Submitted by माझेमन on 22 December, 2023 - 03:27
मैलाचे दगड कसे असतात तुम्हाला माहिती आहेच. ते नसले तर तुमचा प्रवास काही थांबत नाही. पण असलेच तर तुम्हाला गंतव्यस्थानी पोहोचायला थोडी मदत होते. रफीची गाणी उत्तम ठरण्यासाठी त्यावर कुणी चांगला अभिनय केलाच पाहिजे अशी काही गरज नव्हती. पण काही दगडांनी आपल्या न-अभिनयाने रफीच्या जीव ओतून गाण्याकडे आपले लक्ष वेधून घेतले. म्हणजे मॉडेल्सनी चेहरे कोरे ठेवले कि त्यांच्या अंगावरच्या कपडे किंवा दागिन्यांकडे आपले लक्ष जास्त जाते तसेच काहीसं…..
पहिला मानाचा दगड आहे 'प्रदीप कुमार'. गाणं - 'हम इंतज़ार करेंगे'.
रफी तिकडे 'यही जुनूं यही वहशत हो' म्हणो की 'जवां सितारा ए किस्मत हो' याच्या चेहऱ्यावरचे भाव 'भटकते फिरते है, हम आप अपनी लाश लिए'चेच
तुम्हाला अशी कोणती गाणी आवडतात?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
जगदीप (सूरमा भोपाली) वर
जगदीप (सूरमा भोपाली) वर चित्रीत झालेलं पास बैठो तबियत सम्हल जायेगी
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=Sm_tmr7cYQk
दो घडी वोह जो पास आ बैठे.
बादशाह ए दगडस - भारत भूषण. व तेही समोर मधुबाला सारखी अप्सरा असताना.
हे लेखन 'माबोवरती नवीन' मध्ये
हे लेखन 'माबोवरती नवीन' मध्ये का दिसत नाहीये? कारण 'ऑल युझर्स' अॅक्सेस आहे तरी का दिसत नाहीये?
राजेंद्रकुमार ज्युबिली स्टार
राजेंद्रकुमार ज्युबिली स्टार होता. चाळीस चित्रपट ओळीने ज्युबिली हिट दिले होते त्यामुळं मोठा दबदबा होता. त्या वेळी तरूण असणार्यांसाठी तो लाडका स्टार होता. शिरीष कणेकर म्हणायचे कि जर दिलीपकुमार झाला नसता तर राजेंद्रकुमार कुठे तरी शेंगा, मुरमुरे विकत असता. त्या वेळी दिलीपकुमारची नक्कल करणारे असे बरेच होते आणि त्यांना आवाज पण रफीचाच हवा असायचा. जॉय मुखर्जी तर कॉण्ट्रॅक्ट मधेच अट टाकायचा कि रफीचा आवाज त्याच्यावर चित्रित होईल.
हे थोडंसं त्या वेळच्या शाहरूख खानासरखं झालं. आज राजेंद्रकुमारचं नावही निघत नाही. दिलीपकुमार आजही लक्षात आहेत.
इव्हन राजेश खन्ना औटघटकेचा सुपरस्टार होता पण अजरामर आहे.
राजेंद्रकुमार आणि जॉमु हे आजचे शाखा आणि सखा आहेत.
जॉय मुखरजीची सर्वच गाणी फार
जॉय मुखरजीची सर्वच गाणी फार मस्त म्हणजे खूपच छान आहेत.
हेहे, ठोकळे, अगदी पटले.
हेहे, ठोकळे, अगदी पटले.
हा हा. विषय आवडला.
हा हा. विषय आवडला.
मी मागे कुठल्यातरी धाग्यावर याबद्दल लिहिले होते ते पुन्हा लिहितो. ना तो कारवा की तलाश है - या गाण्यात आधी बराच वेळ मन्ना डे आणि आशा आहेत आणि पडद्यावर कुणीतरी उस्तादजी. तिथे पु पक्ष आणि स्त्री पक्ष यांमध्ये जुगलबंदी चालू आहे. पु पक्ष वरचढ व्हायला लागतो हे बघून प्रेक्षकांत बसलेला एक मैलाचा दगड - तोच तो आपला भारत भूषण - तो उठतो आणि स्त्री पक्षाच्या बाजूने येऊन बसतो. इथे रफीचा स्वर्गीय आवाज ऐकू येतो. तो आवाज ऐकून इतक्या वेळ दुसऱ्या दालनात (की आपल्या घरी) रेडिओ ऐकत असलेली मधुबाला धावत निघते आणि (अप-घात स्थळावर) येते. रफी शिरा ताणून गात आहे आणि त्यावर हा दगड चेहऱ्यावर माशी सुद्धा हलू न देता अभिनय करत आहे हे पाहताच स्तेजवरची अभिनेत्री बेशुद्ध पडते आणि मधुबाला ओक्साबोक्शी रडते.