या कवितेत आत्मशोधाचा , कारुण्याचा
रक्तगंधाचा दिवा जागत राहिलाय अजून....
‘चर्चबेल’च्या निनादात ‘ओल्या वेळूच्या बासरी’चे सूर शोधणारा
तू एकटाच असशील..
महाकवीची मिजास जपत,
उभ्या आयुष्याचं एकटेपण साजरं करणारा
तू एकटाच असशील..
प्रतिभेच्या पूजेसाठी लौकिकाचे अस्तर झुगारणारा
तू...
दुर्बोधतेच्या वाळवंटात कवितेची बेसरबिंदी लपवणारा
तू...
संध्याकाळच्या कातरवेळांत, उडून गेलेल्या कावळ्यांत,
रुणझुणत्या नुपूरांत, वाहून जाणाऱ्या पाण्यात,
"आज ग्रेस गेले. मी २०११ मध्ये भारतात आलो होतो तेव्हा त्यांना भेटून आलो. आज ती भेट शेवटचीच ठरली. त्याच "ग्रेसफुल" भेटी बद्दल.."
१० मे ... एक्काहत्तर वर्षांपूर्वी याच दिवशी सौ.सुमित्रा आणि श्री.सीताराम गोडघाटे,या दांपत्याचे पोटी एक पुत्ररत्न जन्मास आले. भविष्यात एखाद्या क्षेत्रात हे मुल हिऱ्याप्रमाणे चमकून उठेल याची पुसटशी कल्पना नसताना,त्यांनी त्याचे नाव 'माणिक' असे ठेवले. पुढे वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्यावर्षी हे झाकले माणिक,खरोखरच कोहिनूर हिऱ्या प्रमाणे चमकून उठले. 'संध्याकाळच्या कविता' या गूढ गंभीर काव्य रचनेतून ते जगासमोर आले.अर्थात इतक्या माहिती नंतर देखील आपल्या मनीचे गूढ नाही ना संपले.कारण ते जगासाठी ते माणिक सीताराम गोडघाटे या नावानी लिहिते झाले नाहीत.
तो: एक विचारु ?
ती: ह्म्म.. विचार की..
तो: तिच्या गावी जातोय तर एकदा भेटेन म्हणतोय..
ती:( कातर,व्याकूळ झालेले डोळे लपविण्यासाठी मान फिरवून ) बघ. म्हणजे ठरव तूच !
तो: एकदा भेटूनच येतो.
ती: परवा सकाळी येशील नं घरी?
तो: हो.
तो जातो. ही सैरभैर. ही भेटण्याआधी ती याच्या आयुष्यात होती. लाटेसोबत आलेल्या शिंपलीसारखी. दुसर्या लाटेबरोबर निघूनही गेली....हिला त्या जखमा दिसल्या तेव्हा दातओठ खाऊन जिवाच्या कराराने त्या पुसण्यासाठी किती झगडली ! आणि आज पुन्हा तो म्हणतोय............