नविन घर पुण्यात घ्यावे की नवी मुंबईत?

Submitted by प्रथम म्हात्रे on 3 April, 2024 - 10:17

मी नवीन घर घ्यायचा विचार करतोय. पण मुंबईत घ्यावे की पुण्यात हे नक्की होत नाही आहे. मी आयटी क्षेत्रात आहे, माझे ऑफिस मुंबईत आहे, पण पर्मनंट WFH आहे.

बजेट - ९० लाख ते १ कोटी
रीक्वायर्मेँट - २ BHK

नवी मुंबईत कार्पेट एरिया खूपच कमी आहे, पण कनेक्टिविटी चांगली आहे.
याउलट पुण्यात कार्पेट एरिया चांगला मिळतोय, पण स्वत:च्या वाहनांशिवाय पर्याय नाही.

क्रुपया मार्गदर्शन करावे.

Group content visibility: 
Use group defaults

पुणे.
बाकी सगळं समान असेल तर हवामान या एकाच कारणासाठी पुणे.

स्वच्छ सुंदर शांत शहर हवे असेल तर नवी मुंबई..
लाईफ फुल्ल ऑन हॅपनिंग हवे असेल तर मुंबई..
पण कार्पेट एरिया अजून कमी होईल..
जे शहर जे लोकेशन राहण्यास उत्तम सुखसोयीचे तिथे किँमत जास्तच मोजावी लागणार.. त्याला पर्याय नाही.

>>>स्वत:च्या वाहनांशिवाय पर्याय नाही.>>>
पुण्यातही मेट्रोच्या आजूबाजूला शोध घ्या.

पुण्यात दिल्ली पंजाबी लोकांचे लोंढे येतात हो. आणि तुम्हीआम्ही मराठी लोकं विचार करत बसतो. (लोकं की लोक? Sad नेहमी गोंधळ होतो )
पुण्यातच्च्च घ्या.

धन्यवाद...
तुर्तास माझेही मत पुण्यासाठी अनुकूल आहे.

कामा जवळ घ्या. नेरूळ, सीबीडी, नवीन पनवेल पाहा. ठाणे किंवा पुणे किंवा मुंबई सीएसएमटी रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळते.
पुण्यात सकाळची सिंहगड पकडता येणे इतक्या जवळ जागा मिळणे शक्य नाही. रिक्षावाले सकाळी सहाला नाक्याला येतात. तर सहाची गाडी कशी मिळेल.

नाक्यावर (चौकात?) गप्पा मारायला पुणे ठीक आहे.

पर्मनंट लाईफ मध्ये काही नसते... घर घेताना हे ध्यानात ठेवून विचार करा.

मी मुंबई सोडायला मला जमेल का याची खात्री नसल्याने आधी चार वर्षे वाशी, नवी मुंबईत भाड्याच्या घरात राहून बघितले... मग खात्री झाल्यावरच तिथेच जवळपास घर घेतले.

जर तुम्हाला अशी ट्रायल घेणे शक्य असेल तर त्याचाही विचार करा...

घर घेऊच नका, पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवा जसे शेयर, फंड, सोने, crypto, इत्यादी. तुम्हाला हवे त्या ठिकाणी घर भाड्याने घ्या आणि आलेल्या प्रॉफिट मधून घर भाडे भरा.

स्वतःचे घर हवेच असेल तर नॉन अर्बन एरिया मध्ये छानपैकी टुमदार घर बांधा, ते ही भाड्याने द्या, त्यातून ही पैसा कमवा, जेव्हा फारच वाटले तर त्या घरात राहायला जा (तुम्हाला WFH आहेच की आणि भारतात आता सगळीकडे उत्तम इंटरनेट कनेक्शन आहे).

व्यावहारिक दृष्ट्या घर विकत न घेता ते पैसे गुंतवून भाड्याच्या घरात राहणे फायदेशीर असावे.. पण इमोशनली विचार करता आपल्या मालकीच्या आणि हक्काच्या घरात राहायची एक वेगळीच मजा असते जी रेंटने राहताना येत नाही.

आपल्या मालकीच्या आणि हक्काच्या घरात राहायची एक वेगळीच मजा असते जी रेंटने राहताना येत नाही
>>>
बरोबर, म्हणूनच त्यासाठी गावाकडे एक छानसे घर बांधावे. तसे ही गांधीजी बोलून गेले आहेत - "गावाकडे चला"

आणि शहरीकरणाचे दुष्परिणाम आपण बघतच आहोत, त्यामुळे मस्त गावाकडे राहावे, शेती करावे, WFH आहे तर तिथून काम करावे, बक्कळ पैसा कमवावा.

मुंबईत सायन माहीमच्या पुढे ओटो रिक्षा मिटरने चालतात. पहिल्या दीड किमीटरला २३ रु, नंतरच्या प्रत्येक किमीटरला १६.
गावाकडे चाळीस किंवा साठ रुपये किमीटरने चालतात. दक्षिणेकडे मीटरसच नसतात. मुख्य नाक्या पासून तीन किमिटर म्हणजे आणखी रिटर्न भाडे दिवसाही घेतात. भाजी - वांगी, भेंडी ८०/- किलो. कसला डोंबलाचा बक्कळ पैसा कमावणार?
दुपारी बत्ती गुल असते. करा वफ्राहो झाडाखाली बसून.

शहरातले लोक गावाकडे जाऊन घर बांधतात आणि तिथे राहतात हे गावच्या लोकांना आवडत नाही.. भावकीत राडा होतो..
तसेच गावची निसर्गरम्य हिरवळ वगैरे थोड्या काळासाठी ठिक आहे.. पण शहरातील तरुणांना जी हिरवळ बघायची सवय असते ती गावाला नाही दिसली तर त्यांचा जीव रमणे अवघड आहे..

हो मी batu चा विद्यार्थी.

नवीन Submitted by बोकलत on 5 April, 2024 - 18:51
>>> कोणती बॅच? ओळखले नाही तुम्हाला.

बरोबर, म्हणूनच त्यासाठी गावाकडे एक छानसे घर बांधावे. तसे ही गांधीजी बोलून गेले आहेत - "गावाकडे चला"

आणि शहरीकरणाचे दुष्परिणाम आपण बघतच आहोत, त्यामुळे मस्त गावाकडे राहावे, शेती करावे, WFH आहे तर तिथून काम करावे, बक्कळ पैसा कमवावा.

Submitted by WallE on 5 April, 2024 - 14:25
>>> अगदी सहमत. मी कोरोना काळानंतर अडीच वर्षे गावी राहून काम केले, पण आता मुलाच्या शिक्षणासाठी शहरात शिफ्ट झालोय.

कोरोना काळात सगळे शक्य होते. सर्वांचेच आयुष्य बदलले होते. मी कंबरेपर्यंत केस वाढवले होते. वेण्या घालायचो. पण ऑफिस रेग्युलर झाले आणि कापावे लागले. तसेच त्या काळात गावाकडे राहणे शक्य होते. नंतर आयुष्य पटरी वर आले तसे तुम्हालाही शहरात यावेच लागले.

तर आता अजून शंभर वर्षे तरी असला आजार आता येत नाही. त्यामुळे घर घेताना त्याचा विचार करू नये.

प्रथमेश आपण एकाच बॅचचे आहोत फक्त ट्रेड वेगळी होती. तू पण मला ओळखतोस. जाऊ दे जास्त विचार नको करू नंतर कधी भेटलास तर सांगेन

मुलांना चांगल्या शाळेचे ,

मुलांना चांगल्या शाळेचे , classes चे पर्याय उपलब्ध असणे , चांगल्या मेडिकल facilities असणे, पत्नीस तिच्या career sathi योग्य संधी उपलब्ध असणे व आपल्या पुढील career साठी चांगल्या opportunities असणे हे सगळे मुद्दे घराचे location निवडताना महत्वाचे आहेत. माझ्या ओळखीच्या बऱ्याच मुलांनी जे ठाणे / मुंबई /नवी मुंबई येथे नोकरी करतात त्यांनी पुण्यात घर घेतलाय कारण तिथे नवी मुंबई /ठाणेच्या तुलनेत त्याच किमतीत carpet area जास्त मिळतो. घर विकत घेणे हा महत्त्वाचा निर्णय आहे. एकदा घर घेतले की ते सहज विकून relocate होता येत नाही. माझ्या मते near future मध्ये मुले मोठी होणार ,तुमचे आई वडील सोबत राहायला येणार ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरले तर जास्तीचा carpet area हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे.
पुण्याचे हवामान देखील मुंबई पेक्षा जास्त चांगले आहे.
IT companies जिथे आहेत अश्या area मध्ये घर घ्याल तर पुढे company बदलली तरी प्रवास साठी लागणारा वेळ मुंबई च्या तुलनेत खूप कमी असेल. ठाणेला राहून रोज बांद्रा ला प्रवास करावे लागणारे लोक माझ्या कुटुंबात आहेत आणि त्यांचा खूप वेळ प्रवासात जातो. बाकी पुणे मध्ये BATU चे खूप लोक settled आहेत.

मागे कुठल्यातरी धाग्यावर मी माझ्या भावाच्या मॉडेल कॉलनीमधल्या नविन प्रॉजेक्टविषयी लिहीले होते. मला संपर्कातून काही लोकांनी त्याबद्दल विचारले होते. तेंव्हा देण्यासाठी माहिती उपलब्ध नव्हती. आता झाली आहे. Happy
परंतु तो धागा आता मला सापडत नाहीये. म्हणून इथे लिहीते आहे.
Date: 24th/25th/26th May
Time: 11am to 9pm
Location: Canal Road, Model Colony (https://oia.link/Bellagio)

Bellagio_ModelColony.jpeg