रफी साहब, अपने शायराना अंदजमें...
Submitted by अतुल ठाकुर on 30 July, 2020 - 21:49
होय. बऱ्याच संगीत प्रेमींना ठाऊक नसणार...
आपल्याला फक्त माहीत असेल की रफिजींनी "शोधिसी मानवा" हे मराठी भाषेतील भाव गीत गायले तेही अत्यंत मराठी गायकासारख्च...पण त्यांनी एक पूर्ण अल्बम मराठीत केलंय...त्यात जवळपास दहा बारा गाणी असतील. त्यातली सगळीच गाणी अप्रतिम आहेत. मी तर ती गाणी माझ्या लहानपणापासून ऐकत आलोय. हा छंद जीवाला लावी पिसे, नको भव्य वाडा, हसा मुलांनो हसा, माझ्या विरण हृदयी(ब्रेकअप वल्यांसाठी), नको आरती की नको पुष्पमाला...आणि बरीच...
मला खंत याच गोष्टीची आहे की बर्यांच लोकांना माहीत नाही...कधी आजकालच्या गायकांना सुद्धा ते गाताना पाहिलं नाही...