१. "आमचंच रक्त महान आहे. आमचाच वंश शुद्ध आहे. त्यामुळे आम्हीच जगावर राज्य करणार. इतरांनी दुय्यम मनुष्य म्हणून जगावं, किंवा तुम्हाला ते मान्य नसेल तुम्हाला घाऊक प्रमाणात मारून टाकण्याची सोय करता येईल, ती आम्ही करू!'' असे शाश्वत सुंदर विचार श्री. हिटलर यांनी मांडले.
१. मन जाय तो जाने दे, मत जाने दे सरीर.
मन शरीराला भविष्यातील किंवा भूतकाळातील कुठल्याशा आभासी परिस्थितीत घेऊन गेलंय की शरीर अजुनही आपल्याजवळच आहे, हे चेक करत रहायला पाहिजे वारंवार.
कारण शरीर मूर्ख असल्यामुळे ते आभासी परिस्थित्यांनाही खऱ्याखुऱ्या रिॲक्शन्स देत बसतं. त्याला काय खऱ्याखोट्यातला फरक करता येत नाही.
(ही एक हॉरर कादंबरी आहे)
भाग 1: नियोजन
माथेरानच्या घनदाट जंगलात, जिथे सूर्यप्रकाश झाडांच्या फांद्यांमधून चोरट्या पावलांनी खाली झिरपत होता, तिथे एक जुना बंगला उभा होता. हा बंगला, जणू काळाच्या पडद्याआड हरवलेला, पांढऱ्या रंगाच्या भिंतींनी आणि कोरीव लाकडी खांबांनी सजलेला होता. त्याच्या भोवती भक्कम झाडांची गर्दी होती, आणि समोर एक प्राचीन विहीर उभी होती, ज्याच्या दगडी काठावर काजळी पडली होती.
प्रकरण 1
(अनेक वर्षांपूर्वी)
संध्याकाळी भोरवाडी गावात पाऊस रिपरिपत होता, गार वारं खिडक्यांतून आत येत होतं. एका लहानशा घरात राघव आणि माधव नेहमीप्रमाणे चटईवर बसले होते, त्यांच्या समोर सापशिडीचा रंगीत फड पसरलेला होता. लहानशा घड्याळ्याच्या टिकटिक आवाजात आई त्यांच्या बाजूला बसलेली होती.
तिच्या हातात गरम वाफाळता चहा होता.
“चल माधव, माझा नंबर,” राघवने रंगीत सोंगटी पुढे सरकवली.
“अरेरे! पुन्हा सापावरून खाली आलो,” राघवने नाराज होत तोंड वाकडं केलं.
आईने हसत विचारलं, “काय झालं रे राघव?”
प्रकरण 1
प्राचीन काळात रात्रीच्या गडद पडद्याखाली, मेडिटेरनियन समुद्राच्या रोमग्रीप्टस बेटावर वसलेल्या नगरीत, राजवाड्याच्या उंच मनोऱ्यांमधून चंद्रप्रकाश खिडकीतून आत येत होता. राजकुमारी क्लिओपात्रा, तिच्या रेशमी पलंगावर बसली होती. तिच्या हातात एक प्राचीन पुस्तक होतं आणि ती पुस्तकातील पानं उलटत होती. तिचे डोळे उत्साहाने चमकत होते.
ती जेव्हा जवळच्या जंगलात जायची तेव्हा तिच्या उपस्थितीत जंगलातील प्रत्येक प्राणी आणि झाड जणू स्वागतासाठी थांबायचे. तिचे सौंदर्य एखाद्या दैवी चित्रासारखे होते: नैसर्गिक, पण रहस्यमयी!
(Loreen या गायिकेच्या इंग्रजी Tattoo या माझ्या आवडीच्या गाण्याचा, मी केलेला मराठी भावानुवाद. हे त्या गाण्याचे शब्दशः भाषांतर नाही.)
(मूळ गाणे: https://music.youtube.com/watch?v=pbDKb311Zrg&si=UgvM3buFVpMTXYK3)
तू गेलास निघून दूर,
पण आठवण अजूनही उरली आहे,
तुझ्या स्पर्शाची रेघ,
अजूनही मनावर कोरली आहे.
हा वेदनेचा रंग गहिरा,
ही खूण डोळ्यांतील आसवांची आहे,
तुझे नाव माझ्या कोमल हृदयात,
रक्तासारखे भिनले आहे,
Cनाटक, चित्रपट, मुलाखती , वेब सिरीज यांवर धागे आहेत.
हा एक धागा नाटक/ चित्रपट / मुलाखती सोडून इतर मराठी कार्यक्रमांची ओळख/ परीक्षण करून देण्यासाठी.
सध्या ललितलेखनात टाकला आहे कारण मला कुठे ठेवावा हे उमगलं नाही. कोणाला जास्त योग्य कॅटेगरी/ गट सुचल्या जरूर कळवावे. धन्यवाद!
***
अपूर्वाई, काव्य-स्वर-सुरांचा त्रिवेणी संगम!
डिजिटल स्केच -- "SKETCH" अॅप वापरुन.... 
षड्रिपुनिर्दालन चुटकीसरशी केल्याचा दावा करणाऱ्या माझ्या दोस्ताने _ सोम्यागोम्याने _आपलं यश कायप्पा वर मला कळवलं
मग दसऱ्याचा मुहूर्त बघून मीही ठरवलं
आज षड्रिपुंचा नाश करायचाच वडिलोपार्जित तलवारीने
"काम" वधासाठी तलवार हाती घेतली
(म्यानाचा शेप .... आय हाय)
"क्रोध" वधासाठी तलवार उपसू लागलो.
(निघेचना xxx म्यानातून.... या तलवारीच्या....)
उपसेन तलवार तेव्हा पहिला "लोभाचा" खातमा करेन म्हटलं
(पण काही होवो..अशाच मुठीच्या आणखी दोन तरी तलवारी पायजेतच आपल्याकडे)
(चिकवा वर लिहून पोस्टचं बटण दाबायचाच अवकाश होता, पण मग तिथे अधिक चर्चा नको म्हणूनत स्वतंत्र धागा सादर करत आहे. )