इस्लामी जगाची चित्रे :

Submitted by अनिल सांबरे on 29 May, 2012 - 06:08

जोगळेकर यांचा अभ्यासपूर्ण माहितीपर ग्रंथ
सुप्रसिद्ध लेखक श्री. ज. द. जोगळेकर यांच्या परिश्रमातून साकारलेले नागपूरच्या नचिकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेले इस्लामी जगाची चित्रे हे पुस्तक म्हणजे सर्व सामान्य वाचक आणि इस्लाम व इस्लामी राजकारणाचे अभ्यासक यांच्यासाठी एक माहितीचा अभ्यासपूर्ण खजिनाच आहे.
भारतीय आणि जगाच्या संदर्भात इस्लाम ची प्रतिमा, स्वरूप आणि आक्रमक राजकारण हे नेहमीच चर्चेचे, कुतुहलाचे आणि संदेहाचे विषय राहिले आहेत. सुमारे 1400 वर्षांपूर्वी अरबस्तानात उदयास आलेल्या या नवीन पंथाच्या आक्रमक, साम्राज्य विस्तारवादी आणि धर्मप्रसारवादी धोरणाचा फटका जगातील अनेक संस्कृतिंना बसला. इराण, स्पेन, इराक, इजिप्त आदी देशांचे इस्लाममुळे सांस्कृतिक, धार्मिक आणि कट्टरवादी राष्ट्रात रूपांतर झाले हा इतिहास आहे. इस्लाममधील जिहाद, काफीर इत्यादी कल्पना भोवती एक गूढतेचे वलय गुंफले गेले आहे. त्यातच अलीकडे बोकाळलेल्या जिहादी दहशतवादाने आणि अमेरीकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याने संपूर्ण जगाचे लक्ष इस्लामने वेधले आहे. अनेक पाश्चात्य लेखक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला इस्लामविषयी आपापली मते मांडू लागली आहेत. या सर्व लेखांतून 21 व्या शतकातील इस्लाम कसा असेल याची कल्पना येते. श्री जोगळेकरांनी यातील काही निवडक लेखांचा परामर्श घेत भारतीय, विशेषत: मराठी वाचकांना एक माहितीचा ठेवा उपलब्ध करून दिला आहे.
इस्लाममध्ये दोन अवधारणांचा मागोवा सापडतो. एक विचारधारा इस्लाम हा शांतीचा, प्रेमाचा, बंधुत्वाचा संदेश देणारा विचार आहे असे मानते तर या उलट इस्लाम म्हणजे परमेश्वराप्रत नेणारा एकमेव मार्ग आहे, त्यामुळे सर्व मानव समाजाला इस्लामच्या पंथात आणणे आवश्यक आहे, असा टोकाचा असहिष्णु विचार करणाऱ्यांनी जगाची विभागणी दारूल इस्लाम आणि दारूल हरब अशा दोन भागात केली आहे आणि दारूल हरब चे रूपांतर दारूल इस्लाममध्ये कसे व किती लवकर करता येईल याचा विचार व त्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न व मार्ग अवलंबिण्यात येतात.
तलवारीच्या जोरावर इस्लामचा प्रचार व प्रसार अनेक देशात झाला हा इतिहास सर्वांना माहिती आहे. एके काळी अरब आणि तुर्की साम्राज्यांचा मोठा दबदबा होता पण नंतर मात्र इस्लामी जगात अनेक राष्ट्रे उदयास आली. राष्ट्रवाद, समाजवाद आणि मार्क्सवादाचा प्रभाव इस्लामवर पडला आणि अलीकडे दहशतवादाच्या विळख्यात इस्लामचे तत्वज्ञान सापडले आहे. 1928 मध्ये मुस्लिम ब्रदरहूड या दहशतवादी संघटनेची स्थापना झाली तेव्हापासून तो सध्याच्या तालीबान आणि अल-कायदापर्यंत हा इस्लामी दहशतवादाचा प्रभाव आणि परिणाम सारे जग भोगते आहे.
लेखकांनी इस्लामची वैचारिक चित्रे, सुधारणावादी चित्रे आणि जगभरातील चित्रे अशा तीन भागात या पुस्तकातील विषयवस्तुचे विभाजन केले आहे. जिहाद चे आकर्षण, इस्लामी नेतृत्वाची अगतिकता, पैगंबराच्या व्यंगचित्रावरून निर्माण झालेला गोंधळ, इस्लामी वैचारिक जगतातील आंतरिक स्फोट अशा अनेक विषयांना स्पर्श केला आहे. डॉ. व्हफा सुलतान या मुस्लिम विदुषी चे विचार या पुस्तकात नोंदविले आहेत ते असे: ङ्कआमचे लोक (मुस्लिम) स्वत:च्या श्रद्धा नि शिकवणूक यांचे ओलिस (केीींरसश) झाले आहेत. ज्ञानामुळे जुनाट विचारातून माझी मुक्ती झाली. चुकीच्या श्रद्धातून मुसलमान लोकांची कोणी तरी मुक्ती केली पाहिजे."
"दि लिगसी ऑफ जिहाद" या पुस्तकाच्या प्रस्तावनेचा संदर्भ देत श्री जोगळेकरांनी इब्न बराक यांचे विचार दिले आहेत ते इस्लामी जिहाद म्हणजे काय यावर चांगलाच प्रकाश टाकणारे आहेत. "मुस्लिम समाजात पवित्र युद्ध (केश्रू थरी) हे धार्मिक कर्तव्य आहे. कारण मुसलमानांचे ते जागतिक मिशन आहे. मन वळवून किंवा सक्तीने सर्वांचे इस्लामीकरण करण्याचे दायित्व त्यांच्यावर आहे. सर्व राष्ट्रांवर प्रभुत्व मिळविण्याचे इस्लामवर दायित्व आहे." आजही अल-अझहर, नगाफ आणि झासटोन या विद्यापीठातील विद्याथर्यांना जिहाद हा गैर मुसलमानांविरूद्धचा कायदेशीर आदेश आहे आणि जगाच्या अंतापर्यंत तो चालू राहील अशीच शिकवण दिली जाते."
इस्लामाबादच्या कायदे आझम विद्यापीठात न्यूक्लीयर फिजीक्सचे प्राध्यापक परवेझ हुडबॉय यांचा "ग्लोबल अजेंडा" त 2006 साली प्रकाशित झालेल्या लेखाचा संदर्भ देत पाकिस्तानात उच्च शिक्षणाची कशी हेळसांड होत आहे याचे विदारक चित्र लेखकांनी उभे केले आहे. इराकमधील ख्रिश्चनांची होणारी ससेहोलपट, बुरख्यावरून युरापीय देशात निर्माण झालेला वाद, लंडनमधील बॉम्बस्फोट आणि अतिरेक्यांचा तेथील तळ, देवबंदच्या शिकवणुकीचे परिणाम ही प्रकरणे मुळापासून वाचण्याची आणि अभ्यासण्याची आहेत. देवबंद हे नाव देवीबन या हिंदु शब्दापासून कसे तयार झाले याचा मागोवा घेत हिंदू संस्कृतिचा हळूहळू मुस्लिम मनावर होणारा प्रभाव कमी करण्यासाठी देवबंदचा कसा उपयोग 18 व्या शतकात शाह वलीउल्लाह याने करून घेतला, सूफी संप्रदाय हिंदुमध्ये लोकप्रिय असल्याने त्याविरूद्ध देवबंदी कसे उभे राहिले याचे वर्णन यात आढळते. "धर्मावरची श्रद्धा उडाल्याने व मुसलमानी समाज हिंदू रितीरिवाज पाळू लागल्याने ब्रिटिशांचे राज्य आले." अशी अनेक उद्‌बोधक वाक्ये ठायी-ठायी या पुस्तकात आढळतात.
श्री जोगळेकर आज 90 च्या घरात आहेत. याही वयात त्यांचा व्यासंग, अभ्यासाची तयारी आणि लेखनाचा उत्साह दांडगा आहे याची जाणीव हे पुस्तक वाचल्यावर होते. लेखकाने हा ग्रंथ पांडित्यपूर्ण नाही, असे विनयाने म्हटले असले तरी त्यांचा या विषयावरील अभ्यास व व्यासंग यातून निश्चितच अभिव्यक्त होतो यात शंकाच नाही. नचिकेत प्रकाशन चे श्री. अनिल सांबरे यांचेही अभिनंदन करणे समयोचित ठरेल कारण एका महत्वपूर्ण विषयावरील अभ्यासपूर्ण पुस्तक त्यांनी मराठी वाचकांना उपलब्ध करून दिले आहे. इस्लामी जगतात काय सुरू आहे, कोणत्या दिशेने वारे वाहत आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
इस्लामी जगाची चित्रे विराग पाचपोर
श्री. ज. द. जोगळेकर
नचिकेत प्रकाशन, नागपूर - 440015
ISBN : 978-93-80232-53-9, मूल्य : रू.220/- फक्त

गुलमोहर: 

मला पण वाचायला आवडेल हे पुस्तक.

या पुस्तकात नक्कीच उल्लेख असेल, पण जगातली दुसरी (कालानुक्रमे) मशीद भारतात, केरळमधे आहे.
तिला जामा मशीद असे नाव आहे. केरळच्या एका राजाने, अरबस्थानात जाऊन, पैगंबरांच्या भाचीशी (किंवा
पुतणीशी) लग्न केले होते. तो राजा परतीच्या प्रवासात दगावला. पण त्याच्या बायकोने आणि सोबत आलेल्या
मुल्लांनी, तिथे या धर्माचा प्रसार केला.

हि मशीद आजही शाबूत आहे, पण तिची बांधणी भारतीय (केरळमधील) घरासारखी आहे. तिथे आजही दिवाबती
होते. तिथे मिनार आणि बांग द्यायची सोय नाही तसेच मक्केकडे तोंड करुन नमाज पढायची पण प्रथा नाही, कारण या प्रथा, पैगंबरांच्या निधनानंतर सुरु झाल्या आणि हि मशीद बांधतेवेळी ते हयात होते.

त्यांचे राहते घर ही जगातली पहिली मशीद तर केरळमधली दुसरी !

श्री जोगळेकर व श्री सांबरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
वांधा हा आहे कि इस्लाममधील सत्प्रवृत्तींचा आतापर्यंत त्यांच्या आणि आपल्या दुर्दैवाने पराभव झालेली उदाहरणेच फार आहेत. त्याची सुरुवात हसन्-हुसेन या पैगंबरसाहेबांच्या नातवांच्या हत्येपासूनच झाली असे कांहींचे म्हणणे आहे. मोहरम हा आनंदाचा सण नसून त्या दोघांच्या हत्येचा शोक मानण्याचा दिवस आहे असे वाचले आहे. शहाजहानच्या गादीचा वारस आणि सुसंस्कृत अशी ज्याची प्रतिमा होती त्याला मारून औरंगजेबच राजा झाला.

आपण तरी काय केले ?

शहाबानोच्या मागे शक्ति उभी करण्याऐवजी तिच्या विरोधातील शक्तिंचे हात घटनादुरुस्ती करून मजबूत केले. तस्लिमा नसरीनला आपण येऊ दिले पण कायम गॅसवर ठेवले. तिची वणवण थांबली की नाही कोण जाणे. हमीद दलवाई या त्यांच्यामधिल अतिशय तडफदार अशा समाजसुधारक देशभक्ताला व त्यांच्यानंतर त्यांचे काम चालू ठेवणार्‍या सय्यदभाईंना का नाही राज्यसभेत नियुक्त केले गेले? तडफदार हमीद दलवाईंचे भाषण ऐकण्याचे भाग्य मला लाभले होते. त्यांची मुस्लीम समाज पोथी निष्ठेमुळे मागास न राहाता प्रगत व्हावा यासाठीची कळकळ, एकूण भारतीय समाजाबद्दल त्यांना असलेले प्रेम व ओघवते वक्तृत्व आजही स्मरणात आहे. त्यांच्या अकाली मृत्युने या भारतीय समाजाची फार मोठी हानी झाली.
नटनट्यांऐवजी सय्यदभाईंना नियुक्त केले असते तर त्यांच्यामागे शक्ति उभी राहिली असती आणि भारतीय समाजाचे पाऊल पुढे पडले नसते काय?

दिनेशदा, उत्तम माहीती! धन्यवाद!! फक्त एक सुचवावंसं वाटतं. त्याकाळी अरबस्थानास सौदी म्हणंत नसंत. Happy
आ.न.,
-गा.पै.

हमीद दलवाई : या दुर्मिळ व्यक्तीमत्वाबद्दल फारस वाचायला मिळालेल नाही. मायबोलीवरील अभ्यासू मंडळींना हमीद दलवाईंवर एखादा लेख लिहीण्याची विनंती आहे.

हमीद दलवाई : या दुर्मिळ व्यक्तीमत्वाबद्दल फारस वाचायला मिळालेल नाही. मायबोलीवरील अभ्यासू मंडळींना हमीद दलवाईंवर एखादा लेख लिहीण्याची विनंती आहे. >>>> अनील अवचटांनी त्यांच्यावर पुस्तक लिहीले आहे. जरुर वाचा.

हमीद दलवाईंबद्दल पुलंनी 'मैत्र'मध्ये लिहिलं आहे. दलवाईंच्या पत्नींचं आत्मचरित्रही सुरेख आहे. 'कृतार्थ मी' का काहीसं नाव आहे. अवचटांचं पुस्तक आहेच.

या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. Happy

//हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
इस्लामी जगाची चित्रे विराग पाचपोर
श्री. ज. द. जोगळेकर
नचिकेत प्रकाशन, नागपूर - 440015
ISBN : 978-93-80232-53-9, मूल्य : रू.220/- फक्त//

अनिल सांबरे भाऊ, आदाब! या पुस्तकाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! इस्लामविरोधी साहित्याचा मी नेहमी मागच घेत असतो आणि त्यातील कटू सत्य स्वीकारत अज्ञानापोटी किंवा आम्हा मुस्लिमांच्या वागणुकीवरून निश्चित केलेल्या मताचे खंडन मी आमच्या मराठी साप्ताहिक शोधन मधून करत असतो. म्हणून हे पुस्तक आणि तुमचा हा लेख माझ्यासाठी एक मेजवानीच ठरत आहे. मुस्लिमेतर बांधवांविषयीच्या गैर्सामाजान्ना जसा कार्पोरेट, उच्चभ्रू आणि मनुवादी मिडीया जबाबदार आहे, तसे मुस्लिम विचारवंत देखील जबाबदार आहेत. त्यांच्या संकुचित वृत्तीमुळे ते प्रादेशिक भाषा शिकत नसल्यामुळे ते प्रादेशिक भाषेत इस्लाम समजाऊन सांगत नाहीत आणि त्यामुळे कार्पोरेट मिडीयाला इस्लाम & मुस्लिमांविषयी अपप्रचाराची संधी मिळते. याविषयी एक वेगळा लेखच लिहावा म्हणतो. पण इथे याचे उत्तर देणे हे माझे धर्म-कर्तव्य ठरते. म्हणून हा प्रतिसाद-प्रपंच!

//अभ्यासपूर्ण माहितीपर ग्रंथ
सुप्रसिद्ध लेखक श्री. ज. द. जोगळेकर यांच्या परिश्रमातून साकारलेले नागपूरच्या नचिकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेले //

जोगळेकरांनी कुराण, अधिकृत हदीस & अधिकृत सिरत (इस्लामविषयी माहितीचे हे तीनच अधिकृत स्त्रोत आहेत.) यांचा अभ्यास करण्याऐवजी त्यांनी तथाकथित इस्लामी विचार्वांतांचीच पुस्तके जास्त वाचलेली दिसते. त्यांचे हे अज्ञान सांबरे भाउञ्च्या लेखातुन्ही झळकत आहे.

//सुमारे 1400 वर्षांपूर्वी अरबस्तानात उदयास आलेल्या या नवीन पंथाच्या आक्रमक, साम्राज्य विस्तारवादी आणि धर्मप्रसारवादी धोरणाचा फटका जगातील अनेक संस्कृतिंना बसला.//
इस्लामची स्थापना १४०० वर्षांपूर्वी झाली हा अनेक तथाकथी विद्वानांचा गैरसमज आहेत, जोगळेकर हे एकटे नाहीत. अनेकांना हि गोष्ट माहीतच नाही कि, प्रेषित मुहम्मद सलम हे इस्लामचे शेवटचे प्रेषित आहेत, पहिले नाही. पहिले प्रेषित आदम आहेत. आदम हे पहिले मनुष्य देखील आहेत. (डार्विनचा सिद्धांत लामार्क & मुतेषण थेअरिने खोडला आहे.) जगात इस्लामचे आतापर्यंत १ लाख २४ हजार प्रेषित आलेले असल्याचे हदीस ग्रंथात सांगितले गेले आहे. भारतातदेखील इस्लामचे प्रेषित येउन गेल्याची चिन्हे हडप्पा मोहन दो जडोच्या उत्खननात सापडली आहेत. (संदर्भ: उर्दू पुस्तक- ''सिंधू घाटी कि तहेजिब पार इस्लाम के अनासीर, ले.- गुलाम-उस-सक्लैन). इस्लामच्या अनेक प्रेषितांच्या इतिहासाविषयी ससंदर्भ एक वेगळाच लेख मी माबोवर पोस्ट करणार आहे, इन्शाअल्लाह!

//यातच अलीकडे बोकाळलेल्या जिहादी दहशतवादाने//
जिहाद & किताल या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जिहाद म्हणजे सत्यासाठी असत्याविरुद्ध (फक्त मुस्लिमेतराच्याच नव्हे) केलेला शेवटपर्यंतचा संघर्ष. तर किताल म्हणजे युद्ध. हे किताल करण्याचा आदेश ईश्वराने कुराणात खालीलप्रमाणे दिला आहे-
''जोपर्यंत आतंक खतम होत नाही तोपर्यंत (आतान्कवाद्यांविरुद्ध) लढा'' - कुराण (२:१९३)
आतंकवादाविरुद्ध लढल्या जाणार्या युद्धाला किताल किंवा त्याविरुद्ध संघर्षाला 'जिहाद' म्हटले आहे. पण आतन्कवादालाच मिडीया जेहाद संबोधतो, कमाल आहे!!

//त्यामुळे सर्व मानव समाजाला इस्लामच्या पंथात आणणे आवश्यक आहे, असा टोकाचा असहिष्णु विचार करणाऱ्यांनी जगाची विभागणी दारूल इस्लाम आणि दारूल हरब अशा दोन भागात केली आहे आणि दारूल हरब चे रूपांतर दारूल इस्लाममध्ये कसे व किती लवकर करता येईल याचा विचार व त्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न व मार्ग अवलंबिण्यात येतात.//
दार=गृह, उल= चा,ची,चे (of सारखा उपयोग)
इस्लाम=शांती. आता दार-उल-इस्लामचा अर्थ शांती-गृह असा होतो, हे समजलेच असेल. हरब = अशांती. म्हणजे कुणी अशांतीचे गृह बनलेल्या जगाला शांती गृह करू पाहत असेल तर काय हरकत आहे. आपण सर्वांनी या चळवळीत सहभागी व्हायला हवे.

//तलवारीच्या जोरावर इस्लामचा प्रचार व प्रसार अनेक देशात झाला हा इतिहास सर्वांना माहिती आहे.//
इस्लामच काय, तर कोणत्याच धर्माचा प्रचार तलवारीच्या जोरावर होऊ शकत नाही. पण एखादी व्यवस्था कायम करायची असेल तर मात्र तलवार लागते. उदा.- लोकशाही व्यवस्था जरी कायम करायची असेल तरीदेखील सैन्य, पोलिस, सुरक्षा दल वगैरे लागतातच. निवडणुका सुखरूप व्हाव्यात म्हणूनदेखील पोलिस लागतात. आता पोलिस किंवा सैन्याकडे तलवार (हत्यारे) नसली तर लोकशाही टिकू शकेल का? इस्लाम हा फक्त धर्म नसून ती के परिपूर्ण व्यवस्था आहे. जीवनाच्या राजकारणासारख्या क्षेत्राविशायीदेखील त्यात मार्गदर्शन आहे. म्हणून इस्लाम एक धर्म म्हणून जरी शांतीच्या मार्गाने प्रचार केला जाऊ शकत असेल, तरी एक व्यवस्था म्हणून ती कायम करण्यासाठी तलवार किंवा 'सुदर्शन चक्र' लागतेच, हे कटू सत्य आहे.
//राष्ट्रवाद, समाजवाद आणि मार्क्सवादाचा प्रभाव इस्लामवर पडला आणि अलीकडे दहशतवादाच्या विळख्यात इस्लामचे तत्वज्ञान सापडले आहे.//
इस्लामवर नव्हे तर मुस्लिमान्वे मात्र माओवादाचा प्रभाव पडून ते नक्षलवादी झाले ( कार्पोरेट मिदियानुसार ते आदिवासी असले तर नक्षलवादी & मुस्लिम असले तर दहशतवादी).
//1928 मध्ये मुस्लिम ब्रदरहूड या दहशतवादी संघटनेची स्थापना झाली//
मुस्लिम ब्रदरहूड हि जर खरच दहशतवादी असेल तर त्याचा म्होरक्या (इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष) नुकतेच भारत दौरा करून गेले आणि आपल्या सरकारने त्या तथाकथी दहशतवाद्याचे शाही स्वागत कसे काय केले? अमेरिकेचे अध्यक्ष ओबामांनी देखील त्या तथाकथी दहशतवाद्याला निवडणूक जिंकल्यावर शुभेच्छा दिल्या!!! व्यवस्थेविरुद्ध जे कुणी असेल त्याला आज दहशतवादी ठरवले जात आहे, रशियाविरुद्ध लढतांना बीबीसी ज्यांना मुजाहिदीन (योद्धे) म्हणत होता, आज त्यांनाच तो अतिरेकी संबोधतो.
// हा इस्लामी दहशतवादाचा प्रभाव //
काही ब्राह्मण अतिरेक्याचे नाव समोर आल्यापासून 'इस्लामी दहशतवाद' हा शब्द सहसा वापरला जात नाहीये. कारण काही लोक 'ब्राह्मणी दहशतवाद', 'जान्व्यांध दहशतवाद' असले शब्द वापरायला लागले कि मग 'दहशतवादाचा कोणताही धर्म नसतो' असा काही जणांना अचानक साक्षात्कार झाला आहे.
//चुकीच्या श्रद्धातून मुसलमान लोकांची कोणी तरी मुक्ती केली पाहिजे."//
त्या चुकीच्या श्रद्धा नेमक्या कोणत्या आहेत? कशा चुकीच्या आहेत, हे मात्र कुणी सांगत नाही. सगळे काही सांगी-वान्गीवरच चालू आहे.
//मुस्लिम समाजात पवित्र युद्ध (केश्रू थरी) हे धार्मिक कर्तव्य आहे. कारण मुसलमानांचे ते जागतिक मिशन आहे. मन वळवून किंवा सक्तीने सर्वांचे इस्लामीकरण करण्याचे दायित्व त्यांच्यावर आहे.//
पवित्र युद्ध हा शब्द 'होळी वार' या कृसेडी अतिरेक्यांनी सर्वप्रथम वापरल्याचे कदाचित जोगालेकारान्ना माहित नसेल.

//जिहाद हा गैर मुसलमानांविरूद्धचा कायदेशीर आदेश आहे आणि जगाच्या अंतापर्यंत तो चालू राहील अशीच शिकवण दिली जाते.//
यजिद या मुसलमान राजाविरुद्ध देखील इमाम हुसैन यांनी मुहर्रम महिन्यात करबला येथे जेहाद केलेला आहे. म्हणून जेहाद हा ''विनाशाय च दुष्कृताम् । '' असतो, 'विनाशाय हिंदुताम' नसतो.
//बुरख्यावरून युरापीय देशात निर्माण झालेला वाद//
हा वाद नेमका काय होता, हे मात्र लेखकांनी सांगितलेच नसेल. सबिना नावाच्या मुलीने मला बुरखा नेसू द्या, म्हणून केस दाखल केली होती. हि केस तिने जिंकून बुरखा नेसला होता, हे विशेष!
//देवबंदच्या शिकवणुकीचे परिणाम//
मिठाचा सत्याग्रहदेखील देवबंदच्या फतव्याचा होता, हे विशेष. देवबंदचे अनेक उलेमा देशासाठी शहीद झाले म्हणून मागे एकदा चक्क संघानेच त्यांना श्रद्धांजली दिली होती. '१८५७ चा जेहाद' हे प्रा. शेषराव मोरे यांच्यां पुस्तकाचे शीर्षकाच सगळे सांगून जाते.
//श्री जोगळेकर आज 90 च्या घरात आहेत.//
पंतांचे वय झाले आता, असेच आता म्हणावे लागेल.
//इस्लामी जगतात काय सुरू आहे, कोणत्या दिशेने वारे वाहत आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचलेच पाहिजे.//
हे जाणून घ्यायचे असेल तर ट्युनिशिया & इजिप्तमध्ये झालेली क्रांती अभ्यासली पाहिजे.

नौशाद उस्मान ,तुम्ही नक्की काय करता माहीत नाही ,पण जोगळेकरांसारख्या अभ्यासू व्यक्तीने प्रयत्नपूर्वक एखादे पुस्तक लिहून इस्लाम संबंधी सत्य स्थिति दाखवण्याचा प्रयत्न केला ,तर तुम्ही तुमचे नेहमीचे तुणतुणे वाजवायला सुरवात केलीत! काय बोलावे तेच समजत नाही ! दुसर्‍याचे ऐकूनच घ्यायचे नाही, ज्ञानाची कवाडे बंद करून नुसता धर्म धर्म करीत बसायच काय?

चुका आणि आप-प्रवृत्ती सर्वच धर्मात आहेत. हिंदू धर्मातील चुकीच्या प्रथा, अंधश्रद्धा आणि अपप्रवृत्ती यांबाबत मायबोलीवर सातत्याने चर्चा होतच असतात ,त्यात कोणी अशी हटवादी भूमिका घेत नाही. त्यातच ती इस्लामवारील लेखमालिका सुरू करून तुम्हीच तुमच्या जुनाट बुरसटलेल्या अंधश्रद्धा आणि अपसमजा बद्दल बोलायला लोकांना भाग पडलेत , आणि आता वर कोणी सत्य सांगत असेल तर तिथेही तुमचं नेहमीचाच राग आळवताय ?

धन्य आहे !

आवरा !!!!!!!!!!!!!!!!!!!!

मी हा धागा कधीच उघडलेला नाही. तरी पण मला १६ पैकी ३ प्रतिसाद नवे दिसत आहेत. हे कसं काय ?
(नौशाद उस्मान आपण मुस्लीम असावेत असं नावावरून वाटतं. पण आपले बरेचसे लिखाण आ बैल मुझे मार अशा पद्धतीने केल्यासारखं वाटतं. तसा काही हेतू नसल्यास क्षमा असावी )

तसे सगळेच धर्म शांति, दया, क्षमा, अहिंसा इ. शिकवतात. इस्लाम नसताना सुद्धा हिंदू, बौद्ध, जैन धर्मीय लोकांनी भारतात सुवर्ण युग निर्माण केले - एव्हढे की जगातल्या सगळ्या लोकांना भारतात यावेसे वाटू लागले. पण इस्लाम व ख्रिश्चन धर्मीयांची समजूत की त्यांचाच धर्म चांगला, नि सगळे त्यांच्या धर्माचे झाले नाहीत तर त्यांचे कसे होणार? म्हणून मग जमल्यास शांतीने, नच जमल्यास शस्त्रात्रे वापरून सर्वांना इस्लाम किंवा ख्रिश्चन केले पाहिजे - त्यांच्याच भल्यासाठी!

वैदिक धर्मीयांना तसे कधीच वाटले नाही - कारण एक सद्विप्रा बहुधा वदंति! कुणि कुठल्या मार्गाने चिरंतन सुख, स्वर्ग मिळवावा हे ज्याचे त्याने ठरवावे. म्हणून हजाराहून अधिक वर्षे कुणाचे धर्मांतर काही विधी करून केल्याचे उदाहरण नाही.

पुढे लोकांचे धर्मांबद्दलचे अज्ञान इतके वाढले की सुंता करून मटण खाल्ले की तो मुस्लिम. त्याला मुस्लिम धर्माबद्दल दगड धोंडे माहित नाही! कारण आधी हिंदू धर्माबद्दल पण काहीच माहित नव्हते! नुसते आपले वरवरचे काहीतरी केले म्हणजे त्या धर्माबद्दल, त्यातल्या तत्वांबद्दल ज्ञान झाले का? तसे ज्ञान झाले तर शेवटी सगळेच धर्म शांति, दया, क्षमा, अहिंसा इ. शिकवतात हे लक्षा येते, नि मग धर्म कुठला का असेना, माणूस ती उच्च तत्वे पाळतो की त्यांचे उल्लंघन करतो एव्हढाच प्रश्न.

हुड Rofl

झक्की हिन्दूतले मुसलमान आहेत >>> लिम्बूला अ‍ॅलर्ट केले पाहिजे. तो त्यांना त्याच्याप्रमाणेच सुपरहिंदू समजून नाही नाही ते शेअर करतो Happy

तो त्यांना त्याच्याप्रमाणेच सुपरहिंदू समजून नाही नाही ते शेअर करतो
आता आपण नाही का हूडाला माणूस समजून काही काही शेअर करतो?