कॉमिक्स चे भावविश्व

Submitted by Sanjeev.B on 28 December, 2016 - 03:29

तर मित्रांनो (आणि मैतरणिंनो सुध्दा बरं का) , शिर्षक वाचुन बालपणीच्या रम्य दिवस आठवले असणार ना, हो हो फॅण्टम, मँड्रेक द मॅजिशियन, लोथार, फ्लॅश गॉरडन, रिप किर्बी, रिची रिच आणि कॅडबरी, ही मॅन आणि our very own Indian comic heroes, बहादुर, चाचा चौधरी आणि साबु, पिंकी, सुप्रिमो, शिकारी शंभु, सुप्पंडी, हे सर्वजण आपले लहाणपणी चे भावविश्व व्यापुन टाकले होते. कधी पॉकेट मनी वाचवुन कॉमिक्स खरेदी करायची, तर कधी मित्रा कडे असणारे कॉमिक्स एक्सचेज करायचे. रेल्वे स्टेशन वर गेले की हमखास कॉमिक्स खरेदी व्हायची. रेडिओ वर शनिवारी डायमंड कॉमिक्स चे कार्यक्रम ही असायचे, त्यात त्या कॉमिक्स च्या आगामी आकर्षण असणारे भाग चे हायलाईट्स असायचे, त्याचे जिंगल ही खुप मस्त होते, चुन्नु पढता डायमंड कॉमिक्स, मुन्नी पढती डायमंड कॉमिक्स, मजेदार ये डायमंड कॉमिक्स, डायमंड कॉमिक्स.

शाळे च्या ग्रंथालयात अमर चित्र कथा हे आपल्या पौराणिक कथांवर आधारित चित्रपुस्तक मिळत, ते ही आम्ही आवडीने वाचत होतो. चांदोबा ही आवडीने वाचत होतो.

त्यावेळी पड्णारे प्रश्न पण कसे होते ते बघा :-

फॅण्टम ने मारलेले ठोस्यांनी चेहर्यावर स्क्ल ची निशाणी उमटत असे, असं खरंच होत असणार का.

Phantom.jpg

मँड्रेक मॅजिशियन असुन सुध्दा त्याला लोथार सारखा पावरबाज असिसटंट का लागतो

Mandrake The Magician.jpg

लोथार जर एका फायटित सहा सात जणांना लोळवु शकतो तर मँड्रेक ला का नाही लोळवत

Lothar.jpg

मँड्रेक जास्त पावरबाज कि फॅण्टम जास्त पावरबाज.
लोथार फाईट मारतो तेव्हा खरंच WHAM BAM SLAM असं ऐकु येतं का, कारण आपल्याला इकडे हिंदी पिच्चर मध्ये तर ढिशुम ढिशुम ऐकु येतं. आम्ही तर आमच्या फाईट सिन्स मध्ये ढिशुम ढिशुम ऐवजी WHAM BAM SLAM म्हणत असु.

फ्लॅश गॉरडन खरंच अस्तितवात आहे का ???

Flash Gordon.jpg

फॅण्टम आणि सुपरमॅन दोघे भावंड असतील कारण दोघे पॅंट वर अंडरवेअर घालतात (हे आपलं असंच सहज टाईमपास म्हणुन ).

बहादुर एव्हढा लुकड्या असुन एव्हढा डेरिंगबाज कसा

Bahadur & Bela.jpg

लोथार आणि साबु (चाचा चौधरी चा असिसटंट) पण बिछडे हुए भाई असणार

रिप किर्बी एकदम बोरिंग माणुस असणार कारण त्याचे एकही स्टोरी इंटरेस्टिंग नव्हती

Rip Kirby.jpg

शिकारी शंभु एव्हढा वेंधळा असुन ही शिकारी कसा करतो

Shikari Shambhu.jpg

सुप्पंडी एव्हढा वेंधळा माणुस जगात कुठेही नसणार

Suppandi.jpg

रिची रिच एव्हढे डॉलर्स आपल्याकडे का नाहीत

Richie Rich.jpg

कॅडबरी सारखा बटलर आपल्याकडे पण हवा

Cadbury The Butler.jpg

सुप्रिमो
Supremo.jpg

चाचा चौधरी साबु आणि पिंकी

Chacha Chaudhary & Sabu.jpgPinki.jpg

टि व्ही वर तेव्हा दाखवणारे कार्टुन कॉमिक्स म्हणजे टॉम अॅन्ड जेरी, वॉल्ट डिस्ने चे मिकी आणि मिनी माऊस, डॉनल्ड डक आणि डेझी डक, आणि प्लुटो हे मला फार आवडायचे. सर्वात जास्त मजा तर डॉनल्ड ला जेव्हा राग येत होतं, तेव्हा तो जे आवाज काढत होता ते फार फनी वाटायच. पोपॉय द सेलर मॅन पण फार आवडायचा, स्पिनॅच खाऊन तो जे काही अचाट कामे करायचा ते पाहुन तर आम्ही पण स्पिनॅच ची मागणी करत होतो. टॉम अ‍ॅन्ड जेरी चे कुरापती तर सदाबहार होते. ही मॅन अ‍ॅन्ड मास्टर्स ऑफ दी युनिवर्स पण फार आवडत होतं

Tom & Jerry.jpgWalt Disney Cartoons.jpgPopeye The Sailor Man.jpgHe Man And The Masters Of The Universe.jpg

तर मित्रांनो (आणि मैतरणिंनो सुध्दा बरं का), तुम्ही पण तुमचे आठवणी शेअर करा.

धन्स Happy

संजीव बुलबुले (२८१२२०१६)

आभार : सर्व छायाचित्र आंतरजाल वरुन साभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हि चित्रे दिली ते बेस्ट.. यातले पहिल्या पिढीतले सर्व ओळखीचे आहेत !

आधी इंग्रजी कॉमिक्स ची मराठीत भाषांतरे आली, नंतर अमर चित्र कथा आल्या.. तोपर्यंत मी बालवयात होतो.
पण नंतर फँटम सिनेमा वगैरे आले, ते जास्त आवडले... पण नंतर तशी पुस्तके वाचायचाही कंटाळा आला.

पण अजूनही डिस्ने ( आणि डिस्नेचेच ओरिजिनल कार्टून्स ) बघायला आवडतात. अगदी परत परत बघितले तरी आवडतात !

भारतीय कॉमिक्स मधे बरेच हिरो आहे.
राज कॉमिक्स डायमंड कॉमिक्स, अमर कथा, इ.

सुपर कमांडो ध्रुव, नागराज, बांकेलाल, टोड्स, इंन्स्पेक्टर स्टील, भोकाल, परमाणू, शक्ती, नताशा, ग्रँड मास्टर रोबो,

बहादूर नंतरच्या कॉमिक्स मध्ये बराच हट्टाकट्टा झालेला होता.

या कॉमिक्स नंतर मग राज कॉमिक्स चे दिवस आले. त्यांचे नागराज, सुपर कमांडो ध्रुव , डोगा, परमाणु असे थोडे देसी थोडे ठापलेले सुपर हिरोज मस्त होते.

naagraj.JPGSuperComandoDhruv.JPG

मस्त!

चेहर्‍याने जवळपास सारेच ओळखतो पण मी यातले फक्त चाचा चौधरी आणि साबूच तेवढे वाचलेय.
यामागचे कारण म्हणजे मला हे चित्रकथांचे कॉमिक्स फसवायचे धंदे वाटायचे, म्हणजे खूप सारी पाने आणि वाचायचा मजकूर जेमतेम. आधीच माझा वाचायचा स्पीड अफाट. त्यामुळे घेतले पुस्तक हातात न खाली ठेवायची वेळ झाली असे व्हायचे. त्या वयात वाचन असे फक्त मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये लायब्ररी लाऊनच व्हायचे. दिवसाला चार वेळा लायब्ररीत जावू लागू नये म्हणून चार पुस्तकांचे डिपॉजिट भरलेले असायचे, एकावेळी चार गोष्टींची पुस्तके बदलून आणायचो, त्यातही मग कॉमिक्स आणली तर दिवसभराला पुरणार कशी हा हिशोब Happy

आहा...मस्तं धागा.
चाचा चौधरी, चंपक, चांदोबा तर मस्तच. सुपन्दि, पिंकी आणि मधु मुस्कानही फार आवडायचं मला. मधु मुस्कान मधला डॅडी जी खूप मस्तं.

मस्त धागा! ही कॉमिक्स म्हणजे जीव का प्राण होती. कधीही रेल्वेने आजीकडे जायचे असले की प्रथम पुस्तकांचा स्टॉल डोळ्यासमोर यायचा. यातली बहुतेक कॉमिक्स कॅरॅक्टर्स चांगल्याच परिचयाची आहेत कारण ती त्या वयातील भावविश्वाचा एक भागच होता. परंतु ही कॉमिक्स फक्त आजीकडे जातानाच मिळायची किंवा एखाद्या मित्राकडे आली की त्याचे वाचून झाल्यावर. पण चंपक, ठकठक आणि चांदोबा मात्र महिन्याच्या महिना मिळायचे.

नागराज आणि ध्रुव चा सेट अजुन पण आहे, वेळ मिळाला की वाचून काढतो, चाचा चौधरी मात्र एका लाइब्ररी ला देऊन टाकले...