सेकंड होम ठेवावे की विकावे?

Submitted by sneharajan on 21 April, 2016 - 03:32

आमचे एक बदलापूर घेतलेले सेकंड होम आहे.२४-२६लाखाला १ वर्षांपूर्वी घेतले होते. इथून पुढे किंमत तशी काही फार वाढेल असे वाटत नाहीये. इन्वेस्ट्मेंट म्हणूनच घेतले होते. पण सोसायटीसाठी लागणारे पैसे व कर्जाचा हप्ता पहाता घर ठेवण्यापेक्शा विकले तर बरे होईल का असे वाटू लागले आहे.
मिळू शकणारे भाडे अजून मिळतच नाही आहे .
कृपया सुचवा विकावे कि नाही !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला कथाच वाटली...
थ्रील...उत्तन ते बदलापूर.. निळ्या माळरानावरुन

एक वर्षापुर्वी फारच महाग किंमती मधे घेतले. लोन असेल तर अजुन जास्त किंमत होईल. कुठल्या बाजुला आहे.? वेस्ट ला असेल तर तुम्हाला परत इतकी किंमत नाही मिळणार स्टेशन जवळ असेल तर २० पर्यंत आणि लांब गावात असेल तर १५ च्या पुढे कोणी देणार नाही.
आणि इस्ट ला असेल तर २२ पर्यंत जाईल

बदलापुरमधले २६ लाखाचे घर किमान ५-६ वर्षांनी ३०च्या आसपास जाईल ते ही पुर्वेकडील,
२६ जुलैमुळे दोन्ही बाजुंमधे ६ ते ९ लाखाचा फरक आहे.

२०१३ नंतर ज्यांनीही इन्वेस्टमेंट म्हनून सेकंड होम घेतले ते सर्व खड्ड्यात पैसे घालणारे आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. सेकंड होममधे गुंतवणूक करतांना शंभरवेळा विचार करणे आवश्यक असते. मी स्वतः एका प्रतिष्ठित व सेकंड होम कन्सेप्ट महाराष्ट्रात पहिल्यांदा आणून लोकप्रिय करणार्‍या कंपनीत मोठ्या पदावर तीन वर्षे काम केले आहे. २००८ ते २०१२ सुवर्णकाळ होता. नंतर दुस्तरघाट सुरु झालाय. सेकंडहोम म्हणजे आपले जास्तीचे पैसे उचलुन विनाकारण दुसर्‍याला देऊन टाकणे. न त्या घराचा राहण्यासाठी उपयोग ना विकण्यासाठी. तुम्हाला ते घर घेतांना जेवढी मार्केटींग स्किल्स वापरली गेली तेवढी तुम्ही ते दुसर्‍याला विकतांना वापरुच शकत नाही. सेकंड होम विक्रि हे फक्त मार्केटिंग चे यश असते. बर्‍याच ठिकाणी प्रोजेक्ट कंप्लिट होत नाहीत. झाले तरी कोणी राहायला येत नाही. विकायला गेले तर परतावा सोडा खरेदीदार मिळत नाहीत.

आता तुमचा प्रश्नः तर हे घर ताबडतोब विकावे असे मी म्हणेन. जेवढ्याला घेतलं तेवढ्याला (सगळे खर्च, जाणेयेणे, मेन्टेनन्स, वर दोन लाख रुपये) इतके मिळाले तरी पुरे. लवकर गळ्यातुन सोडवुन घ्यावे. अन्यथा किमान २० वर्षे थांबावे. बदलापुरात सेकंड होम ही कन्सेप्ट अगदी हास्यास्पद आहे. (हे तुमचे सेकंड होम म्हणजे आपल्या नावावर अजुन एक फ्लॅट असेल तर क्षमा असावी कारण 'सेकंड होम' आणि 'आणखी एक घर' दोन्ही कन्सेप्ट वेगळ्या आहेत) कारण बदलापुरात मोठा बदल होणे अद्याप दहा वर्षे तरी शक्य नाही. मोठा बदल झाल्याशिवाय घरांच्या किंमती वाढत नाहीत. तसेही रिअल इस्टेट गाळात रुतले आहे. २०२२ पर्यंत अशीच परिस्थिती राहणार. २००८-२०१२ सारखी बबलगम बलून स्थिती आता शक्य नाही.

१ वर्षापूर्वी २४-२६ लाखात म्हणजे रजिस्ट्रेशन वगैरे धरून असेल तरी थोडे महाग पडले हे तर आहेच.आता विकताना थोड्या लॉसची तयारी असेल तर विका.
थांबू शकत असाल तर ५-६ वर्षांत चांगले रिझल्ट्स मिळू शकतील.तोपर्यंत कोणी एजंट गाठून घर भाड्याने द्या.सध्या भाडे अपेक्षेपेक्षा कमी मिळाले तरी चालू ठेवा.महिन्याच्या खर्चातील खड्डा थोडाफार भरू शकेल.

सगळे एवढ क्रिटीसाइझ का करतायत? त्यानी निर्णय घेतला पण तितकासा बरोबर ठरला नाही...होत अस, पुढे काय
घडेल हे काय आधिच कळत का लोकाना? कर्ज काढुन सेकन्ड होम घेतात बरेच लोक? याची निवड चुकली असेल....

प्राजक्ता तुमच्या मताशी सहमत. लोकानी एकडे सल्ले चांगले दिलेत पण क्रिटीसाइझ करुन.

कधी कधी आयुष्यात चुका होतात. सगळ्याकडुन होतात. माझ्या बाबतित पण इन्शुरन्स बद्दल झाले आहे.

जर तुम्हाला असे वाटत असेल की फायदा होणार नाही तर त्यातुन बाहेर पडुन. कारण बाहेर नाही पडला तर लोन व्याज भरावे लागते आणि तुमच्या स्वताच्या पैसावर व्याजाला मुकत आहात.

एक लक्षात असुद्या की जागेच्या किमती एक वर्षात तेवढ्याच राहिल्या किंवा व्याजाच्या रकमेपेक्षा कमी वाढल्या (भाड्याची रक्कम वजा करुन) असल्यास तरी आपले नुकसानच आहे.

तुम्ही सेकंड होम कधीतरी सुट्टीत स्वतः जाऊन राहू म्हणून घेतले असेल तराअजून अशा अनेक सुट्ट्या तिथे घालवा.

इनव्हेस्टमेंट म्हणून घेतले असेल तर थोड थांबा. रेंट करा. भाडे फायद्यात नाही पडले तरी घराचा मेंटेनन्स नक्की वळता होईल. मग काही वर्षांनी नक्कीच बरा भाव येईल.

लोन थोडेसे रिपे करणं हाही एक चांगला ऑप्शन आहे. त्यानी दरमहा हप्ता कमी होईल.

प्राजक्ताशी पूर्णपणे सहमत.

येथे पुष्कळ तज्ञ मंडळी आहेत म्हणून सल्ला विचारत आहे.
अहमदाबाद येथे गिफ्ट सिटी मध्ये ऑफिस च्या जागेत गुंतवणूक केली आहे. २०१५ मध्ये ५० लाखाची. अजून बांधकाम चालू आहे. हि जागा ठेवावी कि विकावी ?

धन्यवाद

सेकंड होम स्वतः निवांत जाऊन रहायला सुट्टीत म्हणून वापरता येईल, भाड्याने जात असेल तर देता येईल, पण कुलुप लावून महिनोन महिने बंद ठेवू नका, घरं त्यामुळे जास्त जुनी दिसायला लागतात+मेंटेनन्स कडे दुर्लक्ष होतं.