Submitted by rmd on 16 February, 2025 - 23:59
बरेचदा असे होते की एखादा चित्रपट संपल्यावर असे वाटते की याचा शेवट वेगळा असता तर जास्त आवडलं असतं.
उदाहरणार्थ - ' शोले ' चित्रपटाच्या शेवटी अमिताभ मरायला नको होता असं मला वाटतं. किंवा ' ताल ' चित्रपटाच्या शेवटी ऐश्वर्याने कोणाशीच लग्न करायला नको होतं - कितीही असलं तरी अक्षयने तिचा आणि तिच्या वडिलांचा अपमान केलेला असतोच. किंवा मग ' रंग दे बसंती ' च्या शेवटी त्यांना मारून टाकलं असं न दाखवता लोकांनी त्यांना वाचवलं असं काहीतरी दाखवायला हवं होतं.
असे अजून कित्येक पिक्चर असतील ज्यांचा शेवट वेगवेगळ्या प्रकाराने जास्त आवडला असता. तुमच्या मनात आहेत का असे काही वेगळे शेवट?
चला मग लिहा पटापट या धाग्यावर 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान धागा आहे.
छान धागा आहे.
शोले मध्ये अमिताभ मेला त्याचे काही वाटले नाही. पण जया भादुरी सुद्धा मेली असती सोबत तर बरे झाले असते असे तेव्हा वाटायचे. बिचारी पुन्हा फिरून त्याच वळणावर आली..
कभी हा कभी ना मध्ये शेवटी शाहरुखला जूही भेटली ते खूप बरे वाटले.. नाहीतर कित्येक रात्री झोप आल्या नसत्या.. आणि त्यामुळे विश्वास सुद्धा आला की जिच्या खूप प्रेमात आहोत अशी व्यक्ती नाही भेटली आयुष्यात तरी पुढे जाऊन दुसरी कोणीतरी भेटतेच.. त्या वयात हा विश्वास फार गरजेचा होता.
छान आहे धागा.
छान आहे धागा.
टीपी चालेल ना या धाग्यावर?
शोलेच्या वेळी कि नंतर
शोलेच्या वेळी कि नंतर इमर्जन्सी लागू होती. त्या वेळी हिंसा असलेले सीन्स काढून टाकायला सांगायचे असं दोस्ती पिक्चर बद्दल एका युट्यूबरने सांगितले होते. चेक केलं तर खरंच निघालं.
शोलेचे असे झाले असते तर?
गब्बर ला हिंसेचा पश्चात्ताप होतो आणि मग तो आसाराम बापू /ओशो / राम रहिम अशांसारख्या बाबांच्या आश्रमात येतो तिथे जय आणि वीरू हे त्याला अहिंसा शिकवतात. ठाकूर पण तिथेच असतात ते गब्बरला माफ करतात.
ओशोंच्या आश्रमात असेल तर गुरूजी गब्बरला प्रेम करायला शिकवतात असा शेवट असता.
छान आहे हा धागा
छान आहे हा धागा

जया भादुरी सुद्धा मेली असती सोबत तर बरे झाले असते >>>> अर्रे ऋन्मेषा
मला सदमा मधे तिला तिचे पालक कमल बद्दल सगळे सांगतात & ती त्याला धन्यवाद देऊन तिथून निघून जाते असा शेवट आवडला असता. कारण तिने सगळं जाणुन तरी त्याच्या आयुष्यात राहणे ही फार दूर ची गोष्ट झाली..आणि शहाणी झाल्यावरची ती, त्याच्या मनात प्रवेशलेली आधीची ती दोघींत जमीन आस्मान चा फरक असणार होता.
कुछ कुछ होता है
कुछ कुछ होता है
अंजली ने अमनबरोबर लग्न करायला हवं होतं
मला सदमा मधे तिला तिचे पालक
मला सदमा मधे तिला तिचे पालक कमल बद्दल सगळे सांगतात & ती त्याला धन्यवाद देऊन तिथून निघून जाते असा शेवट आवडला असता>>>>
मलाही.. मला सदमाचा शेवट सोडुन बाकी सगळे आवडले होते. आपली तरुण मुलगी इतके दिवस कुठे कशी राहिली, ज्यांनी तिला इतक्या प्रेमाने सांभाळली त्यांना एकदाही भेटावेसे न वाटणारे, येताना त्याच दिवसाचे जायचे तिकिट काढणारे लोक..सगळे डोक्यात जाते. बिचार्या सोमुचे वाईट वाटते.
मला ऊंबरठाचा शेवटही आवडला नाही. ती बाहेरच्या परिस्थितीशी हरुन घरी परतुन यायला नको होती. सामाजिक आयुष्यात असे लोक असणारच. तिला समाजसेवा करायची होती तर तिथेच राहुन किंवा अन्यत्र तिने स्वतःचा मार्ग शोधायला हवा होता. ती घरी परतलेली दाक्गवुन घरच्यांनीही पाठ फिरवली हे अधोरेखित केले गेले. तिची गरज म्हणुन ती घराबाहेर पडली, घरच्यांनी त्यांची गरज इतरत्र भागवली. यात कोणीही चुक किंवा बरोबर नाही.
तिला तिचे पालक कमल बद्दल सगळे
तिला तिचे पालक कमल बद्दल सगळे सांगतात & ती त्याला धन्यवाद देऊन तिथून निघून जाते असा शेवट आवडला असता. >>>>१००_++
अंजली ने अमनबरोबर लग्न करायला हवं होतं
>>>>१००_++. किमान शाहरुखबरोबर तरी करायला नको होतं. प्रचंड स्वार्थी आणि मिसोगायनिस्ट रोल आहे त्याचा.
बहुबेगम आणि भीगी रातमध्ये मीनाकुमारी अशोक कुमारसारख्या सुज्ञ माणसाला सोडून प्रदीपकुमारला का निवडते हा मोठा प्रश्न मला केव्हाचा पडलाय. बहुबेगममध्ये तर अशोककुमारला हवेली जाळून त्यात आत्महत्या करायला लावतात. सो अनफेअर.
संगममध्ये वैजयंतीमाला राज कपूर नी राजेंद्र कुमार या दोघांना गोळ्या घालून जेलमध्ये गेलेली चाललं असतं मला. अगदीच तिला जेलमध्ये घालायचं नव्हतं तर किमान तिने व राजेंद्र कुमारने मिळून राज कपूरचा खून केलाय व पुराव्याअभावी निर्दोष सुटले आहेत असं पण चाललं असतं.
दिल एक मंदिर मध्ये राजेंद्र कुमार ऑपरेशन यशस्वी करून परदेशात निघून जातो हे ही चाललं असतं. तो ओव्हर द टॉप मेलोड्रामा टळला असता.
बाळा गाऊ कशी अंगाईमध्ये आकाच्या हातून बाळ पडण्याऐवजी रेलिंगवरून वाकताना तीच पडली असती तर जास्त आवडलं असतं.
पण ते नाहीतर सासूने डोक्यात काठी हाणल्यावर/किमान बाळ झाल्यावर तिला अक्कल येऊन तिने मूर्खपणा थांबवला, विक्रमलाही तो डॉक्टर असल्याची आठवण येऊन त्याने बायकोसाठी सिरिअस काऊन्सेलिंग केलं व ती बरी झाली हे चाललं असतं.
ऑन अ सिरिअस नोट, डॉक्टर झीवागोमध्ये युरीला लारा किंवा तिच्यासदृश कुणीतरी दिसतं व तिचा पाठलाग करताना हार्ट अटॅक येऊन तो मरतो हे फार अब्रप्ट वाटलं. पुस्तकात तो कसा मरतो ते आठवत नाही.
जिथे जिथे नायिका मेकओव्हर
जिथे जिथे नायिका मेकओव्हर करते आणि मग नायक तिला accept करतो असे आहे तिथे मला ती त्या नायकबरोबर जायला नको आहे.
कुछ कुछ होता है
ये जवानी है दिवानी.
मुंबईचा फौजदार
.
Self respect आहे की नही?
जो माणूस तुमच्या physical appearance किंवा पेहराव ह्यावरून ठरवणार तुम्हाला स्थान द्यायचे की नही तिकडे का जाता?
.
याउलट
सनम 'तेरी कसम (ह्यात ती मरायला नको होती पण )
ये जवानी मधली अदिती जे करते ते
हे चालेल मला
ये जवानी मधली अदिती जे करते
ये जवानी मधली अदिती जे करते ते >> १००+++
छान धागा आहे. आठवेल तसं
छान धागा आहे. आठवेल तसं लिहिते.
ऋन्मेष
दिल चाहता है मधे शेवटी अक्षय खन्नाची जोडी जमवायला/ तशी हिंट द्यायला नको होती. तसं केल्यामुळे टिपिकल होतो शेवट.
किल्लीचा प्रतिसाद वाचून आठवलं, मुंबई-पुणे-मुंबई २ मधे शेवटी त्या दोघांचं जमलेलं दाखवायला नको होतं. मुक्ता बर्वेचे मुद्दे बरोबर होते.
साधना, उंबरठामधे शेवटी ती परत बाहेरच पडते ना. कुठे जाते ते दाखवलं नाहीये. पण घराबाहेर पडते.
कुछ कुछ होता है
कुछ कुछ होता है
अंजली ने अमनबरोबर लग्न करायला हवं होतं
नवीन Submitted by किल्ली on 17 February, 2025 - 11:27>>>> +७८६
मस्तच धागा आहे हा.....
मस्तच धागा आहे हा.....
वाचतोय
आठवेल तस लिहितो....
सुर्यवंशम मध्ये शेवटी मुकेश
सुर्यवंशम मध्ये शेवटी मुकेश ऋशीला देखील खीर बनवून खायला घालायला हवी होती.
शोले मध्ये अमिताभ मेला त्याचे
शोले मध्ये अमिताभ मेला त्याचे काही वाटले नाही. पण जया भादुरी सुद्धा मेली असती सोबत तर बरे झाले असते असे तेव्हा वाटायचे. >> अल्टिमेट
सदमा माझा फेवरेट आहे. त्यात तिला झालेला सदमा बरा होतो पण तिच्या वागण्याने त्याला सदमा होतो आणि असा धक्कादायक शेवट असल्याने आपल्याला सदमा होतो हे जे त्यांनी जुळवून आणलंय ते कितीही त्रासदायक असलं तरी अफलातून आहे. त्याचा गोड शेवट झाला असता तर मला तात्कालिक आवडलाही असता कदाचित पण हा वाईट शेवट जास्त बोचतो आणि चिरकाल लक्षात राहतो. तो आहे तसाच राहू देण्यात त्याचं सदमेपण/सादम्य सामावलेलं आहे.
आणि त्यामुळे विश्वास सुद्धा
आणि त्यामुळे विश्वास सुद्धा आला की जिच्या खूप प्रेमात आहोत अशी व्यक्ती नाही भेटली आयुष्यात तरी पुढे जाऊन दुसरी कोणीतरी भेटतेच.. त्या वयात हा विश्वास फार गरजेचा होता.>>> आणि नाहीच कुणी भेटली तर निदान डॉन बनायचा तरी स्कोप असतो, हा ही विश्वास नक्कीच मिळाला असणार मुव्ही पाहून...नाही?? धन्य...
माझेमन , बरसात की रात मध्ये
माझेमन , बरसात की रात मध्ये मधुबाला आणि भारत भूषण आहेत. बरसात की एक रात मध्ये अमिताभ , राखी , अमजद खान आहेत.
अशोक कुमार , मीनाकुमारी, प्रदीप कुमारचा भीगी रात.
मला जाने भी दो यारोंचा शेवट अगदीच हताश करणारा वाटला. पण तो आणि इथे लिहिलेले सगळे दु:खान्त शेवट तसे होते, त्यामुळे चित्रपटाचा इम्पॅक्ट वाढला.
अशोक कुमार , मीनाकुमारी,
अशोक कुमार , मीनाकुमारी, प्रदीप कुमारचा भीगी रात >>>
ओ हां…मी दोन वेगवेगळ्या रात्रींचं कन्फ्युजन केल. मला भीगी रातच म्हणायचं होतं. करेक्ट करते.
सादम्य >>>
मराठी भाषेला नवा शब्द मिळलेला आहे.
बचना ये हसिनो मधे रणबीर कपूर
बचना ये हसिनो मधे रणबीर कपूर परत दीपिकाकडे आल्यावर तिने त्याला डच्चू दिला पाहिजे होता. आणि मग परत जाऊन बिपाशा बासूशी लग्न करायला पाहिजे होते
कुछ कुछ होता है
कुछ कुछ होता है
अंजली ने अमनबरोबर लग्न करायला हवं होतं
>>>>
पण त्याने कोण सुखी झाले असते?
अ आणि ब यांचे एकमेकांवर प्रेम आहे तर क चे कितीही का प्रेम असेना आणि तो साक्षात देव का असेना लग्न अ आणि ब चेच व्हायला हवे.
आणि शाहरूख काही वाईट दाखवला नाही त्यात. तो काजोलला पुन्हा भेटून तिच्या प्रेमात पडतो तेव्हा त्याला सलमान बद्दल काही माहिती सुद्धा नसते. उलट ती शहाणी मस्त पावसात भिजून नाचते त्या सोबत. मी असतो त्या जागी तर मी सुद्धा गेलो असतो तिच्या लग्नात प्रेम व्यक्त करायला
सदमाचा शेवट आवडलेला. थोडा
सदमाचा शेवट आवडलेला. थोडा मेलोड्रामा कमी चालला असता. पण धन्यवाद देऊन गेले असते तर अगदीच लेट डाऊन झालं असतं. सिनेमा बघून जी किक बसते ती या शेवटाने.
उंबरठा सेम! ती हरून घरी येते आणि परत उंबरठा ओलांडते हे खूप काही सांगून जातं. कमीत कमी संवादातून बरंच काही.
भरत, खरं आहे. हताश करणारे, अपूर्ण, ओपन टू इंटरप्रिटेशन शेवट लक्षात राहतात. ते सुखाने संसार करू लागले वाले किती सिनेमे येतात न जातात. जीवनातही असंच असत ना? ( ऑन सिरियस नोट)
कुछ कुछ होता है
कुछ कुछ होता है
अंजली ने अमनबरोबर लग्न करायला हवं होतं
>>> +१०० . मुलीने केस वाढवले, साडी नेसून ( आणि पदर पाडून ) दाखवली आणि लगेच याला प्रेमाचा साक्षात्कार झाला का? काहीही!
मस्त मस्त शेवट येत आहेत एकेक.
शोले मध्ये अमिताभ मेला त्याचे काही वाटले नाही. पण जया भादुरी सुद्धा मेली असती सोबत तर बरे झाले असते >>> ऋ

मला पण असं वाटलं होतं एकदा, पण ते जया आवडत नाही म्हणून
सादम्य >>> हर्पा
शोले मध्ये अमिताभ मेला त्याचे
शोले मध्ये अमिताभ मेला त्याचे काही वाटले नाही. पण जया भादुरी सुद्धा मेली असती सोबत तर बरे झाले असते असे तेव्हा वाटायचे. >>
यावरून मला माझेमनचा न शिजणारा राजमा आठवला.
हर्पा, सदम्याची चैन रिॲक्शन.
साडी नेसून ( आणि पदर पाडून ) दाखवली आणि लगेच याला प्रेमाचा साक्षात्कार झाला का? काहीही!>>> कुणी पाडला पदर?? अशोक सराफचा एक पिक्चर होता त्यात पदर पाडणाऱ्या पीएला तो आधी स्टेपलर व नंतर फेविकॉल देतो, इतका सभ्य व मर्यादापुरुषोत्तम असतो.
पण त्याने कोण सुखी झाले असते?
पण त्याने कोण सुखी झाले असते?


अ आणि ब यांचे एकमेकांवर प्रेम आहे तर क चे कितीही का प्रेम असेना आणि तो साक्षात देव का असेना लग्न अ आणि ब चेच व्हायला हवे.>>>>
काय नाय असं !
एकतर तिनं भावनेच्या भरात निर्णय घेतला. होतं असं ऐनवेळी.. दगडापेक्षा विट मौ बाकी काय नाय
ल्हान पोरं नाय का काय झालं की भोकाड पसरुन आईबाबाला मध्ये आणतात तद्वत आपल्या ल्हानग्या पोरीला, स्वतःच्या आईला आणि कमी पडलंच तर उरलंसुरलं रीटायर्ड झालेल्या मुख्याध्यापकाला पुढे घालून -सोबत घेऊन तो तिच्या लग्नात (बिना आमंत्रणाचं !?) आला आणि नंतर रडणंगागणं करुन तिला जाळ्यात ओढलं.
इतकी दयनीय अवस्था मी तरी कोणाची बघितली नाहीये. असं कुठं असतं का !
भंपक पिच्चरेय तो. सगळा पिच्चर टीनाच्या आठव्या पत्रावर आधारलेला आहे. आठ वर्षे अंजली लग्नच करणार नाय हे टीनाला मरायच्या आधीच माहिती असतं. मज्जा
आठ का नौ रे ? पोटातले दिवस मोजावे लागतील न्

नै नै हे गणित चुकलंच जरा आता राहू देतो तसंच
>>> मुलीने केस वाढवले, साडी नेसून ( आणि पदर पाडून ) दाखवली आणि लगेच याला प्रेमाचा साक्षात्कार झाला का? काहीही!>>> +1
माझी लेक 'लहान अंजली मोठ्या
माझी लेक 'लहान अंजली मोठ्या अंजलीचे लग्न मोडावे म्हणून देवाला प्रार्थना करतेय ?? किती टॉक्सिक आहे छोटी असूनही' असं म्हणाली होती.
हा आ , किती दिवसांनी दर्शन.
सुखाने संसार करू लागले वाले किती सिनेमे येतात न जातात. जीवनातही असंच असत ना?
तुला सुख बघवत नाही अमित.
>>>
'बचना ऐ हसिनो' मधे रणबीरला सगळ्याच हसिनांनी डच्चू द्यायला हवा होता. राहा म्हणावे त्या घाऱ्या डोळ्यांच्या आगाऊ सल्ले देणाऱ्या सच्चिन नावाच्या मित्रासोबत.
माझेमन, तुझी 'संगम आणि इतर' वाली पोस्ट एकदम 'फटाका' आहे.
हा आ , किती दिवसांनी दर्शन.
हा आ , किती दिवसांनी दर्शन. Happy>>> हम्म ! असतो काहीवेळेस

ह्या ऋन्म्यानं येथे लिहायला भाग पाडलं न्
>>माझी लेक 'लहान अंजली मोठ्या अंजलीचे लग्न मोडावे म्हणून देवाला प्रार्थना करतेय ?? किती टॉक्सिक आहे छोटी असूनही' असं म्हणाली होती. Lol>>> हे भारीये
कबीर सिंग मध्ये शेवटी तिच्या
कबीर सिंग मध्ये शेवटी तिच्या पोटातले मूल आपले नाही ही जाणूनही तो तिच्याशी लग्न करतो व तिच्या मुलीच्या रुपात त्याला आपल्या जीवनाचा पर्पज सापडतो.
ह्या ऋन्म्यानं येथे लिहायला
ह्या ऋन्म्यानं येथे लिहायला भाग पाडलं न् ..>> धन्यवाद
लहान अंजली मोठ्या अंजलीचे लग्न मोडावे म्हणून देवाला प्रार्थना करतेय ?? >>> तिने अंजलीला मनासारखा नवरा मिळू दे म्हणून प्रार्थना केली होती.. शेवटी तेच झाले
जोक्स द अपार्ट, आपल्याकडे विधवा बाईला जी सहानुभूती मिळते ती विधुर पुरुषांना नाही मिळत
हा आ अस्मिता +१११
हा आ
अस्मिता +१११
विधुर पुरुषांना नाही मिळत
विधुर पुरुषांना नाही मिळत
>>>> खरंय, विधुर असूनही जिचा साखरपुडा झालेला आहे तिचे 'रंगिला रे' तो किती भक्तिभावाने बघतो.
विधुर असूनही जिचा साखरपुडा
विधुर असूनही जिचा साखरपुडा झालेला आहे तिचे 'रंगिला रे' तो किती भक्तिभावाने बघतो
>>>>
मला वाटते मी या धाग्यावर रोज चार राऊंड मारले तर आठ धाग्यांचे विषय घेऊन जाईल
Pages