लोक स्वतःला सुंदर का समजतात????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 14 November, 2017 - 06:21

लोक स्वतःला सुंदर का समजतात हा प्रश्न मला अनेक दिवसापासून पडला आहे. अग्दी कालपरवापर्यंत मी ही स्वतःला फार छान समजत होतो ,पण प्रत्यक्षात आपण दिसायला ॲवरेजही नाही हे लक्षात आले.इंटरनेटवर एक ॲप आहे ,त्यावर मी माझा फोटो अपलोड करुन ॲनालीसिस केल्यावर मी सुंदर तर सोडाच पण अगली (कुरुप) आहे असा त्या ॲपचा रिझल्ट होता जो मला आधीच माहीत होता.
स्वतःला सुंदर समजण्यात महीला आघाडीवर असतात .प्रत्येकीला वाटत असतं की आपण बर्फी आहोत.प्रत्यक्षात अशा मुली व महीला दिसायला ॲवरेजच असतात.पण नखरा असा असतो की साला दिपिका करीनाला कॉम्प्लेक्स देतील.
पुरुषही यात मागे नाहीत शीट कलर्ड स्कीन,सुटलेले पोट,केसांनी पुकारलेला असहकार असे असुनही वावर मात्र मिलिंद सोमन किंवा जॉन अब्राहम सारखा असतो.
खरच,का समजत असावेत लोक स्वतःला सुंदर??????

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी स्वत:ला सुण्दर समजतो. ईनफॅक्ट अफाट सुण्दर समजतो. एवढेच नाही तर माझी गर्लफ्रेंडही मला सुण्दर समजते. तिने माझे सौंदर्य बघूनच मला पसंद केले असावे. याच कारणासाठी ती मला माझा फोटो कुठल्याही सोशलसाईटवर अपलोड करू देत नाही. पण मला कल्पना आहे की माझे सौंदर्य हे मला कर्तुत्वाने नाही तर नशीबाने मिळाले आहे. त्यामुळे मी कधी त्याचा अहंकार बाळगला नाही. मात्र स्वत:च्या सौंदर्याचे कौतुक करायला फार आवडते. ते पाहून कोणाला पोटदुखी झाली तर हा त्याचा प्रॉब्लेम. त्याचे मी काही करू शकत नाही. ईतका सिंपल फंडा आहे माझा Happy

इंटरनेटवर एक ॲप आहे ,त्यावर मी माझा फोटो अपलोड करुन ॲनालीसिस केल्यावर मी सुंदर तर सोडाच पण अगली (कुरुप) आहे असा त्या ॲपचा रिझल्ट होता जो मला आधीच माहीत होता.
>>>>

कुठले एप आहे हे?
मला या एपची परीक्षा घ्यायला आवडेल !

कुठले एप आहे हे?
मला या एपची परीक्षा घ्यायला आवडेल !>> मलाही या अ‍ॅपमध्ये परीक्षा द्यायला आवडेल, नाव कळेल काय?

अ‍ॅप मधे परीक्षा द्यायची आहे की अ‍ॅप ची घ्यायची आहे ?

नाव कळेल का अ‍ॅप च? अस पण अ‍ॅप असत आणि लोक ते वापरता बघुन गम्मत वाटली...

अँप वापरून स्वतः कुरूप असल्याचे ठरवा....

यापेक्षा आरशात पाहता येत असूनही स्वतःमध्ये दीपिका किंवा मिलिंद किंवा जॉन शोधून त्या कॉन्फिडन्समध्ये आनंदात राहणारे लोक मजेत असतील.

कुरुपता माणसाच्या वागण्यातून दिसते, अँप सांगणार तुम्हाला तुम्ही कुरूप की देखणे ते? आणि असलाच तुम्ही कुरूप तर काय करणार आहात? स्वतःला देखणे समजणाऱ्यांबद्दल तुम्ही जे लिहिलेय त्यावरून तुम्ही स्वतःला काळोख्या खोलीत बंद करून सोबत फक्त मोबाईल ठेऊन आयुष्य कंठताय असे वाटतेय.

ॲप कोणते?>>>>प्ले स्टोअरला जावून सर्च करा,एक से एक ॲप आहेत.

काळोख्या खोलीत>>>>बरोबर,बॉर्डरलाईन स्किझोफ्रेनिक आहे मी त्यामुळे कदाचीत तुमचे म्हणने बरोबर असावे ,माझ्या pdoc चेही तेच मत आहे.

चेहर्‍याचे सौंदर्य कसे मोजतात? अनेक घटक आहेत -

  • सीमेट्री - चेहर्‍याची डावी व उजवी बाजू समान असणे.
  • प्रपोर्शन - कपाळ, गाल, नाक, कान, डोळे, दात, जबडा, जिवणी इत्यादी ठराविक प्रमाणात असणे
  • त्वचा - वर्ण काळा, सावळा, गव्हाळ, गोरा, निमगोरा कसाही असला तरी त्वचा नितळ, चमकदार असणे. त्यावर डाग, फोड, मुरुमे, सुरकुत्या इत्यादी नसणे
  • केस - कपाळावर विपूल केशसंभार असणे हे जरी आवश्यक वैशिष्ट्य असले तरी अनेक स्त्रीपुरुष विरळ केस असतानाही सौंदर्याचे इतर घटक प्रभावी असल्याने सुंदर दिसतात. तसेच विरळ केस नीट विंचरलेले असले किंवा पुरुषांमध्ये दाढी राखली तरी व्यवस्थित छाटलेली असेल तर सौंदर्यास बाधा येत नाही.

तुम्ही म्हणता तशा सौंदर्य मोजण्याच्या अ‍ॅपबद्दल मी मागे वाचले होते. माझ्या स्मृतीनुसार त्या अ‍ॅपने अँजेलिना जोली या विदेशी नटीस सर्वात जास्त गुण दिले होते. ही नटी प्रेक्षकांमध्येही चांगलीच प्रिय आहे त्या अर्थाने हे अ‍ॅप सौंदर्य मोजण्यात प्रभावी मानायला हवे. अर्थात या विदेशी नटीसारखीच दिसणारी एक नवीन देशी नटी - इशा गुप्ता इथे फारशी लोकप्रिय असल्याचे वाटत नाही म्हणजे हे अ‍ॅप भारतीय लोकांच्या सौंदर्य कल्पनांवर आधारित नसावे. तसेही जिवणी मोठी असलेली ज्युलिया रॉबर्ट तिकडे लोकप्रिय होते आणि काहीशी तशीच जिवणी आणि चेहरेपट्टी असलेल्या मीना नाईक या मराठी अभिनेत्रीला गुणी असूनही फारसे प्रेक्षक ओळखत नाहीत म्हणजे सौंदर्याचे मापदंड सर्वत्र एकसारखे नसतातच. आफ्रिका खंडातील काही देशात बदकासारखे पुढे आलेले ओठ हे सौंदर्याचे लक्षण मानले जात असल्याने अनेक युवती ओठात चपटी तबकडी धरून ओठांना मुद्दाम तसा आकार देतात. आपल्याकडे असा चेहरा कोणी सुंदर समजणार नाही.

अँप वापरून स्वतः कुरूप असल्याचे ठरवा....

यापेक्षा आरशात पाहता येत असूनही स्वतःमध्ये दीपिका किंवा मिलिंद किंवा जॉन शोधून त्या कॉन्फिडन्समध्ये आनंदात राहणारे लोक मजेत असतील.

कुरुपता माणसाच्या वागण्यातून दिसते, अँप सांगणार तुम्हाला तुम्ही कुरूप की देखणे ते? आणि असलाच तुम्ही कुरूप तर काय करणार आहात? स्वतःला देखणे समजणाऱ्यांबद्दल तुम्ही जे लिहिलेय त्यावरून तुम्ही स्वतःला काळोख्या खोलीत बंद करून सोबत फक्त मोबाईल ठेऊन आयुष्य कंठताय असे वाटतेय.
नवीन Submitted by साधना on 15 November, 2017 - 08:29 >>>>>>>>>>>सही पकडे है !!!!!!!

स्वतःला सुंदर समजणे आणि असणे यात जमिन आसमानाचा फरक आहे.
खरंतर सौन्दर्य हे आंतरिक असायला हवे. शरिराचे सौंदर्य हे सदासर्वकाळ मोहित करू शकत नाही. तुमचे गुण, सर्वांना आपलेपणाची वागणूक, सहिष्णुता, या आणि अशा प्रकारच्या अनेक गुणांनी आपले व्यक्तिमत्व बनते व ते आपल्याला अधिक सुंदर बनवते. आणि तेच दिर्घकाळ टिकते, मोहित करते.
प्रत्येक व्यक्तीसाठी सौंदर्याची व्याख्या निरनिराळी असते. कुणाला लांब केस आवडतात कुणाला छोटे. कुणाला पिठ्ठ गोरी त्वचा आवडते तर कुणाला सावळी.
पण आपल्याला ज्या व्यक्तीबद्दल प्रेम वाटते ती व्यक्ती आपल्याला नेहमी सुंदरच वाटते, त्यामुळे सौंदर्य म्हणजे अमूक अमूक चार गोष्टी हे सांगणे अतिशय अवघड आहे. हे म्हणजे आभाळाला काडेपेटित बंद करण्याचा प्रयत्न ठरेल.
म्हणतात ना "ब्युटी लाईज इन दी आईज ऑफ बिहोल्डर" ते तसे आहे. दृष्टी तशी सृष्टी.

त्यामुळे कोणते अ‍ॅप काय सांगते या कडे लक्ष देणे टाळावे. बाह्यसौंदर्यावर काम करायची ज्यांना गरज भासते त्यांना करू देत. तुम्ही तुमची सौंदर्याची व्याख्या काय आहे ती तपासून पहा आणि त्या व्याख्येत आपण बसतो का, बसत नसू तर आपल्याला त्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील याचा विचार करा.
ही वेगवेगळी अ‍ॅप्स आणि फेसबुक वर सतत फिरणार्‍या स्टुपिड् टेस्ट्स (तुम्हाला कोण प्रपोज करेल, तुम्ही सात जन्म कुणाबरोबर काढाल, तुमचा फेस कट तुमचे वय किती सांगतो इ) मजा म्हणून ठिक आहेत. त्याला इतके सिरियस घेऊ नये.

दक्षिणा >>>> प्रतीसाद आवडला

पण आपल्याला ज्या व्यक्तीबद्दल प्रेम वाटते ती व्यक्ती आपल्याला नेहमी सुंदरच वाटते, त्यामुळे सौंदर्य म्हणजे अमूक अमूक चार गोष्टी हे सांगणे अतिशय अवघड आहे. हे म्हणजे आभाळाला काडेपेटित बंद करण्याचा प्रयत्न ठरेल.
म्हणतात ना "ब्युटी लाईज इन दी आईज ऑफ बिहोल्डर" ते तसे आहे. दृष्टी तशी सृष्टी. >>>> अगदी अगदी

मलातरी सौंदर्यापेक्षा तुमचे व्यक्तीमत्व कसे आहे ते जास्त म्हत्त्वाचे वाटते.
दिसायला साधारण वाटणारी माणसे सुद्धा छान personality मुळे सुंदर अन आकर्षक दिसतात

बाह्य सौंदर्या बद्दल लोक खूप चिंतित असतात... गोरं म्हणजे सुंदर हा concept त्याचाच एक भाग... गोरं असणं म्हणजे सुंदर, काळ असणं म्हणजे avarage हे नियम कोणीतरी सगळ्यांच्या मनावर बिंबवले आहेत आणि ते अजून चालत आले आहेत....आपली पृथ्वी ज्या ब्रम्हांडात आहे ते ब्रम्हांडच पूर्ण काळ आहे हे ही तितकेच खरे.. पण आपण हे सगळं विसरतो. आणि कुणीतरी बनवलेल्या नियमांनुसार पांढर म्हणजे पवित्र, सुंदर हे असे संकुचित विचार करत बसतो...

अवतारा इंग्रजी सिनेमात सगळेच निळे दाखवले गेले आहेत...त्यांच्या इथे आपल्या ईथले सौंदर्य नियम लागू पडणारच नाहीत... तसच ज्यांना ह्या साचेबंद नियमा नुसार जगा कडे बघायला आवडत त्यांना त्या नियमात बसणारेच सुंदर वाटतात...

फुलांच्या बागेत गेल्यावर आपण असा अट्टाहास नाही धरत की चाफ्या ने सुद्धा गुलाबासारख लालाच असावं... किंवा गुलाबने चाफ्या सारखं सुगंधित असावं...बागेतील सगळीच फुल सुंदर असतात...
तसेच प्रत्येक व्यक्तीचे वेगळी काहीतरी वैशिष्ट असतात ती ओळखून आपण सगळ्यांनाच सुंदर समजलं पाहिजे..अमुक कोणी दीपका पदुकोने or जोन अब्राहम सारखं दिसत नाही म्हणून ती/तो ugly or average आहे असं ठरवणं चुकीचं वाटत...

मागे एकदा आमच्या खूप मोठ्या अधिकाऱ्याने बौद्धिक घेताना सांगितले की माणूस सुंदर नसतो तर त्याचं काम सुंदर असते.
पण मी त्यांचं बोलणं फार मनाला लावून घेतले नाही.

आणि कृपा करून आपण मनोरूग्ण असल्याचे वारंवार उद्धृत करू नका. तुम्ही नॉर्मल आहात हेच माझे इंटेंशन सांगते. कदाचित तुम्ही आळशी असाल व कामे टाळण्यासाठी आजार पुढे करत असाल.

पण स्वतःला सुंदर समजण्यात काय वाईट आहे ?
कोणीतरी म्हटलंच आहे आधी स्वतःवर प्रेम करा.. मग दुसऱ्यावर Happy
हो पण अनावश्यक ऍटिट्यूड अर्थात माज नसावा

आणि दृष्टी सुंदर असली ना तर प्रत्येक गोष्टीत सौन्दर्य आहे
सौन्दर्य काय कोणाची मक्तेदारी नाही

प्रत्येक व्यक्ती सुंदर असते. सौंदर्य बघणा-याच्या डोळ्यात असते. मी एका अमेरिकन वृद्धाला तुम्ही रॉजर मूरसारखे देखणे आहात अशी कॉम्प्लीमेंट दिली, तर ते आजोबा मिस्कीलपणे म्हणाले, तुझे डोळे सुंदर आहेत, त्यांना सगळं जग सुंदर दिसतं.

सुंदर दिसण्यासाठी घरच्या घरी उपाय
https://www.youtube.com/watch?v=oQ7gvzLqqWY

(याच व्हिडीओजच्या आजूबाजूला पाहीलेत तर शंभर वर्षे निरोगी जीवन कसे जगावे, जमिनीखालचे पाणी कसे पहावे, भूत कसे काढावे, मंत्र मारला असता कसा उतरवावावा असेही उपयुक्त व्हिडीओज आढळतील).