http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=275498&boxid=14158515&pgno=3&u...
काल बर्याच ट्रॅड्च्या शेवटच्या वर्षाचा शेवटचा पेपर होता (इंजिनीयरींग). पेपर झाल्यावर कॉलेजच्या बाहेर जो काही प्रकार बघितला तो अतिशय ओंगळवाणा होता. कॉलेजच्या दारात जनरेटर, डॉल्बी, गुलाल, दारु आणि मुलांचा हिडीस नाच, बेधुंद. कॉलेज एका बर्यापैकी रहदारीच्या रस्त्यावर. बाहेर पडतानाच लक्षात आले कि यातील कोणितरी तर्र झालेला कळत नकळत (थोडक्यात झुलत) रस्त्यावर येणार, आणि जबर्दस्त अपघात होणार.
आज सकाळी कॉलेजवर आलो. एक बातमी समजली. काल संध्याकाळी शेवटच्या वर्षाचा एक मुलगा गेला. मी अक्षरशः सुन्न झालो. काल बाहेर पडताना काय विचार केला आणि काय झाले.
पण जेंव्हा कारण कळाले तेंव्हा दुसरा धक्का बसला.
त्यामुलाचा आदल्या दिवशी उपवास (?) होता म्हणे. काल दुपारी पेपर होता. आदल्या दिवशी रात्रभर अभ्यासासाठी जागरण केले होते. त्या रात्री त्याने बर्याच सिगारेट्स ओढल्या होत्या. (त्याच्या मित्राकडुन मिळालेली माहिती). काल सकाळपासुन जेवण केले नव्हते.
पेपर टाकुन बाहेर आल्या आल्या त्याने कोरी (?) दारु प्यायली. डॉल्बी लावली होती तेथे नाचला, तहान लागली म्हणुन पाणी प्यायला होस्टेल मध्ये आला. पाणी पित असतानाच त्याला चक्कर येवुन पडला आणि तेथेच त्याचा मृत्यु झाला. पोष्टमार्टेम रीपोर्ट मध्ये अतिश्रम आणि आत्यंतिक थकवा असे कारण असल्याचे कळले. 
आता २० २२ वर्षे वय असलेल्या मुलां च्या बाबतीत असे होत असेल तर 'लिमिट ऑफ सेलेब्रेशन (?) खरच विचार करण्याची गरज आहे. मध्यंतरी वाचण्यात आले होते कि मद्यपान , मद्य विक्री साठी २५ वर्षे वयाची अट लागु केली होती.
दुर्दैव असे कि असा काही प्रकार आपल्या पाल्याच्या बाबतीत घडेल असे पालकांना वाटत नाही आणि आपल्या बाबतीत घडेल असे मुलांना.
२५/५/२०१२
.
.
सुन्न करणारी बातमी!
सुन्न करणारी बातमी!
नुसती परिक्षा संपल्याचे
नुसती परिक्षा संपल्याचे निमित्त !
आजकाल न पिणारे, बावळट ठरतात, म्हणून स्वतःला असे सिद्ध करावेच लागते.
दोन दिवसांच्या अनोशा पोटी नाच
दोन दिवसांच्या अनोशा पोटी नाच आणि बेवडा! धन्य आहे!!
-गा.पै.