कट्टा

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

सकाळी पार्कात नेहमीच्या लोकांची नेहमीचीच क्राऊड होती. पार्काचे चार राउंड मारले नी त्याला धाप लागली. मी जरा इथेच बसतो कट्ट्यावर तू हव तर मार अजुन दोन राउंड्स तो तीला म्हणाला. अरे काय हे तुझा टायर बघ दिवसेंदिवस फुगतच चाललाय -तिने त्याला डिवचुन बघितलं. त्याने कट्ट्यावर हात ठेवुन दोनचार डिप्स मारायचा प्रयत्न केना आणि न जमल्याने शांतपणे कारमधुन ट्रॉपिकानाचा कॅन काढुन ,कट्ट्यावर बुड टेकउन सिप करु लागला. तिने मान हलवली आणि धावायला सुरुवात केली.ती तीचे ठरलेले राउंड्स संपउन आली .
बाजुच्या पेंशनर अड्ड्यावर मोदी ते गांधी , भारताची अर्थव्यवस्था ते अमेरिकेचा सबप्राईम क्रायसीस या विषयांवर चर्चेची भेळ रंगली होती. त्यातला कुणी बाजुच्या देवळात दर्शनाला जाऊन येत होता आणि कुणि १८० च्या कोनात मानावळवीत आजुबाजुला धावणारी सौन्दर्य स्थळांचं दर्शन ही घेत होत.मधुनच कुणी पेपराची हेड्लाईन नाहीतर अग्रलेखातला काही मजकुर वाचुन दाखवत होता. त्यात परत केतकरी विरुद्ध ठाकरी अशा भाषेत उद्बोधक चर्चा झाली.
आत्ता उन्ह चांगलीच वर आली .त्याने कार स्टार्ट केली आणि ती दोघ भुर्कन निघुन गेली. त्यांचा दिवस तर प्लॅन्ड होता. आत्ता बाकिच क्रऊडही विरळ व्हायला लागल होतं पेंशनर अड्ड्यावर्चे एक एक जण कमी व्हायला लागले. कुणाला जाताना पाव कुणाला अंडी तर कुणाला दुध न्यायचे होते. कुणाला जाता जाता सुनेने सांगितल्याप्रमाणे मार्केट मधुन मासे न्यायचे होते. काहीजण मागे रेंगाळले . आत्ता ९ वाजुन गेले होते. घरी जाऊन पोरांची नेहमीची बोलणी खाण्यापेक्षा कोपर्‍यावरच्या इराण्याकडे पानीकम मारणे जास्त बरे म्हणुन तेही उठले.
एव्हाना पार्काचा कट्टा ओस पडला होता. आत पार्कात नेट्स जोरात चालु होत्या आणि त्याना बघणारी काही रीकामटेकडी मंडळी सोडली तर बाकी कुणिच नव्हत. देवळातले पुजारीही आत्ता आरामात पेपर वाचीत बसले होते. पानबिडी कम कोल्ड्रींक स्टॉलवाला पण मोबाईलवर कसले कसले सेटिंग करण्यात मग्न होता. कॉलेजच्या पोरांच्या बाईक्स आणि चार पोरांच टोळकं येउन थांबलं. जॉन अब्राहमचे केस आणि विजयराजची तब्येत , कमरेच्या खाली कधीही निसटुन पडेल अश्या जीन्स असा अवतार.बहुतेक लेक्चर बंक मारुन आले होते. स्टॉलवरुन मोठी गोल्ड्फ्लेक घेऊन एकाने शिलगावली. हवेत धुराच्या रेषा काढत त्याने मोबाईल लावला. मेरीवाली आधे घंटे मे पहुच रही है त्याने सिगरेट दुसर्‍याच्या हातात देत कन्फर्म केले. सिगरेट शेअर करुन झाल्यावर चारीजणानी हॉल्स चघळल्या. तो पर्यंत एक एक करुन त्यांच्या गर्लफ्रेंड आल्या. येकच चित्कार आणि लगेचच बाईक स्टार्ट. बहुतेक आत्ता कोणत्या तरी मॉल मधे जाऊन बोलिंग आणि पिक्चर चा प्रोग्राम होता.
टळटळीत दुपार झाली होती. सरबतवाल्यान्च्या आणि गोळेवाल्यांच्या गाड्यांवर क्रिकेट्खेळणारि पोरं जमा झाली होती.लंच ब्रेक मधे वडापाव ही पोटात जात होते. भारताचे भावी खेळाडु घडत होते. आत्ता तो कट्ट्यावर आला. एकंदरीत अवतारावरुन कोणत्यातरी इंडस्ट्रीअल एरियात हेल्पर असावा. रात्रपाळी संपउन आला होता बहुतेक.सकाळिच मिळणारा संध्याकाळचा पेपर पिशवीतुन काढला. नेहमीच्या ४ भोसकले, ५ लुटले, एका ६० वर्षाच्या बाईने जुळ्याना जन्म दिला अशा बातम्या वाचल्या. महाशब्दकोडे सोडवायला घेतले. त्याला अजुनही कधी ते १००० रुपयांचे जम्बो ईनाम लागले नव्हते. थोड्यावेळाने त्याची माल आली. बहुतेक आजुबाजुच्या घरची वरकाम आत्ताच संपउन आली होती. त्याने तोच संध्याकाळचा पेपर कट्ट्यावर पसरला. दोघंही चिकटुन त्यावर बसले. दुपारच टळटळीत ऊन बहुतेक त्याना चांदण्यात बसल्यासारखे भासत होते. तीला जवळ ओढुन तो म्हणाला- आज रातच्याला शिनेमाला जायाच का? मागच्याच हप्त्यात ओवरटेम भेटलाय. तीची गाडि लगीन कवा करशील यावर अडली. शेवटी रातच्याला गीता टॉकिजला भेटायला ती तयार झाली नी तो चांदण्यात न्हाउन निघाला. तीला आता दुपारची भांडी होती. ती गेली तसा तो ही नीघाला.
संध्याकाळ व्हायला लागली तशी परत कट्टा फुलायला लागला. मुंबै पहायला आलेले पाहुणे, त्याना मुंबै दाखवणारा काका मामा यांची जशी गर्दी होती तशी आता रोजच्या सर्ववयीन मंडळिची गर्दी होती. कॉलेजच्या पोरांचे ग्रुप्स आणि प्रत्येक ग्रुपची आर्थीक परीस्थीती त्यांच्या कपड्या आणि गाड्यांवरुन दिसत होती. फ्रँकी खाणारे आणी भजीपाव खाणारे यात फरक तर असणार्च.आख्की फॅशन स्ट्रीट आणि लिंकींग रोड आत्ता पार्काच्या कट्ट्यावर भरुन वाहत होता. ग्रुप मधल्या काही जोड्या अचानक गायब होत होत्या बहुदा त्याच जोड्या पार्काच्या कुण्या अंधार्‍या खोपच्यात उगवत होत्या. जस जसा अंधार वाढायला लागला तसा कट्य्यावरचा क्राऊड पार्कात सर्कायला लागला. ७ च्या आत घरात कॅटेगरी घरी गेली. उरलेले लुक्खे राम काकाकडे जायचे की कावेरी मावशीकडे या विवंचनेत पडले. राम पंजाब आणी कावेरी हे दोनच बार क्वार्टर सिस्ट्म वाले त्यांमुळे फार चॉईस नव्हता. शेवटी आज मथुरेची वारी करायची ठरऊन ते मथुरा भुवन ला गेले.
आता रात्र बरीच झालि होती. देवळातला देव आणी पुजारी दोघेही झोपले होते. पार्कात पण प्रेमाला ओहटी लागुन शुकशुकाट झाला होता. पोलिसांची येक व्हॅन नुसतीच येक राऊंड मारुन गेली. कट्यावर नाही म्हणायला येक काळ कुत्र बसलं होत. तो आला त्याने कुत्र्याच्या पेकाटात लाथ घातली. कुई कुई करत कुत्र पळाल. त्याने कट्ट्यावर गोणपाट अंथरल. येक बिडि जाळली आणी थोड्या वेळाने समांतर झाला. आता कट्टाही शांत झोपला होता उद्याच्या सकाळची स्वप्न पाहात

विषय: 
प्रकार: 

अजय, शिवाजी पर्कचा कट्टा ना? छानच बांधलाय. मला तरी शिवाजी पार्कच वाटले.

अश्याच प्रकारचा एक लेख संजय मोनेने बर्‍याच वर्षापूर्वी म. टा. ला लिहिला होता.

पुर्वी शितळादेवीला राहायचो त्यामुळे डोळ्यासमोर शिवाजी पार्कच होते. पण असे कट्टे बरेच असतील प्रत्येकाच्या अनुभवातले म्हणुन कट्ट्याला आणि पात्राना नावं नाही दिलि .संजय मोनेच्या लेखाच म्हणशील तर नाही वाचलेला आठवत साम्य असेल तर -Great minds think alike and fools seldom differ

लिहिल आहेस रे.
डोळ्यासमोर अगदी उभा राहिल सगळ.
नेमक आणि तटस्थ वर्णन. Happy

साम्य आहे असे कुठे म्हटले मी? त्यामूळे gr8 minds वगैरे हा हा हा........

मथुरा भुवन चा उल्लेख पाहून शिवाजी पार्कच वाटलं. आणि सगळं बालपण त्याच परीसरात गेल्यामूळे कुठ्ल्याही पार्कचा उल्लेख झाला तरी आपलं शिवाजी पार्क uncomparable वाटतं. नाळ तुटणारच नाही.

ह्म्म- सगळी नाव टाळायची काळजी घेतली लिहताना पण राम पंजाब ,मथुरा भुवनची नाव टाकली. लिहताना लक्षात न्वहतं आल हे . बाकी शिवाजी पार्क म्हणजे अजुनही विक पॉईंट. आता कधी गेलो तर आमच्या जागेवर नवीन पोरं पोरी पाहुन जुन्या आठवणी जाग्या होतात. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

एकदम सही लिहिलय अजय, चित्र एकदम डोळ्यासमोर उभे राहते. शिवाजी पार्क अधून मधूनच पाहिलेला आहे पण असे चित्र इतर ठिकाणीही दिसत असल्याने आपण पाहिलेले असेच इतर प्रसंग आठवतात. मस्त!

फ्रँकी म्हणजे काय ऐकले होते पण विसरलो. बर्गर का? आणि तो रात्री येऊन समांतर झालेला आणि दुपारचा हेल्पर एकच माणूस होता असे वाचून वाटले, ते बरोबर का?

म्हणजे पोळी मध्ये काही तरी घालुन तिचे केलेले रोल.
अन लेका फ्रँकी म्हणजे बर्गर कसा होईल?

सकाळ दुपार, संध्याकाळ कुणी ना कुणी बरोबर (बहुतेक जोडिने) आणि शेवटि एकटा असा आलेख मांडायचा होता. खर म्हणजे हे मी कथेच्या फॉर्म मधे लिहणार होतो पण त्यात नाक्या बरची भाषा भरपूर येत होती जी मायबोलीवर वापरणे अप्रस्तुत वाटले म्हणुन स्फुट्/ललित लिहले- धन्यवाद

शिवाजी पार्क.................

किती सुन्दर कट्टा !!!!!!!!!!!!!!!!
छान लिहले आहे..एकदम डोळ्यासमोर चित्र उभे राहीले...
शब्द रचना खुप छान जमलिये.

Happy
खुप आठ्वणी जाग्या झाल्या....

अगदी चित्रवत वर्णन केलंस, अजय!! सुंदर!!