" रविवार आज रविवार -"

Submitted by विदेश on 17 March, 2013 - 00:23

"रविवार आज रविवार -" (बालकविता)

रविवार आज रविवार
किती छान छान वार
अभ्यास नाही शाळा नाही
खूप मजेचा आज वार !

मारामारी आणि कुस्ती
येत नाही मुळीच सुस्ती
खेळ खेळण्यांची कमाल
दिवसभर नुसती धमाल !

दिवसभर खाणेपिणे
नाचणे अन् हुंदडणे
गट्टी फू अभ्यासाशी
कट्टी फक्त खेळण्यांशी !

नाही धपाटा आईचा
नाही रट्टा बाबांचा
ताईचे ऐकायचे नाही
दादाशी बोलायचे नाही !

दोस्तमंडळ झिंदाबाद
मौजमस्ती झिंदाबाद
धिंगाणा गाणे गाणी
रंगीत फुग्याची पिपाणी !

रविवार हो रविवार
आमचा आवडता वार
घरात आणि मैदानात
दंगामस्ती चालणार !
.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवरा!

"गट्टी फू अभ्यासाशी
कट्टी फक्त खेळण्यांशी !"

कैच्याकै लिहिता राव. गट्टी आणि कट्टीचा अर्थ कळतो का तुम्हाला? एक कविता लिहून दोन-चार आठवड्यांनी स्वतःच वाचून बघा, त्यात सुधारणा करा, दुसर्‍यांना ऐकवा त्यानुसार बदल करा. आणि मग फाडून फेकून द्या कारण तुमचा हा प्रांत नाही. उगाच काही गोग्गोड लिहलं की लोकं 'हाउ स्वीट' वगैरे म्हणतील. पण त्यात काही राम नाही.

प्रत्येक कविता (कलाकृती) श्रेष्ठ असलीच पाहिजे असं नाही. पण प्रत्येक कविच्या (कलाकाराच्या) औकातीनुसार मेहनत जाणवली पाहिजे. उगाच शेळी लेंढ्या टाकते त्याप्रमाणे ओळी लिहून टाकण्यात काय मज्जा?