प्लुटोनिया...

Submitted by अतुल. on 20 July, 2015 - 13:44

आयुष्य प्लुटो सारखं जगावं.
कुणी येतात शोध घेतात
नवीन मित्र सापडला म्हणतात
मोठे नाव सन्मान देतात.
.
कालांतराने, "हा तर खूप छोटा" म्हणतात.
"मित्र व्हायच्या लायकीचा नाही" म्हणतात.
पुन्हा जवळून येऊन निरखून जातात
"काय करावे याचे" बोलतात.
.
हा लहान तो मोठा करणारे
द्विधा मनाचे छोटे छोटे जीव.
.
असो. त्यांचे त्यांच्यापाशी.
अनेक येतील. अनेक जातील.
आपण मात्र आपले, सूर्य रुपी
ध्येयाभोवती अखंड फिरत राहावं.
.
आयुष्य प्लुटो सारखं जगावं... Happy Happy Wink
.
-अतुल (२० जुलै २०१५)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वाह....खूपच मस्तं लिहिलय. अगदी हटके कल्पना. एकदम क्‍लिक झाली.

" आपण मात्र आपले, सूर्य रुपी
ध्येयाभोवती अखंड फिरत राहावं.
.
आयुष्य प्लुटो सारखं जगावं.." हे छानच.