कामगार दिन असताना मातृदिनाची गरज आहे का ?

Submitted by कटप्पा on 10 May, 2020 - 21:18

गुड मॉर्निंग मायबोली . कालच मातृदिन साजरा झाला .
कुठेतरी ऐकले कि - एक आठवडा आधीच कामगार दिन साजरा केला असताना वेगळ्या मातृदिनाची गरज आहे का?
मायबोलीकरांना काय वाटते?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई म्हणजे कामगार अशी सामाजिक धारणा आहे, असं म्हणणं असेल तर कामगारदिनाच्या दिवशी मातृदिन नक्कीच पाळावा.
शिवाय दोन्ही सेट्स आयडेंटिकल असतील तरच ते ओवरलॅप होऊ शकतील. आणि then the holiday will represent only those who are mothers as well as workers. Then the day can be renamed as working mother's day.

एका मायबोलीकराला म्हणजे मलाच वाटतंय की कटप्पाला भरपूर रिकामपण आहे आणि त्याने रिकाम्या वेळात असे धागे काढण्याऐवजी घरातल्या त्याच्या स्वतःच्या किंवा स्वतःच्या मुलांच्या आईला कामात मदत करायला हवी.

एक आठवडा आधीच कामगार दिन साजरा केला असताना वेगळ्या मातृदिनाची गरज आहे का?
>>> अनफॉर्च्युनेट आहे पण वस्तुस्थिती आहे.... आई राब राब राबते... भारतात लोकांना जाणीव नसते... हार्डली कोणी मदत करायला पूढे येतो.... अशी देखील घरे पाहिली आहेत जिथे बाप , मुले जेवण झाल्यावर ताट तिथेच ठेवतात आणि आई उचलते...
आईसाठी खायला काही उरलय का याचा विचार करायची देखील तसदी घेत नाहीत... आवडला एखादा पदार्थ तर खात जा... संपवून टाका... अशी मेन्टॅलिटी असते...

कटप्पा तुम्ही सटायर लिहिलंय हे दिसत आहे पण थोडे अधिक फुलवायचे होते...

एका मायबोलीकराला म्हणजे मलाच वाटतंय की कटप्पाला भरपूर रिकामपण आहे आणि त्याने रिकाम्या वेळात असे धागे काढण्याऐवजी घरातल्या त्याच्या स्वतःच्या किंवा स्वतःच्या मुलांच्या आईला कामात मदत करायला हवी.

Submitted by हर्पेन on 11 May, 2020 - 07:59
>>>>>>
+४२०
खरच अभिषेक, तू वेगवेगळ्या रुपात इथे पडीक राहण्यापेक्षा घरी मदत का करत नाहीस? म्हणजे तुला घरातल्या बायका कामगार वाटणार नाहीत. Happy

+786

कामगार किंवा लेबरर, वर्कर (प्रावलिटेरियाट) ही संकल्पना बरीच वेगळी आहे. मानवी श्रमाचे काम आठ तास करून त्याचे वेतन मिळवणारे मजूर म्हणजे कामगार असे साधारण म्हणता येईल. मातेला मातृकामाचे वेतन मिळत नाही. तिची ड्यूटी आठ तासांपुरती मर्यादित नसते. तिचे काम निव्वळ श्रमाचे असे नसते. ते भावनिक, बौद्धिक, मानसिक असे बहुविध असते. ती सल्लागार असते, केअर टेकर असते, पंतोजी असते किंबहुना हिशेबनिस. निरीक्षक, पंच, लवाद, मध्यस्थ, इन्व्हेंटरी मॅनेजर, स्वयंपाकी, आकस्मिक डॉक्टर, ढाल, छडी/पट्टीवापरकर्ता, अनेक गॅजेट्स यूजर, हत्यारे वापरणारी अशी मल्टिटास्कर असते. पाळल्या जाणाऱ्या प्रत्येक दिनात ती अंशमात्र असतेच असते, म्हणून ह्या अंशमात्रतेवर तिची बोळवण न करता तिच्या सन्मानार्थ एक स्वतंत्र दिवसच असावा.

खरच अभिषेक, तू वेगवेगळ्या रुपात इथे पडीक राहण्यापेक्षा घरी मदत का करत नाहीस? म्हणजे तुला घरातल्या बायका कामगार वाटणार नाहीत. Happy
नवीन Submitted by अज्ञातवासी on 11 May, 2020 - 08:49

>>>>

या पोस्टला अनुसरून बहुधा धाग्यावर दोन चर्चा अपेक्षित आहेत

१) आई आणि कामगार दिन

२) कटप्पा आणि ऋन्मेष

मला साहजिकच दोन्ही चर्चात रस आहे.

१) च्रप्स म्हणतात तसे यात उपरोध वगैरे आहे.

२) अज्ञातवासी आपल्याला का वाटते की कटप्पा आणि ऋन्मेष एकच आहेत? Happy

आई राब राब राबते... भारतात लोकांना जाणीव नसते... हार्डली कोणी मदत करायला पूढे येतो
>>>>

भारतात असा विशेष उल्लेख का करावासा वाटला?
उर्वरीत जगात असे होत नाही का?

अज्ञातवासी आपल्याला का वाटते की कटप्पा आणि ऋन्मेष एकच आहेत?
>>>>>>>>>>>>>>>>.
याच उत्तर तू कटप्पा आणि स्ट्रेन्जर आयडीने शिव्या घालायला सुरुवात केली, तरच मी देईन.
बादवे कटप्पा या आयडीने काढलेल्या धाग्यवरही १००+ हवे आहेत का? असतील तर विपू कर.
मात्र धागा कटप्पा आणि अभिषेक एकच आहेत का असा काढ. ऋन्मेष मध्ये आणू नकोस. त्या नावाने कसाही वावरण्याइतपत तू निलाजरा असशील, पण मला चांगलं वाटणार नाही.

धागा काढला कटप्पाने, त्यावर अज्ञातवासी याने कुठलाही ठोस पुरावा नसताना याच्या मनात आलं म्हणून रुन्मेष हाच कटप्पा आहे हा आरोप केला. त्यावर रुन्मेष याने असा आरोप का केलात हे विचारल्यावर त्याला निलाजरा म्हणून हिणवले. आता गम्मत अशी की नारायण धारप यांच्या पहिल्या पानावर अज्ञातवासी हाच महाश्वेता असल्याचे सिद्ध झालंय तरी हा माणूस admin विपुत जाऊन याला लोकं महाश्वेता म्हणतात म्हणून रडत असतो. ही सगळी मानसिक संतुलन हरवल्याची लक्षण आहेत. लवकरच एका मनोसोपचारतज्ञाला दाखवा. सुरवातीच्या स्टेजला बरा होतो हा आजार.

अहो अज्ञातवासी विषय प्रत्येक धाग्यात काढतात पण उत्तर विचारले की वेगळा धागा का काढ म्हणता?

असो,
स्ट्रेंजर आले ईथेही.
आता चालू द्या तुमचा कोण कोणाचा डुआयडी खेळ Happy

मी मात्र नवीन धागा काढून सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मारणार नाही. जोपर्यंत मनोरंजन होतेय होऊ द्यावे Happy

अज्ञातवासी, आयर्नमॅन ,स्ट्रेन्जर,सप्रस आणि ऋन्मेष - कृपया विषय भरकटवू नका . >>> +१११११११११११

आई हे कुटुंबाप्रती असणार्‍या प्रेमापोटी करत असते तिला कामगार म्हणणं हे नैतिक नी वैचारिक नी भावनिक पातळी खालावल्याचं लक्षण आहे.
मग बाबा कोण??? ते कमवुन आणतात आणी आपण कोण जे नोकरी लागेपर्यंत त्यांच्याच घरात राहुन स्वतःला पोसत असतो.

आता तोंड वर करुन हे विचारायला येवु नये की त्यांनी जन्म दिला तर पोसायचे त्यांचे काम आहे.

विस्कळीत कुटुंबात
कुटुंबातील एक व्यक्ती कामगार,एक व्यक्ती मालक,एक व्यक्ती कमावणारी.
असले विभाजनवादी विचार श्रेणी असते.
कुटुंब ह्या शब्दाला अपेक्षित असलेल्या परिवारात स्नेह,प्रेम,आदर,भीती,हे सर्व असते.

मायबोलीचा आय क्यू कमी आहे असे मागे कोणीतरी म्हटले होते ते पटायला लागले आहे . उपरोधिक धागा होता . फक्त ऋन्मेष आणि चर्पस ( कसे लिहायचे?) यांना समजलेले दिसत आहे .

फक्त ऋन्मेष आणि चर्पस ( कसे लिहायचे?) यांना समजलेले दिसत आहे .
कटप्पासाहेब हे स्ट्रेंजर साहेबांना पण समजले आहे

आणी हो ते चर्पस लिहायची गरज नाही त्यांच्या प्रतिसादावरुन नाव कॉपीपेस्ट करता येते....जसे की हे बघा मी केले च्रप्स...किंवा लॉगीन करताना जसे लिहीता तसे लिहा.

crapsa
हे लिहा मराठीत म्हणजे च्रप्स होईल