माझ्या काकूंनी बनवलेलं साखरेच रुखवत...

Submitted by अर्चना पुराणिक on 14 April, 2013 - 16:00

माझ्या काकूंनी बनवलेलं साखरेच रुखवत Happy
ताट,लिंबाची फोड,मेतकुट,लोणचे,भरल्या वांग्याची भाजी,साखर भाताची मुद,साध्या भाताची मुद,बासुंदी,श्रीखंड,जिलेबी,करंजी,बेसनाचा लाडु,रव्याचा लाडु आणि बरंच काही गौरी हार,तांब्या-पेला,आरतीचे तबक,नारळ,तुळशीवृंदावन,महादेवाची पिंड,समई,विडे,विड्यांचे तबक,करंज्या,पूर्ण ताट आणि बडीसोप सुपारिच पान..आहे का छान?

करंज्या व तांब्या-पेला...
625458_341578619264616_135608763_n.jpg
गौरी हार..
427384_341579815931163_901548788_n.jpg
पूर्ण ताट..
603476_341580909264387_1719518152_n.jpg
विडे,विड्यांचे तबक...
297380_341581875930957_2076302929_n.jpg
साखरेच रुखवत...
479787_341584642597347_1313413535_n.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव

मस्त!!! Happy

काकूंना नक्की सांग छान झाल्यात वस्तु म्हणून Happy

पण ती साखर कशी चिकटवली आहे?? आय मिन काय टेक्निक वापरलय ते ही विचारशिल का ???

सुंदर दिसताहेत सगळ्या वस्तु.
करंज्या मात्र 'तळायच्या राहिल्यात अजुन' अशा वाटताहेत!

नंतर एव्हढ्या साखरेचे काय करतात? खाण्यात वापरता येते का? हे प्रश्न मला लहानपणापासुन साखरेचे रुखवत बघितले की पडायचा. आज विचारुन टाकला!

नंतर एव्हढ्या साखरेचे काय करतात? खाण्यात वापरता येते का? >> हो. Happy

मस्त झालंय हे रूखवत. नक्की कशाप्रकारे केलं आहे ते सांगू शकाल का?

अ‍ॅडमिन, गुलमोहर्-इतर कला मधे लोकर, क्रोशाविणकाम, रूखवत, सजावट असे विभाग करता येतील का?

सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद Happy लाजो-साखरेला फक्त पाण्याचा ओला हाथ लावला आहे. समज आता ताट बनवायचे असेल तर पहिल्यांदा ताट पालथे ठेवायचे आणि ती ओलसर साखर त्यावर थापायची. नंतर कडक उन्हात त्याला ठेवायचं.वरची बाजु वाळली की ताट व साखरेच ताट जाड सुईने वेगळं करुन घ्यायचं.परत ते उन्हात नीट कडक वळवायच.(दोन्ही बाजुने) Happy
वत्सला-हो ही साखर नेहमिप्रमाणे चहात व इतर पदार्थात वापरता येते.
गावी माझ्या काकु हे रुखवत बनवून देतात.

ओ, असं आहे होय Happy धन्स अर्चना Happy

इकडे भारतातल्या सारखी जाड साखर नाही मिळत पण आहे त्या साखरेचा वापर करुन प्रयोग करुन बघेन Happy

तांब्या गडूचा साचा असतो. थापून होणार नाही. उभा २ भागात कापलेला अ‍ॅल्युमिनियमचा तांब्या आहे आमच्याकडे.

वा छान वाटलं साखरेचे रुखवत बघुन. मी लहान होतो तेव्हा हा प्रकार अगदी जवळून बघितला आहे. माझी आई असे बनवायची. साखरेचा तांब्या बनवण्यासाठी लागणारा "अर्ध्यात कापलेला" अ‍ॅल्यूमिनीअम चा तांब्या होता. तो दोरीने बांधुन त्यात ओलसर साखर भरायचो, मग मधला भाग कोरून काढत असू, आणि वाळल्यावर वरचा तांब्या अलगद वेगळा करायचा. मग खाण्याच्या रंगाने त्यावर नाजूक नक्षी काढायची..थोडी पिठी वापरून वरण-भात, बटाट्याची भाजी, कोशिंबीर,चटणी, जिलेबी, गुलाबजामून, अन बरंच काही...
कधी कधी बनवतांना काही तूटले, विशेषता ताट, तांब्या तर वाईट वाटायचे (मोठ्यांना Happy ) कारण त्या साखरेचा रुखवतासाठी परत वापर होत नसे. (मिक्सर अभावी पिठी करता येत नसे) आम्हाला मात्र त्याचे तूकडे खायला मिळायचे म्हणुन खूष!