*कवी ग्रेस यांना काव्यांजली*

Submitted by किमयागार on 16 October, 2020 - 08:30

मी बराच भटकत गेलो
कवितेच्या ऐकून हाका
अर्थांचे विणले जाळे
शब्दांचा घेऊन धागा

दररोज तुझ्या सृजनाचे
रहस्य नवे उलगडते
प्रतिमांची उंची तुझिया
विश्वाला व्यापून उरते

तो आला , रमला, जगला
संध्येच्या कातर वेळा
तो महाकवी दुःखाचा
दुःखाला सजवून गेला

मज सूर्यास्ताची आता
हुरहूर सतावत नाही
तिन्हीत्रिकाळ संध्यासुक्ते
हृदयात ग्रेस गुणगुणतो.

-----©मयुरेश परांजपे(किमयागार)-----
१६/१०/२०२०

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान! खूप छान!! तुमची हि काव्यांजली, नक्कीच पोहचली असेलत्यांच्यापर्यंत!