जगावेगळा प्रश्न
आज ऑफिस ला जाताना गाडी मध्ये रेडीओ चालू होता. रेडीओवर संभाषणाचा विषय होता Mothers Day. या उठसुठ days मध्ये मला खरेखुरे भावलेलं days म्हणजे Mothers Day अथवा मातृदिन आणि Fathers day पितृदिन. खरोखरच आपण इतके ऋणी असतो आपल्या आई वडिलांच्या तरीही मातृदिन आणि पितृदिन हे आपण कधीच पाळत नाही किंवा आपल्याला त्याचे काही विशेष हि वाटत नाही. कधी कधी आपण हे पाश्चिमात्य खूळ म्हणून दुर्लक्षहि करत असतो. अर्थात हा काही या लेखाचा हेतू नाही परंतु प्रामाणिक इछा मात्र जरूर आहे कि प्रत्येकांनी वर्षातून एखादा दिवस तरी पूर्णपणे आपल्या आई वडिलांसाठी काढून जरूर साजरा करावा.
नेहमीप्रमाणे रेडीओ ऐकणारे फोन करून संभाषणात भाग घेत असतात त्याप्रमाणे एका माणसाचा त्यादिवशी फोन आलेला होता. तो एका मोठ्या धर्मसंकटात पडल्या सारखा वाटत होता आणि त्याला इतर ऐकणाऱ्या लोकांचा अथवा जी लोक अशा धर्म संकटात पूर्वी कधी अडकली असतील त्यांचा सल्ला हवा होता. त्याला पडलेले धर्म संकट असे होते कि त्याची पत्नीला ३ रा महिना चालू होता आणि तिची अशी इच्छा होती कि त्याने हा मातृदिन तिच्या साठी साजरा करावा. त्याच्या म्हणण्या नुसार ती अजून आई झाली नसल्यामुळे तो हा दिवस त्याच्या आई साठी साजरा करावयाचा विचार करत होता. या विषयामुळे त्याच्या घरात द्वंव युद्ध चालू होण्याची शक्यता होती. त्याच्या पत्नीची मात्र अत्यंत इच्छा होती कि तो दिवस त्याने त्याच्या आईपेक्षा तिच्यासाठी साजरा करावा. रेडीओ वरील स्त्री निवेदकानुसार, त्याच्या पत्नीचे म्हणणे योग्य असून त्याने तो दिवस तिच्यासाठी साजरा करावा. पण पुरुष निवेदकानुसार, त्याने तो दिवस आपल्या आईसाठी राखून ठेवावा. थोडयाच वेळात फोन आणि tweeter द्वारे बरयाच लोकांनी आपापल्या मतांचा भडीमार त्या रेडीओ स्टेशन वर केला. काहींच्या म्हणण्यानुसार त्याने हा दिवस आईसाठी ठेवावा असे सुचवले तर काहींनी पुढचे आयुष्य हे पत्नी बरोबर घालवायचे असल्याने तिच्या साठी ठेवावा असे सुचवले. बरयाच जणांनी असे सुचवले कि तू जर हा दिवस पत्नी साठी साजरा नाही केलास तर आयुष्यभर तुला ते ऐकावे लागेल.
या संभाषणातून पडलेले काही प्रश्न
१. ३ महिन्याच्या बाळंतीण महिलेला आई समजावे काय? आणि ती या दिनासाठी आई म्हणून पात्र समजावे का?
२. त्याने तो दिवस आपल्या आईसाठी न साजरा करता न साजरा करता तिच्या साठी करावा हा तिचा अट्टाहास योग्य आहे का.
३. असे खाजगी प्रश्न रेडिओ संभाषणात विचारून योग्य उत्तराची अपेक्षा करावी काय? अर्थात त्याने त्याचे नाव गुप्त ठेवावे अशी विनंती संभाषणाच्या सुरवातीलाच केली होती.
४. यातून काही सुवर्णमध्य साधता येईल का?
माझ्या मते हा प्रश्न आणि जगाला भेडसावणारे अनेक प्रश्न हे एकाच पातळीवरचे आहेत. जसे जगाचे प्रश्न जागतिक शांतता धोक्यात आणू शकतात त्याप्रमाणे हा प्रश्न कौटुंबिक शांतता धोक्यात आणू शकतो. माझ्या मते इथे कोणीच योग्य वा अयोग्य नाही परंतु प्रत्येकजण आपल्यापरीने योग्य आहेत. अर्थात त्याच्या आईची बाजू काही कळली नाही परंतु पर्त्येक आई प्रमाणे ती त्याला योग्य सल्लाच देईल हा भरवसा वाटतो.
आपल्याला काय वाटते ते जरूर कळवा.
त्याने तो दिवस दोघींबरोबर
त्याने तो दिवस दोघींबरोबर साजरा करावा.
१. स्वतःच्या आईसाठी: त्याच्या आईने त्याला जन्म देउन, पालन-पोषण करुन, योग्य ते शिक्षण घेण्यास आवश्यक ती मदत करुन, वेळप्रसंगी चांगल्या-वाईटातल्या फरक स्पष्ट करुन, थोडक्यात आपल्या मुलांसाठी एक आई जे जे करते ते सर्व करुन त्याला मोठ केल आहे. आई-वडीलांच्या ऋणातुन मुक्त होण आपल्याला कधीच शक्य नाही परंतु अशा दिवशी त्यांनी आपल्यासाठी केलेल्या गोष्टींची आपल्याला जाणीव आहे एवढ जरी त्यांना समजल तरी त्यांच्या थकल्या जीवाला आराम मिळतो कारण आई-वडील आपल्या मुलांकडुन याव्यतिरीक्त काही अपेक्षाच ठेवत नसतात.
२. ३ महीन्यांच्या गरोदर पत्नीसाठीही त्याने हा दिवस साजरा करावा कारण त्याची त्याला वाढवताना ज्या ज्या प्रसंगाना सामोरी गेली आहे अगदी प्रेग्नंसीपासुन ते आत्तापर्यंत त्या सगळ्याच प्रसंगातुन थोड्याफार फरकाने त्याची पत्नीही जाणार आहे. त्यामुळे या सगळ्या प्रसंगांमध्ये मी तुझी साथ सोडणार नाही असा विश्वास आई होउ घातलेल्या पत्नीच्या मनात निर्माण होण आवश्यक आहे.
फक्त हे करत असताना दोघींपैकी एकीच्याही मनात तुलनात्मक विचार येउ नयेत याबद्दल योग्य ती काळजी घेण गरजेच आहे. अर्थात हे सर्व माझ वैयक्तीक मत आहे, त्याच्याशी कोणी सहमत असेल अथवा नसेल.