" डराव डराव -"

Submitted by विदेश on 13 March, 2013 - 14:01


टकमक टकमक बघत बघत
डोळे मोठे आणखी करत

येता जाता डराव डराव
का ओरडता बेडूकराव

तुमच्या उड्या टुणूक टुणूक
चपळाईची मस्त चुणूक

अंगणातल्या डबक्यात
किती करता बाहेर आत

पाण्यात जास्त भिजू नका
डराव डराव गर्जू नका

सर्दी पडसे झाल्यावर
खोकत बसता काठावर

औषध कधी घेत नाही
डराव डराव थांबत नाही

झोपू द्या ना शांत आम्हाला
नाहीतर सांगीन नांव आईला !
.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कै च्या कै कविता करता राव.
उगाच ड ला ड आणि ट ला ट जोडून लिहिलं की बाल कविता होते काय?

@ तुर्र्मखान - मला तसेच वाटत होते. आपण माझा गैरसमज दूर केला, बरे वाटले.
आपण एखादी 'बालकविता' कशी असते ते लिहून मार्गदर्शन केल्यास, मला आनन्दच होईल.

Happy

मला बालकविता करता आल्या असत्या तर मलाच बालकवी म्हणाले नसते का?
तस्मात चांगल्या बालकविता कुठल्या याची उदाहरणं कारणमिमांसेसह देउ शकतो. पण तुम्ही जश्या कविता पाडता तशा मी दिवसा एक याप्रमाणे पाडू शकतो.

उदा.

एक होता कोंबडा,
होता फारच चोंबडा..

अंगण उकरतो कुरुकुरू,
पळतो कसा तुरूतुरू...

असल्या यमक जुळवून मारुतीच्या शेपटी प्रमाणे कविता होउ शकते. थोडं फार वाचन असेल तर 'प्रकाशित करण्यासारखी' कविता कशी असते ते कळू शकते. असो.