चित्रपट

एक प्यार का नगमा है: गीतकार संतोष आनंद यांची ह्रदयस्पर्शी कहाणी

Submitted by अतुल. on 23 February, 2021 - 02:18

एक प्यार का नगमा है... माझं अत्यंत आवडतं गाणं. गाण्याला अजोड उंचीवर नेऊन ठेवणारे लतादीदी आणि मुकेशजी. आणि संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल. पण त्याचे गीतकार कोण, सध्या कुठे आहेत. काही माहित नव्हतं. जगाच्या विमृतीत गेलेला हा गीतकार. या व्यतिरिक्त त्यांनी कितीतरी सुंदर गाणी त्या काळात दिलीत. जसे कि:

मेघा रे मेघा रे...
तेरा साथ है जो मुझे क्या कमी है...
मोहब्बत है क्या चीज...

उरण्या ( Uranya) : गालातल्या गालात हसवणारा एक धमाल ग्रीक चित्रपट

Submitted by अजय on 18 February, 2021 - 00:17
 uranya

अमेझॉन प्राईमवर असलेला हा चित्रपट म्हणजे एक धूळीत हरवलेलं रत्न म्हणता येईल.

साल १९६९. ग्रीसमधल्या एका बेटावर राहणार्‍या ५ टीन एजर मुलांची ही कहाणी. या ५ जणांना मोठे व्हायची खूप घाई झाली आहे. म्हणजे कधी एकदा आपला कौमार्यभंग होतो याची. Happy

विषय: 
शब्दखुणा: 

चूकीची उत्तरे द्या

Submitted by म्हाळसा on 17 February, 2021 - 16:37

तो, ‘दृश्यावरून गाणं ओळखा’ असा धागा आहे बघा.. ज्यात आपल्याला दृश्य बघून अचूक गाणं ओळखायचं असतं.. अगदी तसंच..पण इथे दृश्य बघून सगळ्यांना चित्रपटाचं नाव सांगायचं आहे.. तेही फक्त आणि फक्त चूकीचच.. म्हणजे, त्या दृश्याला शोभेल असं, पण भलत्याच चित्रपटाचं नाव द्यायचं आहे..
हो हो..अगदी बिनधास्त चूकीची उत्तरं द्यायची .. कोणीही मार्क्स कापणार नाहीत..

विषय: 

96 तामिळी भाषेतील चित्रपट - व्हेलेनटाइन डे स्पेशल लेख ( सकाळ पेपर्स स्मार्ट सोबती )

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 13 February, 2021 - 23:39

96

न सांगताच तू मला उमगते सारे, तुलाही कळतात मौनातले इशारे ....... सुधीर मोघे

विषय: 

व्हिलेज रॉकस्टार या आसामी भाषेतील चित्रपटाचा रसास्वाद

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 2 February, 2021 - 11:45

व्हिलेज रॉकस्टार

Blessed are the poor in spirit, for theirs is the kingdom of heaven… Jesus Chirst

“व्हिलेज रॉकस्टार” २०१७ सालचा आसामी भाषेतील चित्रपट. (लेखिका, दिग्दर्शक, एडीटर आणि सहनिर्माती रीमा दास ) ६५ व्या national film awards मध्ये बेस्ट फिचर फिल्मचे “स्वर्ण कमल” त्याचप्रमाणे, best child artist, best location sound artist आणि best editing अशा वेगवेगळ्या परितोषका बरोबरच दुसरी सन्मानाची गोष्ट 91ST ACADEMY AWARD मध्ये आपल्या देशातर्फे या चित्रपटाच्या प्रवेशाची अधिकृतपणे निवड करण्यात आली होती.

विषय: 

द ग्रेट इंडिअन किचन

Submitted by मेधावि on 1 February, 2021 - 07:00

गेल्या दहा दिवसांत तीन सिनेमे पाहीले.
1. इज लव्ह इनफ ? "सर"
2. द लास्ट कलर
3. द ग्रेट इंडिअन किचन.

पहिले दोन सिनेमे आवडले ...

तिसरा सिनेमा.. (Neestream -मल्याळी भाषेतला इंग्रजी सबटायटल्सवाला) पाहून मात्र त्रास झाला. एक सण्णसणीत मुस्काटात बसली. हा चित्रपट संपत नाही. तो मानगुटीवर बसतो आणि छळतो. "अगदी फ्रंट ऑफ द माईंड" छळत रहातो. स्वैपाकघर आणि स्वैपाक ह्या विषयातले बारीक सारीक तपशील टिपून त्यावर एका पुरुषानं हा सिनेमा बनवलाय,त्याला साष्टांग प्रणाम.

Spoiler alert - ज्यांना पहिल्या  धारेचा सिनेमा बघायचाय त्यांनी इथून पुढे वाचू नये. पण लवकर बघा...

विषय: 
शब्दखुणा: 

बंगाली भाषेतील पारोमा या चित्रपटावरील लेख

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 14 January, 2021 - 11:53

पारोमा

मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा, स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा?..

पारोमा १९८५ सालचा बंगाली भाषेतील national film award विजेता चित्रपट. या चित्रपटाच्या कथा आणि दिग्दर्शना ( कथा आणि दिग्दर्शन अपर्णा सेन ) इतकीच प्रभावी आहे यातील “पारोमा” या स्त्रीची व्यक्तिरेखा . “पारोमा” हि केवळ एक कर्तव्यदक्ष सून, प्रेमळ आई किंवा आपल्या पतीची साथ देणारी सहचारिणी नाही तर या घरंदाज स्त्रीत असणारे अनेक पैलू उलगडून दाखवणाऱ्या स्त्रीत्वाचे ते मानसिक आंदोलन आहे.

विषय: 

"शकुंतला देवी" चित्रपटाबद्दल...

Submitted by निमिष_सोनार on 23 December, 2020 - 08:36

आज (दि. 14 ऑगस्ट 2020) "शकुंतला देवी" हा अतिशय छान चित्रपट पहिला. गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्ड्स मध्ये शकुंतला देवींची नोंद आहे आणि त्यांना ह्यूमन कॉम्प्युटर म्हणून ओळखले जायचे. (मृत्यू: 2013).

शकुंतला देवींचे कठीण गणिती आकडेमोड सोपे करून सांगणारी आणि सुपर मेमरी संदर्भातली पुस्तके मी लहानपणी वाचली होती पण त्यांचे आयुष्य खूपच वादळी आणि गुंतागुंतीचे होते हे चित्रपट बघितल्यावर कळते.

दुनियावाले व्हेरी बॅड व्हेरी बॅड

Submitted by हरचंद पालव on 22 December, 2020 - 02:53

मला ह्या हिंदी चित्रपटांतील हिरोंचं काही कळतच नाही. एरवी चारचौघांसारखं आयुष्य न जगता हिरोगिरी करत असतात (अमोल पालेकर प्रभृती काही सन्मान्य अपवाद वगळता), तेव्हा 'चार लोक काय म्हणतील' ह्याचा विचार करणं ह्याला ते अजिबात म्हणजे अजिबात तुच्छ लेखतात. पण नंतर त्यांना ते चार लोक आठवतात. बरं, हिरोच्या वागण्यावर काहीतरी शेरेबाजी करण्याचा जन्मसिद्ध अधिकार असलेल्या त्या लोकांना एक सामूहिक नाव आपल्या चित्रपटसृष्टीने दिले आहे, ते म्हणजे 'दुनियावाले'. काही वेळा त्यांना 'जगवाले' असंही म्हणतात. तर हे दुनियावाले किंवा जगवाले जे कुणी असतील, ते कायम आपल्याला जज करत असतात असं जजमेंट हिरो लोक पास करतात.

परिक्षण - Scam 1992: The Harshad Mehta Story

Submitted by भागवत on 13 December, 2020 - 10:06

परीक्षण - Scam 1992: The Harshad Mehta Story

अलीकडच्या काळात वेब सिरिज म्हणजे अतिरंजित कथा, अति भडक मारामारी, आणि अति भडक दृश्ये असे समीकरण बनले होते. पण या सगळ्यांना छेद देणारी नवीन वेब सिरिज म्हणजे SCAM 1992 आली आहे. IMdB या संकेतस्थळा वर ९.५ मानांकन असलेली एकमेव भारतीय वेब सिरिज आहे. त्यामुळे ही सिरिज बघायचीच असे ठरवले.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - चित्रपट