घर पहावे बांधून

सेकंड होम ठेवावे की विकावे?

Submitted by sneharajan on 21 April, 2016 - 03:32

आमचे एक बदलापूर घेतलेले सेकंड होम आहे.२४-२६लाखाला १ वर्षांपूर्वी घेतले होते. इथून पुढे किंमत तशी काही फार वाढेल असे वाटत नाहीये. इन्वेस्ट्मेंट म्हणूनच घेतले होते. पण सोसायटीसाठी लागणारे पैसे व कर्जाचा हप्ता पहाता घर ठेवण्यापेक्शा विकले तर बरे होईल का असे वाटू लागले आहे.
मिळू शकणारे भाडे अजून मिळतच नाही आहे .
कृपया सुचवा विकावे कि नाही !

घरविक्री व्यवहारात कागदपत्रांची देवाणघेवाण : खबरदारी, सावधानता इ.

Submitted by zoom on 29 November, 2014 - 11:15

नमस्कार,

एजंट/दलालामार्फत घर विकतानाच्या व्यवहारात मला मिळालेली साधारण माहिती साधारण अशी:
०. घराची किंमत परस्पर पार्ट्यांनी एकत्र येऊन दलालासमोर ठरवणे. दलालाची फी किती असेल हे दलाल आणि आपण दोघांनी एकमताने ठरवणे.
१. घर ज्या सोसायटीत आहे त्या सोसायटीशी आपली असलेली मेंटेनस इ.ची थकबाकी आधी क्लिअर असली पाहिजे.
२. सोसायटीकडून समोरच्या पार्टीला घर ट्रान्सफर करण्यात सोसायटीची कसलीही हरकत नाही असे नमूद केलेले NOC घ्यायचे.

विषय: 

वडिलांच्या नावे असलेले घर विकून अपत्याच्या नावे घर घेणे

Submitted by zoom on 16 November, 2014 - 09:23

खालील व्यवहारात कायदेशीर / योग्य मार्ग कोणता?

सध्याचे घर वडिलांच्या नावावर आहे. ते विकून दुसरे नवे (थोडे मोठे) घर विकत घ्यायचे आहे.
नवे घर हे [वडलांच्या सध्याच्या घराच्या विक्रीतून आलेली रक्कम ] + [कमावत्या अपत्याची आर्थिक भर] अशी जुळणी करून घेण्यात येणार आहे.
नवे घर वडील (स्वेच्छेने) थेट अपत्याच्याच नावे करू इच्छितात.

या व्यवहारात-
१. वडिलांना घराच्या विक्रीतून आलेल्या रकमेवर (कसल्याही प्रकारचा) कर भरावा लागतो का?

विषय: 

घराची बाह्य व अंतर्गत स्वच्छता कशी ठेवावी

Submitted by निराली on 28 May, 2011 - 17:24

परदेशातल्या व देशातल्या घरांमधे एक मोठा फरक जाणवतो तो म्हणजे धुळीचा व स्वच्छतेचा.
परदेशात खुप कमी श्रमात घर स्वच्छ ठेवता येते पण भारतात रोजचं डस्टिन्ग निदान दोनदा तरी करावं लागतं. पण दोन्ही ठिकाणी जर right tools and products माहीती असतील तर काम खुप सोप्पं होतं.

काही बाफं वर सिंक व बाथरूम किंवा भांडी कशी स्वच्छ ठेवावीत हे प्रश्नं पाहिले म्हणून हा घराच्या स्वच्छतेचा (सगळ्याच प्रकारच्या) धागा उघडलाय.

बरेच वेळा काही जणांना जे products किंवा पद्धती अगदी बेसिक वाटतील त्या बकिच्यान्ना माहिती पण नसतील त्यामुळे जे काय माहिती असेल, बेसिक किंव्हा रीसर्च केलेले ते सगळे लिहावे, ज्याने अनेकांना

सेवा कर (service tax)

Submitted by गुणेश on 15 June, 2010 - 23:13

नवीन घर खरेदी करताना service tax लागू झाला आहे. याबद्दल कोणाला सविस्तर माहिती आहे का? माझे काही प्रश्न आहेत :
१. किती तारखेपासून tax लागू झाला आहे?
२. ३१ मार्च पूर्वी बुकिंग आणि registration झाले असल्यास tax भरावा लागेल का?
३. घराची काही रक्कम भरली आहे. तर उरलेल्या रकमेवर tax भरावा लागेल कि पूर्ण रकमेवर?
४. यासंदर्भात कोणाला official वेब साईट माहिती आहे का?

Subscribe to RSS - घर पहावे बांधून