चित्रपट

बदला - सफाईदार रहस्यपट. काही चुका झाल्यात का ? ( स्पॉयलर्स असणार इथे)

Submitted by किरणुद्दीन on 20 March, 2019 - 15:40

अ‍ॅलर्ट : - हा धागा बदला हा सिनेमा पाहीलेल्यांसाठी आहे. ज्यांनी पाहिला नाही त्यांनी कृपया पाहण्याआधी वाचू नये.

सिनेमाच्या कथेबद्दल अर्थातच इथे काही नाही. मात्र सिनेमा कसा वाटला, चुका आहेत कि अचूक रहस्यपट आहे याबद्दल आपण इथेच हितगूज करूयात.

थोडंसं सिनेमाबाबत :
badla.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

इम्तिहान- एक परीक्षा

Submitted by विको on 15 March, 2019 - 11:13

अलीकडे इम्तिहान नावाचं एक सिनेमा बघितला.

या सिनेमात रवीना टंडन, सैफ आली खान, सनी देओल आणि दलीप ताहिल प्रमुख भूमिकेत आहेत.
जोडीला विनोद करण्याच्या प्रयत्नात असरानी आहेत. या चित्रपटातले असरानी असलेले प्रसंग तुम्ही बघितलेत तर .... पहिलं म्हणजे तुमचं अभिनंदन तुमच्याकडे खूप सहनशक्ती आहे आणि दुसरं म्हणजे ते प्रसंग कसे होते ते मला कळवा.
यातील बरेचसे प्रसंग मी पाहू न शकल्याने पुढे ढकलण्यात आले.

विषय: 

हातिम ताई

Submitted by पायस on 14 March, 2019 - 04:12

हातिम ताई हा एक चमत्कारिक चित्रपट आहे. त्यात चमत्कृतिपूर्ण गोष्टी घडतात म्हणून नव्हे तर त्याच्या शैलीस प्रतिकूल अशा वर्षी प्रदर्शित होऊनसुद्धा त्याने बर्‍यापैकी गल्ला जमवला म्हणून (वेगवेगळे सोर्सेस वेगवेगळे आकडे सांगत असले तरी १९९० साली याने किमान १ कोटींचा गल्ला जमवला यावर त्यांचे एकमत दिसते). असा हा विशेष सिनेमा अभ्यासायचा म्हणजे काही पूर्वाभ्यास गरजेचा आहे. तरी यावेळेस सेक्शन्सना सेक्शन ० पूर्वाभ्यास पासून सुरुवात होईल.

०) पूर्वाभ्यास

०.०) हातिम ताई : ओरिजिनल स्लमडॉग मिलिएनेअर

विषय: 
शब्दखुणा: 

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – ३०. उडन खटोला (१९५५)

Submitted by स्वप्ना_राज on 11 March, 2019 - 12:45

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २९. छाया (१९६१)

Submitted by स्वप्ना_राज on 24 February, 2019 - 08:53

आनंदी गोपाळ

Submitted by सान्वी on 18 February, 2019 - 06:22

कालच आनंदी गोपाळ चित्रपट पाहिला, चित्रपटगृह पूर्णपणे भरलेले होते. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून खूप छान वाटले. चित्रपट अतिशय आवडला.
तर आता चित्रपटाविषयी, आनंदीबाई भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे त्यामुळे कथा आपल्याला परिचित आहेच, परंतु त्यांचा डॉक्टर होण्यापर्यंत चा प्रवास हा चित्रपट उलगडून सांगतो.

विषय: 

माऊली - मैलाची वीट

Submitted by किरणुद्दीन on 17 February, 2019 - 09:45

माऊली चित्रपट पाहिला. त्यात एक रहस्य आहे. दोन रितेश देशमुख असतात. एक बुळ्या असतो आणि एक रजनीकांत.
दोघांचं नाव आईने माऊली ठेवलेलं असतं. त्या आईचा नेमका प्रॉब्लेम काय हे मराठी सिनेमाच्या बजेटमधे समजत नाही. पण एकच नाव ठेऊन ती गळ घालती की ,
"बाबांनो , एक दिवस तू साळंत जायचं अन एक दिवस यानं. माझ्यासाठी तुम्ही दोघं असाल पर जगासाठी एकच बनून रहायचं. आपल्याला साळा परवडणार न्हाई दोघाची "

विषय: 
शब्दखुणा: 

राजबिंडा गुंडा- महेश आनंद

Submitted by टोच्या on 12 February, 2019 - 07:57

11mahesh2.jpg... त्याचं नाव काय हे कालपरवापर्यंत कोणाला माहीत नव्हतं. ते माहिती असण्याची आवश्यकताही नव्हती. पण, जेव्हा तो पडद्यावर यायचा तेव्हा अवघा पडदा व्यापून जायचा... अभिनयाने नव्हे... त्याच्या धिप्पाड देहयष्टीने! गौरवर्ण, सरळ नाक, मोठे डोळे आणि मानेवर रुळणारे लांबसडक रेशमी केस...! हे लांबसडक केस त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा भागच बनलेले होते, ते त्याला शोभून दिसायचे, त्याच्या रांगडेपणात भर घालायचे. तो काही मिनिटांसाठीच पडद्यावर दिसायचा पण, जेव्हाही समोर यायचा, कोणीही, कितीही मोठा हिरो असो..

विषय: 
शब्दखुणा: 

स्वागतार्ह प्रयोग - एक लडकी तो देखा तो ऐसा लगा - (Movie Review - Ek Ladki Ko Dekha To Aisa Laga)

Submitted by रसप on 2 February, 2019 - 03:14

मुख्य धारेतला भारतीय चित्रपट हा नेहमीच पलायनवादी राहिला आहे. लोकांना त्यांच्या रोजच्या आयुष्यातून दोन घटिका मनोरंजन मिळावं, हाच त्याचा मुख्य हेतू राहिला आहे. चित्रपट बनवणारे आणि पाहणारे, दोघेही मुख्य धारेतल्या चित्रपटाकडे ह्याच विचाराने पाहात आले आहेत. ह्या मनोरंजनात नाट्याची बाजू सांभाळण्यासाठी सगळ्यात आवडता विषय 'प्रेम' आणि मग त्याच्या जोडीने देशभक्ती, कर्तव्यभावना, कौटुंबिक कलह वगैरे कथानकं असतात.

उरी चित्रपटाच्या निमित्ताने

Submitted by योग on 30 January, 2019 - 11:50

'उरी सर्जिकल स्ट्राईक' हा चित्रपट ईथे लंडन मध्ये पाहण्याचा योग आला. ते देखिल २६ जानेवारीला मित्र परिवारा समवेत. चित्रपट पाहून अर्थातच काही दिवस हँग ओव्हर (भारावलेलेपणा) होताच. चित्रपट आवडलाच पण त्या निमित्ताने अनेक गोष्टी लक्षात आल्या व अनेक प्रश्ण ऊत्तरांची मनात पुन्हा नव्याने गर्दी जमली. चित्रपट मूल्ये, चित्रीकरण, अभिनय, पटकथा ई. सर्व अतीशय ऊत्तम वाटलेच. किंबहुना बॉर्डर, LOC या आधी येऊन गेलेल्या मसालेपटांपेक्षा हा चित्रपट नक्कीच फारच ऊजवा ठरतो. पण चित्रपट परिक्षण, राजकीय संदर्भ, ई.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - चित्रपट