गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील बहुतेक शहरांत वाहतुकीचा बोजवारा उडालेला आहे. बेशिस्त वाहनचालकांनी ‘वाहतूक कशी नसावी’ याचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. त्यातून मला वाहतुकीसंबंधी काही शब्दांचा अर्थ नव्याने उमगला आहे. अशा शब्दांच्या व्याख्या तुमच्यासमोर ठेवतो. आपणही त्यात भर घालावी अशी विनंती !
१. सिग्नलचा चौक: वाहनचालकांनी वाहतुकीचे प्राथमिक नियम चढाओढीत मोडण्याचे ठिकाण.
२. पदपथ : मुळात पादचाऱ्यांसाठी असलेली परंतु, विक्रेत्यांनी कायमस्वरूपी बळकावलेली बिनभाड्याची जागा.
प्रमाणाबाहेर वाढलेली लोकसंख्या, स्वयंचलित वाहनांचा अनिर्बंध वापर, अरुंद रस्ते आणि बरेचदा बंद पडलेली सिग्नल यंत्रणादि कारणांमुळे बऱ्याच शहरांत वाहतुकीची कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. वाहतुकीचे प्राथमिक नियम मोडण्याच्या भारतीय नागरिकांच्या प्रवृत्तीमुळे वाहतूक कमालीची बेशिस्त झाली आहे. अशा कोलमडलेल्या वाहतुकीची अजून वाट लावतात त्या निरनिराळ्या मिरवणुका.
नमस्कार!!
आपण जाणार आहोत एका छोट्या सहलीला. सहल छोटी, माहिती मोठी!!
सहल टप्पा: 'कुठूनही' ते हिंजवडी फेज १
लागणारा वेळः हा एका शब्दात उत्तर देण्याचा प्रश्न नाहीय. या प्रश्नाचं उत्तर मिळण्या साठी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: कोणत्या वारी निघणार?कोणत्या ठिकाणाहून निघणार?कोणत्या वेळी निघणार?कोणत्या वाहनाने निघणार?'कोण' निघणार? त्याप्रमाणे उत्तर २० मिनीटे/४५ मिनीटे/१ तास/१.५ तास असे बदलू शकते.
तुम्ही कार ने किंवा दुचाकी ने येत असाल तर हे कॅलेंडर लक्षात ठेवा:
तारीख १ ते २५:
दिनांक १०.०१.२०१३ रोजी मी पुण्याहून अहमदनगर, औरंगाबाद, वेरूळ मार्गे धुळे येथे येत होतो. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कन्नड घाट ओलांडून पुढे आल्यावर पोलिसांच्या तपासणी पथकाने माझे वाहन (मारूती ओम्नी एम एच १४ बीएक्स ६२८७) थांबविले. माझा वाहन चालविण्याचा परवाना मूळ स्वरुपात आणि वाहनाच्या दस्तऐवजांच्या प्रती छायांकित स्वरुपात तपासल्यावर तपासणी पोलिसाने मला वाहनाची नोंदणी कागदपत्रे मूळ स्वरूपात नसल्याबद्दल दंड भरावा लागेल असे सूचित केले. त्यावर मी खासगी वाहनाची नोंदणी कागदपत्रे मूळ स्वरूपात बाळगण्याची गरज नसून छायांकित प्रती चालतात हे त्यास सांगितले.